Mahayuti Manifesto 2024 Maharashtra: अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान…सावरकर, बाळासाहेब ठाकरेंबाबत काँग्रेसने दोन शब्द…

Maharashtra Assembly Election 2024 BJP Manifesto: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का? असे आव्हान अमित शाह यांनी दिले.

Mahayuti Manifesto 2024 Maharashtra: अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान...सावरकर, बाळासाहेब ठाकरेंबाबत काँग्रेसने दोन शब्द...
अमित शाह, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 12:28 PM

Maharashtra Assembly Election 2024 BJP Manifesto: महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संकल्पपत्र रविवारी आले. भाजप संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का? असे आव्हान अमित शाह यांनी दिले. उद्धवजी तुम्ही कोणासोबत बसला आहात, जी लोक कलम ३७० ला विरोध करत आहे, जी लोक राम मंदिरास विरोध करतात, जी लोक सावकरसंदर्भात चांगले बोलू शकत नाही?संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा, असे अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले.

काश्मीरमध्ये प्रथमच राज्य घटनेनुसार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्र अनेक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. मजबूत, समृद्ध आणि सुस्कृंत महाराष्ट्रासाठी संकल्पपत्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेनुसार काश्मीरमध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते.

गरीबांचे कल्याण, महिलांचा सन्मान

ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झाले ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचे नेतृत्व करत आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचे आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली.

हे सुद्धा वाचा

आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान, गरीबांचे कल्याण करण्याचे म्हटले आहे. आम्ही महिलांचा सन्मान करण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत. आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. आमच्या संकल्पपत्रता मजबूत महाराष्ट्र कसा होईल हे पाहिलं आहे. निवडणुकीत आमचा मुकाबला आघाडीशी आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांना विचारधारेशी घेणेदेणे नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्यावर हल्ला

शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे.

Non Stop LIVE Update
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.