बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख, बंद मोडून काढणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच; राऊतांचा इशारा

बंद मोडून काढण्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (maharashtra bandh 100 percent success, says sanjay raut)

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख, बंद मोडून काढणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच; राऊतांचा इशारा
sanjay raut
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 10:25 AM

मुंबई: राज्यातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, त्यामुळेच हा बंद आहे. पण बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका करतानाच बंद मोडून काढण्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना बंद मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. आमचा बंदला पाठिंबा नाही अशी कोणी राजकीय विधान करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत का?, या देशातील शेतकऱ्यांचे देण लागतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा. कोणी हा बंद मोडून काढू असं म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. कोणाला वाटत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू तर त्यांनी येऊन दाखवावं. लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्राने त्याच्या थार गाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला अशी कुणाकडे एखादी जीपगाडी असेल तर त्यांनी रस्त्यावर आणावी, असा इशाराही त्यांनी दिला.

विरोधाचे कीडे वळवळत असतात

विरोधाचे कीडे वळवळत असतात. हा राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांसाठी बंद आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही तर हे गाड्या रस्त्यावर काढा म्हणतात ते उपाशी मरतील. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण एक दिवस बंद पुकारणार नसू तर जय जवान जय किसान या घोषणेला काहीच अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र शेतकऱ्यांची लढाई लढतोय

देशातील शेतकरी बंदकडे पाहत आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करताना 400 पेक्षा अधिक शेतकरी मरण पावले आहेत. हरयाणात भाजपच्या राज्यात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले आहे. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. म्हणून महाराष्ट्राने बंद पुकारला आहे. बंद सुरू आहे. बंद शंभर टक्के यशस्वी आहे, असं त्यांनी सांगितलं.

लोकांचा संताप समजून घ्या

बंद दरम्यान बसेस फुटतील. पण कोणत्या बसेस फुटल्या माहीत नाही. लोकांचा संताप समजून घेतला पाहिजे, असं सांगतानाच तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने बंद होण्याने उतरले आहेत. लोक बंदमध्ये उत्सफूर्तपणे उतरले आहेत. बंदमध्ये ज्या काही किरकोळ घटना घडतात त्या जगभरात होत असतात, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

तेव्हा तुमचे खासदार शेपूट घालून का बसले होते, मनसेचा एकाचवेळी ठाकरे-पवारांवर हल्ला, बंदला विरोध!

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच यांचा ‘चंदा’, आशिष शेलारांचा हल्लाबोल

Maharashtra bandh live updates | भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात बंद, प्रणिती शिंदे आक्रमक

(maharashtra bandh 100 percent success, says sanjay raut)

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.