महाविकास आघाडीची महारणनीती, पडद्यामागे हालचाली वाढल्या, राजकारणात मोठं काहीतरी घडणार?

महाविकास आघाडीच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. तीनही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षांकडून महत्त्वाची रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीची महारणनीती, पडद्यामागे हालचाली वाढल्या, राजकारणात मोठं काहीतरी घडणार?
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 9:55 PM

मुंबई | 28 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्य विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. या अधिवेशनानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्ताराला जास्त महत्त्व आहे. कारण शिंदे गटाच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत.या दरम्यान, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांच्या गोटात काही महत्त्वाच्या हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे. कारण गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेते असलेलेले अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. अजित पवार यांचं सत्तेत सहभागी होणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पटलेलं नाही. त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. शरद पवार यांचा गट हा महाविकास आघाडीत आहेत. ते भाजपच्या विरोधात आहेत. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेतून पायउतार करावं, अशी या गटाची भूमिका आहे. याचसाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली.

शरद पवार आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात भाजपचा कसा सामना करायचा याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे आगामी काळात काय रणनीती आखावी याबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

नाना पटोले यांची सूचक माहिती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरु होणार असल्याचं सांगितलं. पण नेमकं काय होणार आहे? याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. पण सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

मविआचे तीन प्रमुख नेते एकत्र सभा घेणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीचे 3 प्रमुख नेते एकत्र सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत सभेचा पुढचा अजेंडा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.