ठाकरे गटाचा थेट पोलीस महासंचालकांना 1500 रुपयांचा ‘लाडकी बहीण’चा चेक, नेमकं प्रकरण काय?

राज्यात 'लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी' या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि युवासेना कार्यकारीणी सदस्या यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाने रश्मी शुक्ला यांना लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा प्रतिकात्मक चेक देवू केला.

ठाकरे गटाचा थेट पोलीस महासंचालकांना 1500 रुपयांचा 'लाडकी बहीण'चा चेक, नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटाचा थेट पोलीस महासंचालकांना 1500 रुपयांचा 'लाडकी बहीण'चा चेक
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 7:47 PM

बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे बदलापुरात तीव्र पडसाद उमटले. नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं. बदलापूरच्या नागरिकांनी काल दिवसभर लोकल सेवा ठप्प केली. या आंदोलनात सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधण्यात आला होता. लाडकी बहीण योजना नको पण महिला आणि मुलींना सुरक्षा द्या, असं काही आंदोलकांनी पोस्टरवर झळकवलं होतं. आंदोलकांचं हे कृत्य सरकारच्या जास्त जिव्हारी लागलं. हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप सरकारकडून केला जातोय. असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा प्रतिकात्मक चेक देण्याचा प्रयत्न केला. पण रश्मी शुक्ला यांनी तो चेक स्वीकारला नाही.

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात आणि विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात ‘लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी’ या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि युवासेना कार्यकारीणी सदस्या यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.

राज्याच्या महिला सुरक्षिततेसाठी लाडक्या बहिणीचा प्रतिकात्मक चेक पोलीस महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देऊ केला. मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि या घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलीस, शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

अंबादास दानवे काय म्हणाले?

पोलीस महासंचालकांच्या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या सरकार उघड्या डोळ्याने बघत आहे. या घटना रोखण्यास पोलीस दल कुचकामी ठरलं आहे. तसेच या घटना रोखण्यास महायुतीचे सरकार देखील अपयशी ठरले आहे”, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच “या घटनेवरून राजकारण सुरू आहे, असं म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता उत्तर देण्यास सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार ऋतुजा लटके, उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर व उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या शीतल देवरुखकर – शेठ, रंजना नेवाळकर, प्रवक्त्या व उपनेत्या संजना घाडी, युवासेना कार्यकारिणी सदस्या ऍड. गुरशीन कौर सहानी, धनश्री कोलगे, अश्विनी पवार, राजोल पाटील, दिक्षा कारकर, धनश्री विचारे आदी उपस्थित होत्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.