मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप

devendra fadnavis special interview on tv9 marathi: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. उद्धव ठाकरे सध्या फक्त मतांचा विचार करत आहेत. परंतु ज्या शक्तीशी बाळासाहेब लढले, त्या शक्तीशी उद्धव ठाकरे मदत करत आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात... देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप
devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 1:12 PM

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांच्याकडे पुत्र म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवर अधिकार आहे. परंतु शिवसेना उबाठा आता फक्त मुस्लिमाचे लांगूलचालन करत आहेत. आता भाषणाच्या सुरुवातीला “माझ्या तमाम हिंदू-बंधू बांधवांनो” हे शब्द ते बोलत नाहीत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. सध्या उद्धव ठाकरे फक्त मतांचा विचार करत आहेत. परंतु ज्या शक्तीशी बाळासाहेब लढले, त्या शक्तींनाच उद्धव ठाकरे मदत करत आहेत. यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे ते अधिकारी नाही. ते अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांना आहे, असा घणाघाती हल्ला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणे उत्तरे दिलीत. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर घाणाघाती हल्ले केले. अगदी उद्धव ठाकरे आता मुस्लिमांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला.

त्यापेक्षा राजकारणातून निवृत्ती घेतली असती

मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी व्यक्ती केवळ मराठी नाही तर हिंदू आहे. तसेच फक्त हिंदू नाही तर कट्टर हिंदू देखील आहेत. या हिंदू व्यक्तींना पहिल्यांदा शिवसेना उबाठाच्या रॅलीमध्ये पाकिस्ताचे झेंडे दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आधी हिंदू शब्द येत होता. आता तो शब्द सोडला. का तुम्हाला हिंदू शब्द घेण्याची आता लाज वाटते का? कारण तुम्हाला त्यांच्या भरवश्यावर निवडणूक लढवायची आहे. यामुळे शिवसेना उबाठा आता लांगूलचालन करत असल्याचे मराठी व्यक्तींना स्पष्ट दिसत आहे. एखादी निवडणूक हारली तरी चालेल पण बाळासाहेबांनी हे लांगूलचालन सहन केले नसते. त्यापेक्षा त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असती.

हे सुद्धा वाचा

मुस्लीम समाजाला योजनांचा फायदा

मुस्लीम मतदार दुसरीकडे जाण्यास भाजप जबाबदार नाही का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसने देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले आहे. परंतु आमचे म्हणणे आहे, पहिला हक्क गरीबांचा आहे. मोदीजींना मुस्लिम समाजाला घरे दिली नाही का? त्यांना गॅस दिला नाही का? त्यांना सरकारी योजनेचा लाभ दिला नाही का? मुस्लीम देशाचे नागरिक आहेत. त्यांचाही विकास झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन मोदी सरकारने काम केले आहे. यामुळे २० कोटी मुस्लीम मतदारांना मोदी यांच्या योजनेचा फायदा आहे.

धर्माच्या आधारावर आरक्षण नाहीच..

आरक्षण देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध केला होता. परंतु आता काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर एका रात्रीतून जीआर काढून मुस्लिमांना ओबीसीचे आरक्षण दिले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.