नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का दिला….राज ठाकरे यांनी सांगितले कारण

raj thackeray on mahayuti pratibha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहे. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालेच नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का दिला....राज ठाकरे यांनी सांगितले कारण
raj thackeray
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 12:47 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालेच नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केले.

काय म्हणाले राज ठाकरे

देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहू गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेते फेकली गेली होती. राम मंदिरासाठी चाललेले हे दीर्घ आंदोलन विसरता येणार आहे. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मागण्यांचा विचार होणार

मी नरेंद्र मोदी यांच्या काही धोरणांचा विरोधही केला आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे, असे मला वाटले. त्यामुळे पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विषय आहे. ते मार्गी लागतील.

हे सुद्धा वाचा

महायुतीचा प्रचारही करणार

मनसे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करणार आहे. आता महायुतीच्या उमेदवारांनी कोणाशी संपर्क साधावा, अशी यादी दोन, तीन दिवसांत देणार आहे. निवडणूक प्रचार मोहिमेत आमच्या लोकांना सन्मान मिळेल, ही अपेक्षा आहे. महायुतीचा  प्रचार करावा, असे पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत सांगितल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. महायुतीच्या प्रचार सभांना संबोधित करायचं की नाही याबाबत काही ठरवलेलं नाही. पुढे बघू . आमचे बुकींग असते. त्यामुळे सभा होतात, असे त्यांनी म्हटले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.