मैत्र जीवाचे: एकाकी आजी-आजोबांना आता मिळतील हक्काची नातवंडे, दोन पिढ्यांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण करणारा पहिला स्टार्ट अप, रतन टाटांच्या पुढाकाराने नवा उपक्रम

आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गुडफेलोजने 6 महिन्यांचा अवधी घेतला होता. त्यानंतर आता ही सेवा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. यानंतर पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांना लक्ष्य केले जाणार आहे.

मैत्र जीवाचे: एकाकी आजी-आजोबांना आता मिळतील हक्काची नातवंडे, दोन पिढ्यांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण करणारा पहिला स्टार्ट अप, रतन टाटांच्या पुढाकाराने नवा उपक्रम
रतन टाटा यांचा नवा पुढाकारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:00 PM

मुंबई: सहवेदनेची जाणीव या निकषांवर पारख करून निवडलेल्या तरुण, सुशिक्षित पदवीधरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना खरीखुरी, अर्थपूर्ण सोबत मिळवून देणारा नवा स्टार्ट अप (new startup)सुरु करण्यात आला आहे. या “गुडफेलोज”या (good fellows)युवा स्टार्ट-अपचा शुभारंभ रतन टाटा यांच्या उपस्थितीत पार पडला. अभिनेत्री श्रीया पिळगावकर, कन्टेन्ट क्रिएटर विराज घेलानी यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत आणि या सेवेसाठी नावनोंदणी केलेल्या विद्यमान ‘ग्रॅण्डपाल्स’च्या साथीने उद्घाटनाचा हा सोहळा साजरा केला. या स्टार्ट-अपमधील गुंतवणुकीविषयी बोलताना इमेरिटस ऑफ द इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष रतन एन. टाटा (Ratan Tata)म्हणाले, गुडफेलोजने दोन पिढ्यांमध्ये निर्माण केलेला स्नेहबंध अतिशय अर्थपूर्ण आहे आणि भारतातील एक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्यास त्यामुळे मदत होत आहे. या गुंतवणुकीमुळे गुडफेलोजची युवा टीम आणखी विस्तारण्यास मदत होईल, अशी मला आशा आहे.

मुंबईत सुरु इतरही शहरांत होणार विस्तार

आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गुडफेलोजने 6 महिन्यांचा अवधी घेतला होता. त्यानंतर आता ही सेवा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. यानंतर पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांना लक्ष्य केले जाणार आहे. चाचणीदरम्यान गुडफेलोजला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या दरम्यान गुडफेलोजमध्ये रुजू होण्यास इच्छुक असलेल्या 800 हून अधिक युवा पदवीधरांचे अर्ज कंपनीकडे आले होते, यातून निवडण्यात आलेल्या 20 जणांच्या तुकडीने मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना सोबत पुरविली. टीमच्या अनुभवानुसार गुडफेलोजचे ग्रॅण्डपाल्स अर्थात आजी-आजोबांशी तयार होणारे ऋणानुबंध, केवळ दिखाव्यापुरते नाहीत. तर खरोखरीचे आणि अर्थपूर्ण असावेत याची खबरदारी घेणे आव्हानात्मक पण तितकेच समाधानकारक होते, असे कंपनीच्या टीमचे म्हणणे आहे. यासाठी सर्वोत्तम पदवीधर निवडण्यासाठी तपासणीच्या अनेक फे-या तसेच कंपनीतर्फे घेण्यात येणा-या काही सायकोमेट्रिक चाचण्या गरजेच्या असतात.

या स्टार्ट अपद्वारे सोबतीची सेवा मिळणार

गुडफेलोजद्वारे दिल्या जाणा-या सेवांबद्दल सांगायचे तर, या स्टार्टअपच्या माध्यमातून एखाद्या नातवंडाकडून आजी-आजोबांसाठी केल्या जातील अशा सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. भारतामध्ये जवळ-जवळ 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक एकतर जोडीदार गमावल्याने किंवा नोकरीच्या अटळ गरजेपोटी कुटुंब इतरत्र स्थलांतरीत झाल्याने एकट्याने आयुष्य कंठत आहेत. यातील अनेक जणांपाशी काळजीवाहू व्यक्ती आहेत, ई-कॉमर्ससारख्या उपयुक्ततेशी निगडित गरजा पूर्ण करणा-या स्टार्ट-अप कंपन्या आहेत, पण त्यांच्या ढासळत्या मानसिक आरोग्याला एकटेपणा, सोबतीचा अभाव हे घटक प्रामुख्याने जबाबदार आहेत. संस्थापक  टाटा यांच्या कार्यालयाचे जनरल मॅनेजर श्री. शंतनू नायडू म्हणाले- सोबतीची व्याख्या ही वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळी असते या गोष्टीवर या स्टार्ट-अपने भर दिला आहे. काहींसाठी त्याचा अर्थ एकत्र बसून चित्रपट पाहणे असा असतो, काहींसाठी जुन्या दिवसांतल्या आठवणी सांगत बसणे, चालायला जाणे म्हणजे सोबत असते तर काही जणांना अगदी काही न करता केवळ सोबत कुणाचातरी वावर असणे पुरेसे असते आणि आम्ही या सर्व गरजा लक्षात घेतो. गुडफेलोजबरोबर या ग्रॅण्डपाल्सचे ऋणानुबंध किती स्वाभाविकपणे साकारत गेले, हे आम्ही चाचण्यांमध्ये पाहिले. टाटा यांनी आमच्या या व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे या संकल्पनेप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीला मिळालेले प्रचंड मोठे प्रोत्साहन आहे.

