संजय राठोडांच्या भागात परिस्थिती गंभीर; कदाचित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल: अजित पवार

संजय राठोड गायब आहेत हे कुणी सांगितलं, मी त्यांना मगाशी फोन करुन सांगितलं. | Sanjay Rathod Ajit Pawar

संजय राठोडांच्या भागात परिस्थिती गंभीर; कदाचित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल: अजित पवार
ajit pawar
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 12:58 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. (If coronavirus situation worsened lockdown will be implemented in Sanjay Rathod’s region)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवारांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी अमरावती, यवतमाळ या भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याचं सांगितलं. त्यादरम्यान त्यांना यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्येनंतर गायब असल्याबाबत विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले की,  संजय राठोड गायब आहेत हे कुणी सांगितलं, मी त्यांना मगाशी फोन करुन सांगितलं. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे. राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने निर्णय घेतला तर पालकमंत्र्यांसह सर्वांना समजलाच पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.

…तर म्हणाल राजकारणी हस्तक्षेप करतात: अजित पवार

पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री पूजा चव्हाण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या अरुण राठोड याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याची आता पुण पोलीस आयुक्तालयात चौकशी होणार आहे. याविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले याबाबत माझ्याकडे ऐकीव माहिती आहे. आम्ही सतत पोलिसांना फोन केले तर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करतो, असे आरोप होण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

फेब्रुवारीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ: अजित पवार

1 फेब्रुवारीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आणि डिस्चार्जची संख्या जास्त, अशी परिस्थिती होती. एक फेब्रुवारीनंतर आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या अमरावती विभागात जास्त दिसत आहे. नागपूर, वर्धा, नाशिक विभागातही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणचा आढावा घेतला.” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. दुपारी बैठकीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्या बैठकीत अमरावती, अकोला, यवतमाळ या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा होईल. फक्त तीन शहरं की ग्रामीण भागातही निर्बंध लावायचे याबाबत चर्चा करणार. कोणी मास्क वापरत नाही, त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. सगळे जण कोरोना कमी झाला, असं म्हणून पूर्वीसारखं राहत आहेत.” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.

विधानसभा अध्यक्षाबाबत राज्यपालांना विचारण्याचा अधिकार आहे. चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार निर्णय घेऊन उत्तर देईल. जागा रिक्त झाल्यावर भरायची असते. ती जागा जास्त काळ रिक्त ठेवून चालत नाही, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sanjay Rathod Resignation Live Updates: संजय राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी: सूत्रांची माहिती

पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!

‘ते’ वनमंत्री आहेत, दाट वनात संशोधन करत असतील; मुनगंटीवारांचा संजय राठोडांना टोला

(If coronavirus situation worsened lockdown will be implemented in Sanjay Rathod’s region)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.