Maharashtra Assembly Election Voting : 288 जागांसाठी आज मतदान; 4 हजार 136 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Assembly Election 2024 Voting : आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे. 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला या निवडणुकीत पणाला लागली आहे. वाचा...

Maharashtra Assembly Election Voting : 288 जागांसाठी आज मतदान; 4 हजार 136 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 8:51 AM

राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होणार आहे. 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 158 पक्ष यंदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष 2 हजार 086 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. बारामती, इंदापूर, दौंड, नांदेड येवला, कवठे- महांकाळ, माहिम, वरळी, कराड दक्षिण, कोल्हापूर उत्तर, परळी या मतदारसंघातील लढतींकडे सगळ्याचं लक्ष आहे.

पुण्यात ८८ लाख मतदार मतदान करणार

पुणे जिल्ह्यात ८८ लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांना सहज सुलभ मतदान करता यावे, म्हणून जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील ८८ लाख ४९ हजार मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८,४६२ मतदान केंद्र आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी मतदार यादीतील नाव शोधण्यापासून ते दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात सकाळपासून रांगा लागलेल्य आहेत. मॉर्निंग वॉक करून अनेक मतदार मतदानासाठी दाखल झाले आहेत. कोथरूडमधला आमदार जातीयवादी नको, अशी अनेक मतदारांनी टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूरमध्ये 184 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. सोलापूर जिल्ह्यात एकूण 184 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 6, शिवसेना शिंदे गट 3, राष्ट्रवादी अजित पवार गट 2, काँग्रेस 4, शरद पवार 5, शिवसेना ठाकरे 3, वंचित 9, मनसे 5, माकप 1, एमआयएम 1, शेकाप 1 जागा लढत आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 19 लाख 71 हजार 831, स्त्रीया 18 लाख 76 हजार 728 तर 310 तृतीयपंथी मतदार आहेत. 2019 तुलनेत 1 लाख 92 हजार 36 मतदार वाढले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण 3 हजार 738 मतदान केंद्र आहेत त्यापैकी शहरात 1183 तर ग्रामीण भागात 2555 केंद्र आहेत.

नाशकात १९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. नाशिक जिल्ह्यात १९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे, छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे, वसंत गीते विरुद्ध देवयानी फरांदे या लढतीकडे लक्ष आहे. देवळालीत महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने आहेत. तर मनसेचे जिल्ह्यात ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कडाक्याच्या थंडीत देखील नाशिककर मतदानासाठी बाहेर निघाले आहेत. मतदान केंद्रात बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा बल देखील तैनात आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या नऊ मतदार संघासाठी 165 तर लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. 27 लाख 87 हजार 947 मतदार बजावणार हक्क आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 747 मतदान केंद्र आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात आहेत. 13 लाख 39 हजार 697 मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १९९५ नंतर पहिल्यांदा अपक्ष मोठ्या प्रमाणावर रिंगणात आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.