मुंबई : कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना “पाजण्याचा” घाट कोण घालतेय? असा थेट सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी पालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) पत्रही पाठवलं आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प महागडा असल्याने त्याचा फेरविचार करावा अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)
सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प आता 440 दशलक्ष लिटर करण्यात येत असून त्याचा खर्च 3500 कोटीपर्यंत होणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी नुकतेच जाहीर केले आहे. जर हा प्रकल्प झाला तर गारगाई प्रकल्पाची गरज भासणार नाही असेही पालिका सांगते आहे. मग गारगाई प्रकल्प रद्द करण्यात आला का? त्याचा निर्णय कुणी व कधी घेतला? असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.
इतकंच नाही तर आर्थिक दुष्ट्या गारगाईपेक्षा समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महागडा ठरणार आहे. मग कंत्राटदारांची भलामण का केली जात आहे? महागडे पाणी मुंबईकरांच्या माथी का मारताय? असे प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी आयुक्तांना सविस्तर पत्र लिहिले आहे. तसेच एकिकडे कोव्हिडमुळे पालिकेचा निधी खर्च करण्याबाबत विचारपुर्वक निर्णय घेण्याची वेळ असताना पालिका मुंबईकरांच्या कष्टाच्या निधीची उधळपट्टी का करते आहे असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. (Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)
दरम्यान, यावर भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘युनायटेड नेशनचा अभ्यास सांगतो समुद्राचे पाणी गोड केल्यानंतर जे रासायनिक पाणी उरतं, तयार होते त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होत असतो. 440 दशलक्ष पाणी गोड केल्यानंतर 370 दशलक्ष लीटर पाणी हे रासायनिक गुण असलेल होणार आहे त्याची विल्हेवाट कशी लागणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर समुद्राच पाणी गोड करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा आढावा घ्यावा आणि पुनर्विचार करावा आमची मागणी आहे आशिष शेलार यांनी आयुक्तांकडे केली आहे.
इतर बातम्या –
मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे ‘परावलंबी वर्ष’; आशिष शेलारांचा टोला
GHMC Election : शेलार-फडणवीस जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर, मनपा जिंकण्याची जय्यत तयारी#GHMCElection #devendrafadanvis #ashishshelarhttps://t.co/E5A0Zvjr9P
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
(Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)