भाजप तब्बल 36 जागा लढणार? मित्रपक्षांचाही पत्ता कट होण्याचे संकेत, बडे नेते दिल्लीला रवाना

महायुतीच्या जागावाटपात भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. भाजप तब्बल 36 हून जास्त जागा लढणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आता लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. यासाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.

भाजप तब्बल 36 जागा लढणार? मित्रपक्षांचाही पत्ता कट होण्याचे संकेत, बडे नेते दिल्लीला रवाना
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 5:56 PM

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 26 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. भाजप अंदाजे 36 पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्या जागांवर शिवसेनेचा खासदार आहे ती जागा आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाला केवळ 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाला बारामती, रायगड आणि मावळ या तीन जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आता जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

भाजपच्या कोअर कमिटीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रविण दरेकर दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत आज संध्याकाळी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहेत. या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीतल्या बैठकीत काय चर्चा होणार?

मुंबईतल्या बैठका आटोपल्यानंतर महाराष्ट्राचे भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप ज्या जागा मित्र पक्षांच्या घेणार आहे त्या ठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होणार आहे. तसेच काही जागांवर विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. त्याऐवजी त्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत चर्चा करुन निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीत दोन बैठका, शाह-शिंदे यांचा एकाच गाडीने प्रवास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या आज दोन बैठका झाल्या आहेत. बीकेसीत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अमित शाह यांची शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रावादीची बैठक अर्धवट सोडून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांच्या भेटीला गेले. सत्तेमध्ये घेताना दिलेलं आश्वासन पाळा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. अजित पवार, तटकरे, पटेल अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. तर शिंदे गट एवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. चर्चेमधून योग्य मार्ग निघेल. भाजप आम्हाला दिलेलं आश्वासन पाळेल, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.