अमित शाह यांच्यासोबत मध्यरात्री महायुतीची बैठक, जागा वाटपाचा तिढा सुटणार?

Lok Sabha Election 2024: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जागा वाटप न झाल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे समजते.

अमित शाह यांच्यासोबत मध्यरात्री महायुतीची बैठक, जागा वाटपाचा तिढा सुटणार?
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 9:03 AM

मुंबई | दि. 6 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौरा मंगळवारपासून सुरु झाला. या दौऱ्यातून अमित शाह यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. एकीकडे या दौऱ्यात महाराष्ट्रातील विरोधक शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्याचवेळी दुसरीकडे महायुतीमधील जागा वाटपाचा वाद मिटवण्यासाठी शिष्टाई केली. अमित शाह यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठकीत व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको, असा सल्ला अमित शाह यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिला.

काय म्हणाले अमित शाह

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १६ जागा हव्या होत्या. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बैठक घेतली. बैठकीत भाजपकडून झालेले सर्वेक्षण, उमेदवार निवडून येण्याची क्षमता हे मुद्दे लक्षात घेऊन जागा वाटप करण्याचे अमित शाह यांनी सांगितले. भाजप नेते देखील काही जागांसाठी अडून बसले असतील आणि त्या ठिकाणी मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो तर भाजपनेही हट्ट सोडावा. जागा वाटपात कोणावर अन्याय होणार नाही. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असे अमित शाह यांनी सांगितले. ४८ जागा वाटप कसे करायचे यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

कोणत्या जागांवर आहे वाद

  • दक्षिण मुंबई : भाजपला शिवसेनेच्या कोट्यातील या जागेवरुन निवडणूक लढवायची आहे.
  • वायव्य मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या जागेवर भाजपला निवडणूक लढवायची आहे.
  • रत्नागिरी- सिंधुदुर्ग: भाजपला शिवसेनेच्या कोट्यातील जागा लढवायची आहे.
  • शिरूर : अजित पवार आणि शिंदे यांच्यावर शिवसेनेचा दावा.
  • मावळ : शिवसेनेच्या कोट्यातून अजित पवारांना उमेदवारी करायची आहे.
  • गडचिरोली : राष्ट्रवादीच्या अजित गटाला भाजपच्या जागेवर निवडणूक लढवायची आहे.
  • नाशिक : शिवसेनेला कोट्याच्या जागेवर भाजपशी लढायचे आहे.
  • पालघर : शिवसेनेला कोट्याच्या जागेवर भाजप विरुद्ध निवडणूक लढवायची आहे.
  • ठाणे : शिवसेनेला कोट्यातील जागेवर भाजपशी लढायचे आहे.
  • संभाजीनगर : भाजपला शिवसेनेच्या कोट्यातील जागेवर लढायचे आहे.
  • धाराशिव : भाजपला शिवसेनेच्या कोट्यातील जागेवर लढायचे आहे.
  • परभणी : भाजपला शिवसेनेच्या कोट्यातील जागेवर लढायचे आहे.
  • अमरावती : शिवसेनेच्या कोट्यातील जागेवर भाजपनेही दावा केला आहे.
  • माढा : अजित पवारांना भाजपची जागा लढवायची आहे.
  • सातारा : विद्यमान खासदार शरद पवार गटाचे असल्याचा दावा राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी केला आहे.

दुसरी यादी ७ मार्च रोजी

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जागा वाटप न झाल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे समजते. यामुळे येत्या 7 मार्चला भाजपकडून दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे यांचा १८ जागांसाठी आग्रह

बैठकीत आपल्या पक्षाला लोकसभेच्या १८ जागा मिळाव्यात यासाठीही शिंदे आग्रह होता. राज्यात आपण ऊठाव केलाय आणि सर्व आमदार खासदार सोबत घेऊन पक्ष वाढवत असल्याचंही शिंदे म्हणाले. तसेच निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी आग्रही मागणी एकनाथ शिदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावेळी शाह यांनी त्यांना विविध मतदारसंघात ग्राउंड रिॲलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे काही उमेदवार जिंकणार नाहीत, हे त्यांनी सांगितले. यानंतर शिवसेनेच्या खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर ऊभा ठाकलाय. काही खासदार पुन्हा ऊबाठा गटात जाण्याचाही विचार करत आहेत. तर मित्र पक्षाला जागा दिला तर आपलं काय होणार? असा प्रश्न भाजप उमेदवारांना पडला आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.