Breaking : लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना

एका इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ललित अंबिका असं या इमारतीचं नाव आहे. बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर ही इमारत आहे. या इमारतीचं अद्याप काम सुरु आहे.

Breaking : लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 8:10 PM

मुंबई : वरळीच्या हनुमान गल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ललित अंबिका असं या इमारतीचं नाव आहे. बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर ही इमारत आहे. या इमारतीचं अद्याप काम सुरु आहे. (Lift Accident elevator collapsed in Hanuman Galli of Worli mumbai, 4 people died and 1 injured)

मृतांमध्ये अविनाश दास (35 वर्षे), भारत मंडल (27 वर्षे), चिन्मय मंडल (33 वर्षे) आणि एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तर लक्ष्मण मंडल (35 वर्षे) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

ही घटना संध्याकाळी 5.45 च्या सुमारास घडली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अशी माहिती मिळाली आहे की, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. त्याच दरम्यान लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून आत अडकलेल्या 6 जणांची सुटका करण्याचं काम अग्निशमन दलाने हाती घेतलं आहे.

इतर बातम्या

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

Taliye Landslide : तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची मोठी घोषणा

(Lift Accident elevator collapsed in Hanuman Galli of Worli mumbai, 4 people died and 1 injured)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.