AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown in Maharashtra: लॉकडाऊनच्या भीतीमुळे परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई

लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी. | Lockdown in Maharashtra

Lockdown in Maharashtra: लॉकडाऊनच्या भीतीमुळे परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई
ठाकरे सरकारने अद्याप लॉकडाऊनचा ठोस निर्णय घेतलेला नाही.
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 10:04 AM

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे ठाकरे सरकार महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीने आता महाराष्ट्रात वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. (Labours in Maharashtra starts to return their villages)

देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसारमाध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.

ठाकरे सरकारने अद्याप लॉकडाऊनचा ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, आम्हाला गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा स्वत:ची फरफट होऊन द्यायची नाही, असे परराज्यातील कामगारांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्करला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झाले आहेत.

लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी. जेणेकरून आम्ही येथे अडकून पडण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या चर्चेमागे लेबर कॉन्ट्रॅक्टर?

राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा तापवण्यामागे लेबर कॉन्ट्रॅक्टर्सच्या लॉबीचा हात असल्याचे म्हटले जाते. जेणेकरून अनिश्चितता वाढल्यास लेबर रेट आणि कंत्राटांची मुदत वाढवता येईल. मात्र, या सगळ्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहे. राज्याला दुसरा लॉकडाऊन परवडणार नाही, असे मत उद्योगविश्वातून व्यक्त केले जात आहे.

छोट्या कंपन्यांमधील कामगार गावी परतायला सुरुवात

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाला कोरोनाचे 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ असेल. त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra second lockdown : येत्या 2 एप्रिलला मर्यादित लॉकडाऊनची शक्यता, नियम काय असतील?

‘फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे; तुमच्यामुळे जनतेला दुष्परिणाम भोगावे लागतील’

(Labours in Maharashtra starts to return their villages)

पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.