“माझे फोटो तुडवायला, मी असं काय बोललो..?”; अजित पवार यांचा थेट भाजपलाच सवाल…
भगतसिंह कोश्यारी यांनी आमच्या महापुरुषांबद्दल आणि आमच्या दैवतांबद्दल बोलतात. मात्र तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहात तरीही तुम्ही बेताल वक्तव्य कशी काय करु शकता.
मुंबईः हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत विरधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केली होती.
त्या वक्तव्यांची आठवण करून देत अजित पवार म्हणाले तुम्ही केली होती ती बेताल वक्तव्य होती मात्र मी जे बोललो होतो ते संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते.
त्यामध्ये सर्वार्थाने मी ते बोललो होतो मात्र त्यामध्ये चूक काय होते असा सवाल करत त्यांनी भाजपलाच सवाल केला आहे. त्यामुळे भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर नेत्यांवर अजित पवार पुन्हा एकदा बरसले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजपचे मंत्री नारायण गडकरी यांची तुलना करण्यात आली होती.
तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले आ्रणि महात्मा फुले यांच्या विवाहाविषयीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केली होती.
ही आमची दैवते असून या महापुरुषांबद्दल तुम्ही बेताल वक्तव्य कशी काय करू शकता असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी आमच्या महापुरुषांबद्दल आणि आमच्या दैवतांबद्दल बोलतात. मात्र तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहात तरीही तुम्ही बेताल वक्तव्य कशी काय करु शकता असा थेट सवाल अजित पवार यांनी राज्यपालांसह भाजप नेत्यांना केला आहे.
तर त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या शाळा सुरू केल्या, त्या त्यांनी वर्गणी जमा करून त्यांनी शाळा चालू केल्या होत्या.
मात्र चंद्रकांत पाटील यांनी त्या वर्गणी न म्हणता त्यांनी भीक मागून शाळा चालू केल्याचे म्हटले हे कसं काय म्हणू शकता असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.