शिवसेनेच्या निकालाचे निकष राष्ट्रवादीला लागू होणार की नाहीत?; विधानसभा अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय. शिवसेनेचा जो निकाल राहुल नार्वेकरांनी जाहीर केलाय त्याच निकालाचे निकष राष्ट्रवादीच्या प्रकरणासाठी असतील का? असा प्रश्न नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

शिवसेनेच्या निकालाचे निकष राष्ट्रवादीला लागू होणार की नाहीत?; विधानसभा अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 8:47 PM

मुंबई | 11 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘रोखठोक’ कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी नार्वेकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना त्यांनी जाहीर केलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांनी प्रत्येक प्रश्नावर मुद्देसूद उत्तर दिलं. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. राहुल नार्वेकर यांच्या या निकालाची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा हाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी लागू होणार का? असा प्रश्न नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“तो मुद्दा ठरवणं आवश्यक आहे की नाही बघावं लागेल. मला वाटतं निवडणूक आयोगाकडचा निर्णय वादाच्या आधी झाला नव्हता. राष्ट्रवादीचे फॅक्ट वेगळे आहेत, ते बघावे लागतील. मी काही बघितले नाही. पण निकष काही बदलणार नाहीत. कायदा काही बदलणार नाही. पण फॅक्ट्स हे केस टू केस वेगळे असू शकतात. त्या बेसिसवर नियम लागू करावा लागेल”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

‘तर कोर्टाचा जो निर्णय असेल तो देशाचा लॉ होईल’

तुमच्यावर काही दबाव होता का? या निकालाचा दाखला दिला जाईल म्हणून? असा प्रश्न नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “प्रथा, परंपरा आणि पायंड्यातून कायदे बनतात आणि विधीमंडळातही बनतात. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर तो सर्वत्र लागू होतो. त्यामुळे हा निर्णय गाइडिंग फोर्स आणि बायडिंग फोर्स म्हणून काम करेल. चॅलेंज झाला नाही तर प्रेसिंडेंट बनेल. चॅलेंज झाला आणि तो अपहोल्ड झाला तर तो प्रेसिडेंट म्हणून कॅरिफॉरवर्ड होईल आणि ओव्हरुल झाला तर कोर्टाचा जो निर्णय असेल तो देशाचा लॉ होईल”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरही सुनावणी होणार

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणीदेखील शिवसेनेसारखीच पार पडणार आहे. या सुनावणीतही दोन्ही गटाचा युक्तिवाद आणि उलटसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. पण राष्ट्रवादीच्या केसमध्ये चित्र काहीसं वेगळं आहे. राष्ट्रवादीचा वादावर निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या सुनावणीला उपस्थित राहायचे. तसेच ते राहुल नार्वेकरांच्या सुनावणीलादेखील उपस्थित राहू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अपात्रतेचा निकाल कसा लागणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.