हे सुद्धा वाचा

तरुणांना नव्या करिअरची संधी, समाजऋणासोबत पैसेही मिळणार

याशिवाय गुडफेलोजतर्फे दर महिन्याला काही मासिक उपक्रमही आयोजित केले जातील, जिथे ग्रॅण्डपाल्सना आपल्या गुडफेलोजसह सहभागी होता येईल. त्यामुळे एका वेगळ्या वातावरणात आनंदात घालविलेल्या काही क्षणांमुळे दोघांतील नाते अधिक गहिरे आणि मौजमजेचे बनेल. यामुळे ग्रॅण्डपाल्सना एकमेकांना तसेच इतरही युवा पदवीधरांना भेटता येईल व त्यातून आपण एका समुदायाया भाग असल्याची भावना निर्माण होईल. गुडफेलोजची व्यवसायपद्धती प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित आहे. पहिल्या महिन्याची सेवा नि:शुल्क असेल, या कालावधीमध्ये ग्रॅण्डपाल्सना ही सेवा अनुभवता यावी इतकेच त्यामागचे लक्ष्य आहे, कारण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय ही संकल्पना लक्षात येणे कठीण आहे. दुस-या महिन्यापासून लहानसे सदस्यत्व शुल्क आकारण्यात येईल. पेन्शनधारकांच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन हे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. हे शुल्क दोन महत्त्वाच्या कारणांसाठी आकाराले जात आहे: गुडफेलोजने सहानुभाव आणि वृद्धांविषयीचा कळवळा या निकषांवर पदवीधरांची निवड केली असली तरीही ज्येष्ठांसाठी आपली सर्वोत्तम सेवा पुरवत स्वत:ची आर्थिक सुरक्षितता जपणेही या तरुणांसाठी आवश्यक आहे. त्यांचा मान राखला जावा व हा व्यवसाय निवडण्याचा सुयोग्य मोबदला त्यांना देता यासाठी ही सेवा सशुल्क ठेवण्यात आली आहे. यामुळे निवडलेले गुडफेलोज टिकून राहतील, त्यांना चांगल्या प्रकारे तयार करता येईल व समाजऋण फेडताना त्यांना आपली कारकिर्दही घडवता येईल.

स्नेहबंध तयार होण्याची प्रयत्न होणार

या सेवेच्या सबस्क्रिप्शन मॉडेलनुसार ज्येष्ठांचे गुडफेलोजबरोबरचे स्नेहबंध तयार होत असताना त्यांना भेटायला येणारी व्यक्ती आमच्याकडून सतत बदलली जाणार नाही याची हमी दिली जाते, कारण सतत वेगवेगळ्या व्यक्ती भेटत राहिल्यास अस्सल आणि खरेखुरे नाते तयार होण्यासाठी आवश्यक वेळ आणि भावनिक अवधान मिळू शकत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला मित्र बनवतो तेव्हा तीच व्यक्ती आपल्याला वारंवार भेटावी अशी आपली इच्छा असते. दरवेळी नवीन व्यक्ती भेटल्यास हे घडणार नाही. या क्षेत्रामध्ये ना-नफा तत्वावर चालणा-या अनेक संस्थांनी याआधी करून पाहिलेले प्रयत्न फसले आहेत, कारण त्यात सहभागी होणा-या स्वयंसेवकांना वेळ असेल तेव्हाच ते उपलब्ध होतात आणि खराखुरा स्नेहबंध निर्माण होण्यासाठी ज्येष्ठांबरोबर पुरेसा वेळ घालविण्याची कुणाचीच तयारी नसते. सुरुवातीची उर्मी संपली की स्वयंसेवक निघून जातात व त्याचा ज्येष्ठांच्या मनावर गहिरा आघात होतो.

कुठे मिळवता येईल ही संधी

ज्येष्ठ नागरिकांना thegoodfellows.in येथे साइन-अप करून किंवा ८७७९५२४३०७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ही सेवा मिळविता येईल.

गुडफेलोजना नवे क्षितीज

गुडफेलोजकडून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांना अल्पकालीन इंटर्नशीप तसेच पूर्णवेळ नोकरीचा पर्याय दिला जातो. यामुळे त्यांना आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीमधून मिळालेले ज्ञान या क्षेत्रात वापरता येते व आपण करत असलेल्या कामाचे समाधान मिळते. या पदवीधरांना या सोबतीची संकल्पना तयार करण्याची, नाते तयार करण्याची आणि या नाते आपलेसे करण्याची स्वायत्तता दिली जाते. उदाहरणार्थ, सोफिया कॉलेजमध्ये शिकणा-या केतकीने सायकोमेट्रिक चाचण्यांना अधिक काटेकोर बनविण्यामध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे, जेणेकरून मानसशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे अधिकाधिक संवेदनशील पदवीधर कंपनीसाठी उपलब्ध व्हावेत. गुंतवणूकदारांकडून मिळणा-या निधीतील बहुतांश निधी हा सध्या गुडफेलो मानवी भांडवलाची व्याप्ती वाढविण्यासाठी खर्च केला जात आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे, कारण एखाद्या व्यक्तीमधील सहानुभवाची पारख चटकन किंवा कर्मचारी नियुक्त करण्याच्या पारंपरिक पद्धतीद्वारे होऊ शकत नाही. नजिकच्या भविष्यामध्ये गुडफेलोजद्वारे प्रवासातील सोबतीही पुरविले जाणार आहेत. सुरक्षिततेच्या कारणापायी किंवा सोबत नसल्याने प्रवास करणे टाळणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकेल. अशाच प्रकारच्या किंवा अधिक खडतर आव्हानांचा सामना करणा-या दिव्यांग समुदायातील व्यक्तींनाही सेवेच्या कक्षेमध्ये सामावून घेण्याची कंपनीची योजना आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.