पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 8:38 PM

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईत एकूण 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत. या 21 इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 10 इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज दिली. (List of most dangerous buildings in Mumbai announced before monsoon)

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार मे महिना अखेरपर्यंत 9 हजार 48 उपकरप्राप्त इमारतींचे (68 टक्के) सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 21 इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू/रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे

मंडळाच्या चारही झोनमध्ये ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून इमारतींच्या धोक्याची लक्षणे तथा इमारत कोसळल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारामार्फत तात्काळ आपत्ती निवारणाबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसेच नियंत्रण कक्षातील अधिकारी तात्काळ जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या 21 इमारती

  1. इमारत क्रमांक 144, एमजीरोड, अ- ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील)
  2. इमारत क्रमांक 133 बी बाबुलाल टँक रोड, बेगमोहम्मद चाळ
  3. इमारत क्रमांक 54, उमरखाडी,1 ली गल्ली छत्री हाऊस
  4. इमारत क्रमांक 101-111, बारा इमारत रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
  5. इमारत क्रमांक 74 निजाम स्ट्रीट, (मागील वर्षीच्या यादीतील)
  6. इमारत क्रमांक 123, किका स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)
  7. इमारत क्रमांक 166 डी मुंबादेवी रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
  8. इमारत क्रमांक 2-4 ए, २ री भोईवाडा लेन
  9. इमारत क्रमांक 42, मस्जिद स्ट्रीट
  10. इमारत क्रमांक 14 भंडारी स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)
  11. इमारत क्रमांक 64 – 64 ए, भंडारी स्ट्रीट, मुंबई
  12. इमारत क्रमांक 1-3-5, संत सेना महाराज मार्ग
  13. इमारत क्रमांक 3, सोनापूर 2 री क्रॉस लेन
  14. इमारत क्रमांक 2-4, सोराबजी संतुक लेन
  15. इमारत क्रमांक 387-391, बदाम वाडी, व्ही, पी, रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
  16. इमारत क्रमांक 391 डी, बदाम वाडी, व्ही, पी, रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
  17. इमारत क्रमांक 273 -281 फॉकलँड रोड, डी, 2299- 2301 (मागील वर्षीच्या यादीतील)
  18. इमारत क्रमांक 1, खेतवाडी 12 वी गल्ली (डी) 2049 (मागील वर्षीच्या यादीतील)
  19. इमारत क्रमांक 31-सी व 33-ए, रांगणेकर मार्ग आणि 19 पुरंदरे मार्ग, गिरगाव चौपाटी
  20. इमारत क्रमांक 104-106 मेघजी बिल्डिंग अ, ब आणि क विंग, शिवदास चापसी मार्ग
  21. इमारत क्रमांक 15-19 के. के. मार्ग व 1-3 पायस स्ट्रीट

या अतिधोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे एकूण 717 रहिवासी / भाडेकरू आहेत. यापैकी 193 निवासी भाडेकरू / रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 20 निवासी भाडेकरू /रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित 247 निवासी भाडेकरू / रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी/ भाडेकरू यांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या सूचना देण्याची व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मंडळाचा नियंत्रण कक्ष कार्यरत

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू /रहिवाशांना मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे, सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे.

इतर बातम्या

आशिष शेलार म्हणाले, गेला गाळ कुणीकडे?; पालिकेने केला ‘हा’ दावा, दिली आकडेवारी!

मुंबई तुंबू नये म्हणून पालिका अ‍ॅलर्ट; रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

(List of most dangerous buildings in Mumbai announced before monsoon)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.