भाजप-शिवसेनेत मध्यरात्री घडामोडी, ‘वर्षा’वरील बैठकीत नेमकी काय झाली चर्चा

lok sabha election 2024: संभाजीनगर बाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी खेळी खेळली जात आहे. एकीकडे मराठा समाज स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ते शिंदे गटाकडून संभाजीनगर जागेसाठी इच्छुक आहेत.

भाजप-शिवसेनेत मध्यरात्री घडामोडी, 'वर्षा'वरील बैठकीत नेमकी काय झाली चर्चा
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 6:41 AM

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त अजूनही लागत नाही. बैठका, चर्चा सुरु आहेत. अगदी नवी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यात वर्षावर चर्चा झाली. वाद असणाऱ्या जागांवर ही चर्चा झाली. त्यात छत्रपती संभाजी नगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालघरमध्ये भाजपच्या चिन्हावर गावित

सर्वात पहिले पालघर जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आता पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत वर्षावर चर्चा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्री उदय सामंत त्यांच्या भावासाठी या जागेचा आग्रह करीत आहे. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला ही जागा दिली तर आम्ही ती जागा जिंकून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त बैठकीत व्यक्त केला.

सर्वात मोठी खेळी, विनोद पाटील शिवसेनेकडून?

संभाजीनगर बाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी खेळी खेळली जात आहे. एकीकडे मराठा समाज स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ते शिंदे गटाकडून संभाजीनगर जागेसाठी इच्छुक आहेत. पण भाजपसुद्धा या जागेवर निवडणुक लढवण्यास आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली

हे सुद्धा वाचा

तब्बल तीन तास चालली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरून बैठक जवळपास 2.45 मिनिट झाली. त्यानंतर रात्री 1.30 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस बैठकीतून निघाले. या बैठकीनंतर महायुतीचे अंतिम जागावाटप लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.