Loudspeaker Meeting : ‘अजान’चा भोंगा बंद का होणार नाही? गृहमंत्री वळसे-पाटलांनी कारणांची यादी वाचली, काकड आरती, भजन, यात्रा!

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, स्पीकरच्या बाबतीत असेही मत आले की, हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या असल्याने तो संपूर्ण देशाला लागू. त्यामुळे या संदर्भात केंद्र सरकराने राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला, तर प्रत्येक राज्यात वेगळी परिस्थिती राहणार नाही. अशी आवश्यकता असेल, तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटावे. भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करत त्यांनी हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलावला.

Loudspeaker Meeting : 'अजान'चा भोंगा बंद का होणार नाही? गृहमंत्री वळसे-पाटलांनी कारणांची यादी वाचली, काकड आरती, भजन, यात्रा!
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 2:40 PM

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अजानचा भोंगा बंद होणार नसल्याची भूमिका सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेतली. या बैठकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवली, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, बैठकीत अतिशय साधकबाधक चर्चा झाली. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच प्रयत्न करावेत, त्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी, अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही आलो आहोत. आता प्रश्न असा आहे की, लाउडस्पीकरचा वापर या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये निर्णय दिला आहे. त्यानंतर सुद्धा अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आहेत. त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकराने 2015 ते 2017 या कालावधीत काही जीआर काढले आहेत. त्याच्या आधारे लाउडस्पीकरचा वापर, त्याला द्यायची परवानगी, अटी-शर्थी, वेळ आणि डेसिबलच्या आवाजाची मार्यादा या गोष्टी स्पष्ट केल्यात. त्याच्या आधारे आजपर्यंत हा वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे काय होणार?

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये लाउडस्पीकर वापरासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डेडलाइन दिली आहे. मात्र, कायद्यामध्ये सरकारने असे भोंगे लावणे आणि उतरवणे याबाबत कोणतीही तरतूद नाही. ज्यांनी भोंगे लावले, त्यांनी त्या ठिकाणी त्याची काय ती काळजी घ्यायची हे महत्त्वाचे आहे. समजा आता अजनाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट्य समाजाबाबात भूमिका घेऊ. त्याचा इतरावर परिणाम होतो, असा उल्लेखही त्यांनी केला.

इतरांवर परिणाम काय?

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, आपण एखाद्या समाजाबद्दल भूमिका घेतली, तर त्याचा इतरांवर परिणाम होतो. कारण खेडेगावामध्ये रोज किंवा काही अंतरावर भजन, कीर्तन, पहाटेची काकड आरती सुरू असते. नवरात्रोत्सव, गणपती उत्सव असतात. गावाकडे यात्रा असते. या सगळ्या गोष्टींवर काय परिणाम होईल याची चर्चा केली. आपण कायदा समान मानला, तर सगळ्यांसाठी एक भूमिका घ्यावी लागेल, याचा उल्लेखही त्यांनी केला.

केंद्राने घ्यावा निर्णय

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. कायदा भंग झाला, तर पोलीस आवश्यक ती कारवाई करतील. स्पीकरच्या बाबतीत असेही मत आले की, हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या असल्याने तो संपूर्ण देशाला लागू. त्यामुळे या संदर्भात केंद्र सरकराने राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला, तर प्रत्येक राज्यात वेगळी परिस्थिती राहणार नाही. अशी आवश्यकता असेल, तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटावे. भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.