Mumbai | मुंबईच्या मढ सिल्वर बीचवर सापडले दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासव जखमी अवस्थेत…

मुंबईतील मालाडच्या मढ किनाऱ्यावर वाहून आलेल्या दुर्मिळ लॉगरहेड कासवावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुर्मिळ मादी कासवाला ऐरोलीच्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Mumbai | मुंबईच्या मढ सिल्वर बीचवर सापडले दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासव जखमी अवस्थेत...
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 1:48 PM

मुंबई : सिल्वर बीच मढ मालाड पश्चिम मुंबई (Mumbai) या ठिकाणी 17 ऑगस्ट 2022 रोजी प्रमोद धाडगे ह्यांना सिल्वर बीच समुद्र किनारी फेरफटका मारताना एक लॉगरहेड कासव जखमी अवस्थेत दिसून आले. प्रमोद यांनी विलंब न करता प्राणी मित्र आणि वन्यजीव संरक्षक आनंद मोहिते यांना फोनद्वारे माहिती (Information) दिली. जखमी समुद्री कासवाची माहिती कांदळवन कक्षाचे अधिकारी संतोष जाधव यांना आणि महाराष्ट्र राज्य पोलीस कंट्रोलद्वारे मालवणी पोलीस ठाण्याला दिली. त्या आधारे पोलीस (Police) कर्मचारी योगेश कोळी, निलेश पुकाले कांदळवन कक्षाचे अधिकारी वनपाल अंधेरी महादेव शिंगाडे वैशाली गवळी, सहअधिकारी अजित परब, राकेश घवली ह्यांनी घटना स्थळी धाव घेतली.

कासव पुढील उपचारासाठी नवी मुंबई ऐरोळीतील कांदळवन कक्षात

स्थानिक प्रमोद धाडगे, रवी यांच्या मदतीने या कासवाच्या अंगावर बार्नॅकल्स प्रजातीचे कालवे होते. हे कालवे काढून या जखमी समुद्री कासवास वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्षाच्या वाहनातून पुढील उपचारासाठी नवी मुंबई ऐरोळीतील कांदळवन कक्षाचे किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र येथे पाठवण्यात आले. प्रमोद धाडगे ह्यांनी उत्स्फूर्तपणे प्राथमिकता दाखवली म्हणुन कासवाला उपचारासाठी पुढे पाठवण्यात यश आले आहे. सदर लॉगरहेड कासव मादी जातीची असून पाठीवर बोटीच्या पंख्याच्या पातची जखम आहे.

हे सुद्धा वाचा

कासवाने बरेच दिवस काही खाल्ले नसल्याचे समोर

मुंबईतील मालाडच्या मढ किनाऱ्यावर वाहून आलेल्या दुर्मिळ लॉगरहेड कासवावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुर्मिळ मादी कासवाला ऐरोलीच्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मढ किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमारांना हे दुर्मिळ कासव आढळून आले. या वरील बारनॅकल्सच्या प्रजातींची ओळख पटवून या कासवाचा भ्रमणमार्ग ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या, या कासवावर उपचार सुरू आहेत.या वर्षी नोंद झालेल्या लॉगरहेड कास्वांपैकी हे कासव आकाराने मोठे आहे. या कासवाने बरेच दिवस काही खाल्ले नसल्याचे समोर आले आहे.

बोटीच्या पंख्याची धडक झाल्याने कासवाच्या पाठीवर जखम

या कासवाला प्रार्थमिक तपासणीसाठी डॉ. रीना देव यांच्या उपचार केंद्रात नेण्यात आले. ‘एक्स-रे’ चाचणीनंतर या कासवाला निमोनिया झाला असल्याचे समोर आले आहे. तसेच बोटीच्या पंख्याची धडक झाल्याने त्याच्या पाठीवर जखम झाली आहे. पुढील उपचारासाठी या कासवाला ऐरोलीच्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात नेण्यात आले असून, या कासवावर उपचार सुरू आहेत. या मादी लॉगरहेड कासवावर योग्य उपचार करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. या कासवावर संपूर्ण उपचार ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांच्या निगराणीत करण्यात येत आहेत.

ऑगस्ट महिन्यातच दिवेआगर किनाऱ्यावर 2 कासव आढळले

गेल्या सहा वर्षात भारतीय किनारपट्टीवर विशेषतः महाराष्ट्रात या कासवाच्या आता पर्यंत 8 नोंदी समोर आल्या आहेत. जून 2016 मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मादी लॉगरहेड कासवाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर, ऑगस्ट 2017 मध्ये डहाणू आणि केळवा येथे मादी लॉगरहेड कासवाची नोंद करण्यात आली. सन 2021 मध्ये मालवण बंदर जेट्टी आणि वायरी किनाऱ्यावर दोन लॉगरहेड कासवाची पिल्ले सापडली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात 12 आणि 13 ऑगस्टला दिवेआगर किनाऱ्यावर 2 कासवे आढळून आली. उरण तालुक्यातील कारंजा खाडीत 16 ऑगस्ट रोजी एक लॉगरहेड समुद्री कासव मच्छीमारांना आढळून आले. 17 ऑगस्ट रोजी मादी लॉगरहेड समुद्री कासव मढ किनाऱ्यावर वाहून आले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.