“हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला”; विरोधी पक्षनेत्यांनी एका वाक्यात अर्थसंकल्पाचं विवेचन केलं

अर्थसंकल्पाचा विचार करताना 2014 ते 2019 पर्यंच्या काळातील राज्याच्या अर्थकारणाचा विचार केला पाहिजे. कालच आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला.

हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; विरोधी पक्षनेत्यांनी एका वाक्यात अर्थसंकल्पाचं विवेचन केलं
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 4:57 PM

मुंबईः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक क्षेत्रासाठी आमचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत नव नव योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांपासून नोकरदारापर्यंतच्या सगळ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या. शासकीय नोकरदारांपासून ते खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही या अर्थसंकल्पामध्ये काही ना काही योजना असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मात्र त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र हल्लाबोल करत हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे बांधण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पाने केले असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाचे विवेचन करताना त्यांनी मला टीका करायची म्हणून टीका करत नाही तर, देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळातील निवडणुका डोळ्यसमोर ठेऊन त्यांनी अर्थसंकल्पामध्ये योजना जाहीर केल्यांचे त्यांनी म्हटले आहे.

सरकार कोणतही असो पण योजना चालल्या पाहिजेत कारण त्या योजना समजासाठी असतात. 1980 च्या काळात ए. आर. अंतुले मुख्यमंत्री होते.

त्यावेळी त्यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली पण योजना चांगली असल्यामुळेच नंतरच्या काळातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ती योजना चालू ठेवली.

तशीच पेन्शन योजना होती, तीही नंतरच्या काळातील सरकारने त्या बंद न करता चालू ठेवल्या. राज्यात निराधार लोकांसाठी आणि महात्मा जोतिबा फुले योजनेच्या रक्कमेची मर्यादा वाढवली आहे. तो या सरकारचा निर्णय चांगलाच असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

मात्र अर्थसंकल्पाचा विचार करताना 2014 ते 2019 पर्यंच्या काळातील राज्याच्या अर्थकारणाचा विचार केला पाहिजे. कालच आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. त्याचेही विवेचन करून या अर्थसंकल्पावर आणख अधिकारवाणीने बोलता येईल असंही अजित पवार यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.