Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election: पहिलं मत सचिन अहिरांना, दुसरं मत…?, आघाडीचं मतदानाचं सूत्रं ठरलं?; शिवसेनेची नाराजी दूर होणार?

Maharashtra MLC Election: राज्यसभा निवडणुकीची विधान परिषद निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीने मतदानाचं सूत्रं ठरवलं आहे. या सूत्रानुसार शिवसेनेचे सचिन अहिर यांना पहिल्या पसंतीचं मतदान केलं जाणार आहे. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मत टाकण्यात येणार आहे.

Maharashtra MLC Election: पहिलं मत सचिन अहिरांना, दुसरं मत...?, आघाडीचं मतदानाचं सूत्रं ठरलं?; शिवसेनेची नाराजी दूर होणार?
पहिलं मत सचिन अहिरांना, दुसरं मत...?, आघाडीचं मतदानाचं सूत्रं ठरलं?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 11:51 AM

मुंबई: विधान परिषदेची निवडणूक  (Maharashtra MLC Election) उद्या होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने (bjp) जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून ही तयारी करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्याचाही या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. तसेच आघाडीने उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचं सूत्रंही ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आघाडीने ठरवलेल्या सूत्रानुसार मतदान झाल्यास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांचं मार्गदर्शन आघाडीच्या नेत्यांना राहणार असल्याचं सांगण्यात येतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीची विधान परिषद निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीने मतदानाचं सूत्रं ठरवलं आहे. या सूत्रानुसार शिवसेनेचे सचिन अहिर यांना पहिल्या पसंतीचं मतदान केलं जाणार आहे. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मत टाकण्यात येणार आहे. तर आमशा पाडवी यांनी सातव्या पसंतीचं मत देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते मिळवून सचिन अहिर हे विजयी होणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तर, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या ऐवजी निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आकडेवारीनुसार एकनाथ खडसे यांचा विजय सोपा मानला जात आहे. मात्र, भाजपच्या रडारवर खडसे असल्याचं सांगण्यात येत असल्याने राष्ट्रवादीने खडसें ऐवजी निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मत देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

दरम्यान, काँग्रेसने भाई जगताप यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेनेकडे अतिरिक्त चार मते आहेत. ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवला आहे. ही चार मते गेम चेंजर ठरू शकतात, त्यामुळे काँग्रेसने हा दबाव वाढवला आहे. त्यासाठी काँग्रेसच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते या चार अतिरिक्त मतांबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला मत का द्यायचं?

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करण्याबाबतची ताठर भूमिका घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवारांना मतदान केलं नाही. मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान का करायचं? असा सवाल शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पेच निर्माण झाला आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.