Tv9 EXCLUSIVE | महाविकास आघाडीत कोण कोणत्या मतदारसंघातून लढेल? वाचा संपूर्ण यादी

महाविकास आघाडीच्या गोटातली इनसाईड बातमी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. महाविकास आघाडीचं जवळपास 40 जागांवर एकमत झालंय. पण अद्यापही 8 जागांचा तिढा कायम आहे. या जागांवर आता तीनही पक्षांचे प्रमुख चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Tv9 EXCLUSIVE | महाविकास आघाडीत कोण कोणत्या मतदारसंघातून लढेल? वाचा संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 10:00 PM

निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीची आज जागावाटपाबात शेवटची आणि महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. अनेक जागांचा तिढा सुटला आहे. तरीही लोकसभेच्या जवळपास 8 जागांवरील तिढा अद्यापही सुटलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघात कुणाला जागा सुटली आहे याबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. सूत्रांकडून जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतली आतली बातमी देण्यात आली आहे. या बातमीनुसार, आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार शिवसेना ठाकरे गटासाठी आतापर्यंत 15 जागांचा निर्णय झाला आहे. तसेच हातकणंगलेची जागा ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला तयार आहे. तर अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार आहे. राष्ट्रवादीसाठी 8 जागांचा निर्णय झालाय. काँग्रेससाठी 14 जागांचा निर्णय झाला. तर 8 जागांसाठी अजूनही तिढा कायम आहे. आता याबाबत थेट तीनही पक्षांचे प्रमुख निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार? वाचा यादी

  • १) रामटेक – तिढा कायम
  • २ ) बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट
  • ३) यवतमाळ वाशिम -शिवसेना ठाकरे गट
  • ४) हिंगोली – तिढा कायम
  • ५) परभणी -शिवसेना ठाकरे गट
  • ६) जालना -तिढा कायम
  • ७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट
  • ८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट
  • ९) पालघर -शिवसेना ठाकरे गट
  • १०) कल्याण – शिवसेना ठाकरे गट
  • ११) ठाणे – शिवसेना ठाकरे गट
  • १२) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम
  • १३) मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट
  • १४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट
  • १५) मुंबई दक्षिण मध्य – तिढा कायम
  • १६) रायगड -शिवसेना ठाकरे गट
  • १७)रत्नागिरी सिंधुदुर्ग – शिवसना ठाकरे गट
  • १८) मावळ -शिवसेना ठाकरे गट
  • १९) शिर्डी – तिढा कायम
  • २०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट
  • २१) कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट
  • २२) हातकणंगले – ( ठाकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)
  • २३) अकोला – ( ठाकरे वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार)
  • २४) शिरूर – राष्ट्रवादी
  • २५) सातारा -राष्ट्रवादी
  • २६) माढा- राष्ट्रवादी
  • २७) बारामती -राष्ट्रवादी
  • २८) जळगाव -राष्ट्रवादी
  • २९) रावेर -राष्ट्रवादी
  • ३०)दिंडोरी -राष्ट्रवादी
  • ३१) बीड -राष्ट्रवादी
  • ३२) अहमदनगर -राष्ट्रवादी
  • ३३) अमरावती -काँग्रेस
  • ३४) भंडारा – काँग्रेस
  • ३५) चंद्रपूर -काँग्रेस
  • ३६) गडचिरोली – काँग्रेस
  • ३७) नांदेड -काँग्रेस
  • ३८) लातूर -काँग्रेस
  • ३९) धुळे -काँग्रेस
  • ४०) नंदुरबार -काँग्रेस
  • ४१) पुणे -काँग्रेस
  • ४२) सोलापूर – काँग्रेस
  • ४३) सांगली -काँग्रेस
  • ४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस
  • ४५) मुंबई उत्तर -काँग्रेस
  • ४६) भिवंडी -तिढा कायम
  • ४७) वर्धा- तिढा कायम
  • ४८) नागपूर -काँग्रेस
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.