विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी, राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात

maharashtra assembly election 2024: अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. त्या मतदार संघांचा आढावा घेतला आहे. मतदार संघाचा दौरा करणाऱ्या या नेत्यांची मुंबईत भाजप मुख्यालयात बैठक झाली.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी, राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात
भाजप
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 12:53 PM

BJP Meeting on maharashtra assembly election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरु झाली आहे. युती आणि आघाड्यांची जागा वाटपासाठी चर्चा सुरु आहे. त्याचवेळी निवडणूक सूत्र आणि प्रचाराची जबाबदारी वाटली जात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सूत्रे पडद्यामागून हलवणार आहेत. त्यासाठी विविध राज्यातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

भाजप मुख्यालयात बैठक

अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. त्या मतदार संघांचा आढावा घेतला आहे. मतदार संघाचा दौरा करणाऱ्या या नेत्यांची मुंबईत भाजप मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रभारी भुपेंद्र यादव, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, माजी मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर नेते सहभागी झाले. ज्या जागा भाजपकडेच राहणार आहे, त्या ठिकाणावरची रणनीती या नेत्यांकडून आखली जात आहे. तसेच महायुतीमधील पक्षांना मदत करुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी नियोजन केले जात आहे.

सरकारच्या योजनांची माहिती

विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचार मैदानात उतरणार आहेत. तसेच बड्या नेत्यांवर विशिष्ट मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. त्यात लाडकी बहीण सारख्या योजनेत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग करुन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार गटाचा अहवाल दोन दिवसांत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गोळा केलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्राथमिक अहवाल दोन दिवसांत सादर होणार आहे. हा अहवाल येत्या गुरुवारपर्यंत प्रदेश कार्यलयाला मिळणार आहे. त्यानंतर पक्षाची ताकद आणि संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे. पहिल्या अहवालानंतर दुसरा अहवाल लगेच दिला जाणार आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.