शरद पवार गटाच्या याचिका फेटाळल्या, अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा निकाल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या गटाला सर्वात मोठा दिलासा दिला. अजित पवार यांचा गट हाच मूळ पक्ष असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला. तसेच अजित पवार गटाचे आमदार पात्र असल्याचाही निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.

शरद पवार गटाच्या याचिका फेटाळल्या, अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा निकाल
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 5:47 PM

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. पण आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करायचा असेल तर आधी मूळ पक्ष कोण आहे ते ठरवावं लागेल. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी आधी पक्ष कुणाचा याबाबतच्या निकालाचं वाचन आधी केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काय-काय घडलं, या विषयी राहुल नार्वेकर यांनी निरीक्षण नोंदवलं. विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदारांचं पाठबळ आहे. पक्षीय रचना पाहता कुठला गट हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे प्रथमदर्शनी सांगता येणार नाही. पण विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष आहे असे दिसते, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं. याच निरीक्षणाच्या आधारावर त्यांनी अजित पवार यांचा गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्ष आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा अजित पवार यांच्याकडे गेली आहे.

पक्ष कुणाचा? याबाबतचा निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. त्यांनी याबाबतच्या दाखल सर्व याचिका डिसमिस केल्या. त्यांनी अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला. त्यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळ्या. यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.

विधानसभा अध्यक्षांचं अतिशय महत्त्वाचं निरीक्षण

विधानसभा अध्यक्षांनी यावेळी अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. “नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही”, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

“विविध राज्यातीस अशा प्रकरणातील दाखले पाहता विधीमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली आणि सरकार पडले तर तो पक्षाविरुद्ध कार्यवाही होत नाही. कारण त्या पक्षास पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी असते. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे”, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं.

“पक्षाच्या निर्णय क्षमतेत प्रत्येक सदस्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याचा अर्थ त्या सदस्याने अधिसूची 1o चे उल्लंघन केले असा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व सदस्य त्यांच्या ठिकाणी काम करत आहेत. या प्रकरणात दहाव्या सूचीचा अर्थ पक्षाचे सदस्य सोडल्याप्रमाणे वापरता येणार नाही. माझ्या मते लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पक्षातील बेशिस्तीसाठी शेड्युल्ड १०चा वापर करता येणार नाही”, असंही निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं. दहाव्या सुचीचा वापर हा पक्षातील बहुमताला धमकावण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.