Maharashtra Breaking News in Marathi : महेश गायकवाड कल्याण मध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून टायगर इज बॅकचे बॅनर
Maharashtra Breaking News in Marathi : आज 26 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि. 26 फेब्रुवारी 2024 | राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येण्यास निघाले आहे. काल त्यांचा भांबेरी या गावामध्ये मुक्काम आहे. आज पुन्हा त्यांचा प्रवास सुरु आहे. सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील सिद्धेश्वर आखाड्यात कुस्तीचा थरार रंगला आहे. राज्यभरातील 150 पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
उरणच्या चिरले गावाजवळ अरुंद पूल कोसळला
उरण (नवी मुंबई) : उरणच्या चिरले गावाजवळ अरुंद पूल कोसळला आहे. या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाला दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे
-
आयुष्मान योजना हा मोठा घोटाळा : केजरीवाल
आयुष्मान योजना हा मोठा घोटाळा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत सांगितले. या योजनेत कुटुंबाला कार्ड मिळते. 5 लाख रुपयांचा विमा दिला जातो. दाखल केले तर उपचार होतील, पण कोणी उत्तराखंडला गेले तर तेथे रुग्णालय उपलब्ध नाही. सरकारी रुग्णालये बंद करून त्यांचे खाजगीकरण करायचे आहे.
-
-
जम्मू-काश्मीर: काँग्रेस-एनसी आणि पीडीपीमध्ये जागावाटपावर चर्चा!
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. 28 फेब्रुवारीला युतीची घोषणा होऊ शकते.
-
राजा भैया राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणार
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील जनसत्ता दल लोकतांत्रिकचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी राज्यसभा निवडणुकीत जनसत्ता दलाचे मत भाजपाला आहे, असं सागितलं.
-
मथुरेत जळालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह, पोलीस तपास सुरु
मथुरा जिल्ह्यातील फराह-परखम रस्त्यावर सोमवारी जळालेल्या कारमधून एक अनोळखी मृतदेह सापडला असून तो पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. हा अपघात की कट होता हे स्पष्ट झालेले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. कारचा नंबर आग्रा येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे दर्शविते.
-
-
Mahesh Gaikwad | महेश गायकवाडचं जंगी स्वागत
कल्याण | कल्याणच्या दुर्गाडी चौकात महेश गायकवाड यांचं समर्थक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्या आलं. यावेळेस ‘टायगर इज बॅक’ अशा आशयाचे बॅनर हातात घेत समर्थकांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाके वाजवत स्वागत केलं. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात महेश गायकवाड वर गोळीबार केला होता. त्या महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर 24 दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
-
आम्ही मराठा आरक्षण दिलंय : प्रविण दरेकर
मुंबई | राज्य सरकारची भूमिका ही सगळ्यांना न्याय देण्याची आहे. आम्ही मराठा आरक्षण दिलंय. मनोज जरांगे पाटील जे बोलत आहे ते वक्तव्य बेताल आहे. त्यांना आरामाची गरज आहे, दोन दिवस नाही तर जास्त दिवस त्यांना आरामाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेलं विधान हे चुकीचं आहे. मला असं वाटतंय की त्यांना टार्गेट करणं आत्ता तरी बंद करावं. राज्यात अराजक कुणीही माजवता कामा नये, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
-
नागपूरमधून पिस्तूल आणि काडतुससह एकाला अटक
नागपूर : नागपूर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पिस्तूल आणि काडतुसह एकाला केली अटक आहे. संशयावरून तीन तरुणांचा पाठलाग करत असताना एका आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडील बॅगमध्ये 2 पिस्तूल आणि 9 काडतुस पोलिसांना आढळले. आशिष शर्मा असे आरोपीचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशचा आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून नागपुरात व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी ही टोळी आल्याची पोलिसांची माहिती आहे.
-
महेश गायकवाड यांना मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज
कल्याण : आ. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील जखमी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड यांचे समर्थक ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जमायला सुरवात झाली आहे. महेश गायकवाड सोबत जखमी झालेले राहुल पाटील हे ही रुग्णालयात दाखल झाले आहेत.
-
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचे धरणे आंदोलन
पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बेकायदा धंदे बंद करा. मयत शेतकऱ्यांच्या नावे बोगस पैसे काढून अपहार केलेल्या प्रांत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यासाठी ठाकरे गटाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन केले.
