Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला

ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 5:15 PM

मुंबई: ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्याकडे 171 आमदार असून आमचे सरकार दमदारपणे काम करत आहे. मागेही मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. पण या सरकारने वर्षपूर्ती पूर्ण केली असून सरकारला कोणताही धोका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधत राज्यातील विविध विषयांवर आपलं मत मांडलं. सरकार पडेल म्हणून काही लोक पहिल्या दिवसापासून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आमच्याकडे 171 आमदार आहेत. सरकारला काहीही धोका नाही. गेल्यावर्षी मार्चमध्येही सरकार पडण्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. त्यानंतरही आम्ही दमदारपणे काम करत असून हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

सुडाचं राजकारण दुर्देवी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दुर्देवी बाब आहे. सुडाचं राजकारण कोणीही करू नये, द्वेषाचं हे राजकारण दीर्घकाळ टिकत नसं, असं त्यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. त्यात कोणी जिंकतो तर कोणी पराभूत होत असतो. भाजपला लोकांनी विरोधात बसवलं असून महाविकास आघाडी लोकहिताचे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागे या

गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. केंद्राने दोन पावलं मागे यायला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच सुरू होईल. या विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं उचित आहे. राज्यासाठीचं बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे मोठ्या वास्तूंना राज्यातील मोठ्या व्यक्तींची नावे आपण देत असतो. आम्हाला ही या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं असं वाटतं, असंही ते म्हणाले. (Maha Vikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

क्लस्टर योजना हा क्रांतीकारी योजना

ठाण्यात क्लस्टर योजना लागू करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. क्लस्टर डेव्हल्पेमेंट प्रत्यक्षात कार्यन्वित झालं पाहिजे. यासाठी ठाण्यातील विविध भागात बैठका सुरू आहेत. लाखो ठाणेकरांच्या जीवणमरणाचा विषय असल्याने ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी शेवटी सांगितलं. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

संबंधित बातम्या:

मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला, संजय राऊत बिथरल्याची टीका

काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

शिवसेनेचा वकील मंत्री संजय राऊतांच्या भेटीला; ED नोटीसच्या कायदेशीर बाबींवर चर्चा

(Maha Vikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.