AAP BJP Video: महाराष्ट्रात ‘आप’चा बाप कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना? प्रसाद लाड यांचे नेत्याचं नाव घेत थेट आरोप

| Updated on: Mar 31, 2022 | 6:54 PM

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, ते तथ्यहीन असून राजकीय द्वेषापोठी आरोप केल्याचे सांगितले. त्या आरोपातून तथ्य नसल्याच्या कारणावरुन दरेकरांना वारंवार न्यायालयाकडून दिलासा जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

AAP BJP Video: महाराष्ट्रात आपचा बाप कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना? प्रसाद लाड यांचे नेत्याचं नाव घेत थेट आरोप
प्रवीण दरेकर यांच्यावर झालेले मुंबई जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे आरोप तथ्यहीन असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या विरोधात आम आदमी पार्टी (Aam Adami Party)जे आंदोलन केले आहे. त्या ‘आप’चा महाराष्ट्रातील बाप कोण ? असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केले. ‘आप’च्या माध्यमातून सत्ताधारी शिवसेना दरेकर यांच्यावर आरोप करत आहे. ‘आप’चे समन्वयक धनंजय शिंदे यांनी जे पत्र दिले आहे त्या पत्रावर सह्या कोणाच्या आहेत त्या पाहिल्यावर लक्षात येईल की, ‘आप’ने कोणाच्या सांगण्यावरुन हे आंदोलन केले आहे. ज्या पत्रकावर सह्या करण्यात आल्या आहेत, त्यावर शिवसेनेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची सही असून त्यांच्या निर्देशावरुन ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केला आहे.

ज्या प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहे तो ‘आप’ हा शिवसेनेचा डमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही कारवाईची मागणी करण्यात आल्याचे लाड यांनी मत व्यक्त केले आहे

राजकीय द्वेषापोठी आरोप

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, ते तथ्यहीन असून राजकीय द्वेषापोठी आरोप केल्याचे सांगितले. त्या आरोपातून तथ्य नसल्याच्या कारणावरुन दरेकरांना वारंवार न्यायालयाकडून दिलासा जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राती आपचा बाप कोण हा सवाल जर उपस्थित झाला तर त्याचे उत्तर हे शिवसेना आहे असा जोरदार हल्ला त्यांनी शिवसेनेवर चढवला आहे.

भ्रष्टाचार होते ती संस्था मोठी होत नाही

यावेळा त्यांनी सांगितले की, प्रवीण दरेकर यांनी 10 हजार कोटीपासून १२ हजारपर्यंत वृद्धी केली आहे. ज्या संस्थेत भ्रष्टाचार होतो ती संस्था कधीच मोठी होत नाही असेही त्यांनी सांगितले. दरेकर यांच्यावर 2 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे, मात्र ज्या बँकेचा नफाच 15 कोटीचा आहे, त्या बँकेत 2 हजारचा भ्रष्टाचार होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

यावेळी त्यांनी मुंबई बँकेची निर्मितीची कारणं सांगितली ते म्हणाले की, ज्या मुंबई जिल्हा बँकेची निर्मिती झाली त्याचे मुख्य तात्पर्य होते शेतकरी आणि मच्छीमार, मात्र शहराचा विकास झाल्याने शेतकरी नाहासे झाले म्हणून गृहनिर्माण संस्था, गिरणी कामगारांच्या घरांसाठी कर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया ज्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी करण्यात आहे त्यामुळे मुंबई जिल्हा बँकेच्या मदतीने गिरणी कामगारांना कर्ज देण्यात आली.

लहान मोठ्या उद्योगांना मदत

बंद पडणारे साखर, राज्यातील शेती उद्योग बंद पडत असताना मुंबई जिल्हा बँकेने पुढाकार घेऊन असे लहान मोठे उद्या त्यांना मदत केली. ज्या काळात शिक्षकांचे वेळेवर पगार झाले नाहीत त्यावेळी शिक्षकांना 1 तारखेला आगाऊ पगार देण्याचं काम मुंबई बँकेने केले आहे. हे काम ज्या प्रवीण दरेकर यांच्या काळात झाले, असे काम करणाऱ्या माणसांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. मजूर म्हणून हिणावयचं काम राजकीयद्वेषातून टीका करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितेल.

जिल्हा बँकेत चार लाख मजूर

प्रवीण दरेकर यांच्यावर जे मुंबई बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आला तो निषेधार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले.  राज्यात विविध जिल्ह्यात साडे अकरा हजार मजूर संस्था आहेत. त्या मजूर वर्गातूनच दोन संचालक जिल्हा बँकेवर निवडून जातात. राष्ट्रवादी पक्षातील नेते, त्यांचे नातेवाईक हे मजूर संस्थेतून मुंबई जिल्हा बँकेवर निवडून आले आहेत. असे चार लाख मजूर जिल्हा बँकेत नोंदवले गेले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील संचालकांवर गुन्हा

त्यामुळे ही चार लाख कुटुंबांचा रोजगार जिल्हा बँकेवर अवलंबून आहे. त्यामुळे ज्या प्रकारे प्रवीण दरेकरांवर गुन्हा नोंदवला गेला तर प्रत्येक जिल्ह्यातील संचालकांवर गुन्हा नोंदवला जाणार का आणि नोंदवलेल्या गुन्ह्यावर सरकार कारवाई करणार का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे दरेकर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे ते सगळे प्रकरण हे गौडबंगाल आहे. त्यामुळे या प्रकारात आपचा बाप कोण हा सवाल उपस्थि होता, त्यामुळे आपचा बाप कोण तर तो शिवसेना असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली.

संबंधित बातम्या

हायकोर्टाचा अवमान 8 आयएएस अधिकाऱ्यांना महागात, 14 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावताच ऑफिसर नरमले, नेमकं प्रकरण काय?

Video : अंबरनाथमध्ये चोराचं कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा, चोरीची स्टाईल बघून कपाळावर हात माराल

The Kashmir Filesचा मोठा विजय; विवेक अग्निहोत्रींनी ट्विट करत दिली माहिती