-
जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे, प्रकाश आंबेडकर
मुंबई : जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा निर्णय का घेतला आणि थांबण्याचा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतात. दुसरे कोणी भाष्य करू शकत नाही. कुठल्या कारणासाठी जाण्यासाठी निघाले आणि कुठल्या कारणासाठी ठेवण्यासाठी निघाले हे तेच सांगू शकतात. मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचे अण्णा पाटील होऊ द्यायचं नसेल तर त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
-
ठाकरे गटाला धक्का, प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
गायक सुरेश वाडकर यांनी सहकुटुंब घेतले साईंचे दर्शन
शिर्डी – गायक सुरेश वाडकर साई दरबारी. सुरेश वाडकर यांनी सहकुटुंब घेतले साई समाधीचे दर्शन. अनेक वर्षांनंतर सुरेश वाडकर साई दर्शनाला. साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
-
जरांगे पाटील हे राजकारणातले नवे नटसम्राट – प्रसाद लाड
जरांगे पाटील हे राज्यातील राजकारणातले नवे नटसम्राट झालेले आहेत, रोज उठतात आपली भूमिका बदलतात रोज नाटक करतात अशी टीका भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.
-
भिवंडी-आदिवासींच्या जमिनीवरील स्थानिकांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात
भिवंडी तालुक्यातील राहुर या गावात 23 भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना 1978 मध्ये तब्बल 80 एकर जमीन दिली होती. कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी अतिक्रमण केले होते. आज तहसीलदारांनी ती बांधकामे हटविण्यास सुरुवात केली आहे.
-
कल्याण-महेश गायकवाड सायंकाळी पत्रकार परिषद घेणार
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिवसेने शहर प्रमुख महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत बोलणार
-
कालचा प्रकार म्हणजे तमाशा- बारसकर
कालचा प्रकार म्हणजे तमाशा, असे थेट बारसकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका देखील केली.
-
जरांगेंनी माझी माफी मागावी- बारसकर
बारसकर यांनी परत एकदा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हेच नाही तर त्यांनी थेट जरांगेंनी माझी माफी मागावी असे म्हटले आहे.
-
आमदार संग्राम थोपटे यांचे मोठे विधान
महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपाचा फॉम्युला लवकर निश्चित केला जाणार आहे. मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच रहाणार, भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असल्याशिवाय यादीच पूर्ण होत नाही, मात्र मी कुठेही जाणार नाही, असे आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटले.
-
महेश गायकवाड यांना आज मिळणार डिस्चार्ज
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना आज मिळणार डिस्चार्ज. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सुरू होते उपचार. महेश गायकवाड सायंकाळी चार वाजता कल्याण मध्येयेणार
-
महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळणार
कल्याण- भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. महेश गायकवाड हे सायंकाळी चार वाजता कल्याणमध्ये येणार आहेत.
-
मराठा आरक्षणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी- नाना पटोले
मराठा आरक्षणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अंतरवाली सराटीत लाठीचार्जमागील कारणं कोणती आहेत, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
-
गोखले पुलाची एक मार्गिका आजपासून सुरू
अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं काम अखेर पूर्ण झालं आहे. आजपासून ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
-
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत अमळनेर इथल्या रेल्वे स्थानकाचाही होणार पुनर्विकास
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथल्या रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास होणार आहे. महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने अमृतभारत स्थानक योजनेअंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचंही भूमिपूजन होणार आहे. रेल्वे स्थानकासमोर भव्य मंडप टाकण्यात येऊन एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून ऑनलाईन सोहळा पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या अर्थसंकल्प मांडणार आहेत. अजित पवारांकडून पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांवर मंगळवारी चर्चा होणार आहे.
-
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरूवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरूवात होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आहेत. विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू.
-
अंबरनाथमध्ये नाट्यगृहाच्या शेजारी बांधलेल्या घरांना भीषण आग
अंबरनाथमध्ये नाट्यगृहाच्या शेजारी नवीन बांधलेल्या घरांना भीषण आग. सिलेंडरच्या स्फोटांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.
-
देशात मोठं संकट असतं तेव्हा मोदी फिरायला जातात – संजय राऊतांची घणाघाती टीका
पुलवामाचा हल्ला झाला तेव्हा मोदी फिरत होते. आता देशात शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू आहे तेव्हा ते स्कूबा डियव्हिंग करत होते. देशात मोठं संकट असतं तेव्हा मोदी फिरायला जातात, अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
-
फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – संजय राऊत
जरांगेचा बोलविता धनी कोण हे माहीत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
-
मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही – मनोज जरांगे पाटील
आम्ही शांततेत आंदोलन केलं मग गुन्हे दाखल का केले ? आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही का ? मला बोलावलं पण फडणवीसांनी घराचे दरवाजे बंद केले. मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही,असा इशार मनोज जरांगे यांनी दिला.
