मुंबई : लाऊडस्पीकर वादानंतर दिल्लीतील जामा मशिदीने हा उपाय काढलाय…

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महाविद्यालयीन मुलांनीच या ऍप तयार करण्यात आमची मदत केली असल्याचंही खातिब यांनी म्हटलंय. या ऍपमध्ये इतरही अनेक खास फिचर्स असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये पब्लिक एड्रेस सिस्टमही ठेवण्यात आली आहे.

मुंबई : लाऊडस्पीकर वादानंतर दिल्लीतील जामा मशिदीने हा उपाय काढलाय...
नमाज पठणासाठी खास ऍप्लिकेशनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 3:20 PM

महाराष्ट्रात मशिदींवरील (Loudspeaker row) भोंग्यांचा वाद कमालीचा गाजला होता. हा वाद आता काहीसा शमला आहे. पण या वादाच्या पार्श्वभूमीवर एक इंटरेस्टिंग बातमी समोर आली आहे. बॉम्बे ट्रस्टच्या जामा मशिदीने (Jama Masjid) एक मोबाईल ऍप लॉन्च केलंय. या ऍपद्वारे (Mobile Application) नमाज पठणाच्या वेळेची माहिती देण्यात येणार आहे. मशिदींवरील भोंग्याच्या जो वाद सुरु झाला होता, त्याच्या पार्श्वभूमीवर हे ऍप साकारण्यात आलंय. या ऍपचं नाव AI Ishlaah असं आहे. या ऍपच्या माध्यमातून फक्त नमाज पठणाची वेळच नव्हे तर प्रार्थनेचं लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात येणार आहे. याआधीही अशाप्रकारचे ऍप अस्तित्त्वात होते. पण आता लॉन्च करण्यात आलेलं ऍप हे जास्त खास आहे. कारण या ऍपमध्ये नमाज पठणाचं लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय करण्यात आली आहे, जी या आधीच्या ऍप्समध्ये नव्हती. याआधीच्या ऍप्समध्ये रेकॉर्डेड प्रार्थना दाखवली जात होती. मात्र AI Islaah या ऍपमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचं ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलंय.

काय काय आहे ऍपमध्ये?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रस्टचं असं म्हणणं आहे की, प्रार्थनेसाठी लोकांना बोलावणं, ही मुस्लिम धर्मात सांगितली गेलेली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आता तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रार्थना पोहोचावी, या उद्देशाने अनेक गोष्टींची काळजी ऍपमध्ये घेण्यात आली आहे.

मशिदीच्या ट्रस्टचे चेअरमन शोएब खातिब यांनी म्हटलंय की….

हे सुद्धा वाचा

सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या लाऊडस्पीकरच्या मार्गदर्शक सूचना या फक्त अजानसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच आहेत. पण एका पक्षाद्वारे राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना टार्गेट करण्याचा मुद्दा उठवण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या वादंगामुळे आम्ही बैठकीतून यावर तोडगा काढण्यासाठी कोणकोणते पर्याय असू शकतात यावर विचार केला. सगळ्यात आधी आम्ही एक रेडिओ फ्रिकव्हेन्सी घेण्याचा विचार केला होता. पण त्यासाठी अनेक परवानग्या घेण्याची गरज भासते. त्यामुळे आम्ही अखेर ऍप तयार करायचं ठरवलं. या ऍपमध्ये तुम्ही सकाळची अजान ऐकू शकता, जिला लाऊडस्पीकरवर लावण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच विरोध झाला होता.

ऍप साकारण्यात महाराष्ट्राचा वाटा

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महाविद्यालयीन मुलांनीच ऍप तयार करण्यात आमची मदत केली, असंही खातिब यांनी म्हटलंय. या ऍपमध्ये इतरही अनेक खास फिचर्स असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये पब्लिक एड्रेस सिस्टमही ठेवण्यात आली आहे. याच्या द्वारे लोकं मशिदीच्या ट्रस्टमधील लोकांना माहितीही पुरवू शकतात. आपआपल्या स्थानिक प्रतिनिधींना प्रश्नही विचारण्याची सोय यात करण्यात आली आहे. शुक्रवारी केली जाणारी जुम्माची नमाजही या ऍपच्या मदतीने करता येऊ शकेल. AI Islaah हे ऍप ऍपल आणि ऍनड्रॉईड असं दोन्हीवर एव्हेलेबल आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.