-
Live Update | कृषी उत्पन्न पणन अधिनियम विधेयकात सुधारणा प्रस्तावित…
कृषी उत्पन्न पणन अधिनियम विधेयकात सुधारणा प्रस्तावित… लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आज बंद… बंदमुळे बाजार समित्यांमधील 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प… कांद्याची निर्यातबंदी संपूर्ण हटवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची..
-
Live Update | शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल
शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल… जिल्हाप्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती… तर विजय करंजकर ठाकरे गटाचे लोकसभा संघटक… आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर फेरबदल… विजय करंजकर यांची लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित…
-
Live Update | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यात एसटी आणि इंटरनेट सेवा बंद
मराठवाड्यातील 3 जिल्ह्यात एसटी आणि इंटरनेट सेवा बंद… संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंद… धुळे सोलापूर महामार्गावरील एसटी सुविधा पूर्णपणे बंद… दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सुविधा बंद
-
Live Update | राज्यातील सर्व बाजार समित्यांनी पुकारला आज बंद
राज्यातील सर्व बाजार समित्यांनी पुकारला आज बंद… माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी… माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळात नोकरी देण्याची मागणी… बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे विधेयक मागे घेण्याची मागणी.
-
Live Update | उपोषण स्थळी आलेल्या सर्व मराठा बांधवांनी आपल्या घरी जावे – जारांगे पाटील
उपोषण स्थळी आलेल्या सर्व मराठा बांधवांनी आपल्या घरी जावे… उद्या निर्णय घेऊ… शांततेत आंदोलन हाताळायचे आहे… कायद्याचे पालन करू… पत्रकार परिषद घेऊ… असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. सध्या जरांगे यांची तपासणी करत आहेत.
-
Manoj jarange Patil | मुंबईला येण्याचा निर्णय स्थगित
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येण्याचा निर्णय स्थगित केलाय. ते पुन्हा अतरवाली सराटीकडे निघाले आहेत. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती.
-
Manoj jarange Patil | फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये
फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. एकही मराठा अडचणीत येता कामा नेय. मराठ्यांनी शांत रहाव, माझ आवाहन. दोन तासात निर्णय घेणार आहे. बैठक अंतरवली सराटीत होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
-
Manoj jarange Patil | अंबडमध्ये संचारबंदी लावण्याच कारण काय?
“सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करावीच लागेल. याचा परिणाम मराठ्यातच नाही, सगळ्या जाती-धर्मात होणार. आजच्या आज सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करा. तुझ्याशिवाय कलेक्टर संचारबंदीचा आदेश काढू शकत नाही. विचार करुन पुढच पाऊल टाकणार. रात्रीचा डाव मोडला. आपण सगळ्यांना एकविचाराने कराव लागेल. महिलांवर रात्री हात उचलायला लावणार होता. अंबडमध्ये संचारबंदी लावण्याच कारण काय?” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Manoj jarange Patil | देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही – मनोज जरांगे पाटील
भांबेरीत मराठा आंदोलक जमण्यास सुरुवात. “आम्हाला मुंबईकडे येऊ द्यायच नाहीय. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोड पुढे गेल्यावर होणार होता. म्हणून सकाळी निघण गरजेच होतं. कोणाकडे काहीच साहित्य नव्हतं. देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं. फडणवीसांनी रात्री बंदुकीचा फोटो टाकला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Maharashtra News | बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झाला. जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर बहिष्कार मागे घेतला आहे. सरकारने जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य शासन शासकीय कर्मचाऱ्यांना जे आदेश लागू करेल, तेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू होतील असे मान्य करण्यात आले.
-
Maharashtra News | भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक दाखल होत आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यातून मराठा आंदोलक भांबेरी गावामध्ये यायला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला येऊ नका असे आवाहन केले असले तरी आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही, असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News | मनोज जरांगे यांचे दोन सहकारी ताब्यात
मनोज जरांगे यांचे आंदोलक आणि सहकारी शैलेंद्र पवार आणि बलासाहेब इंगळे या दोघांना जालना पोलिसांनीताब्यात आहेत., हे दोघेही जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय सहभागी होते.
-
Maharashtra News | सोलापुरात कुस्तीचा थरार
सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील सिद्धेश्वर आखाड्यात कुस्तीचा थरार रंगला. राज्यभरातील 150 पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले.निर्झरा केअर फाउंडेशनतर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.
Published On - Feb 26,2024 7:10 AM