Maharashtra Marathi Breaking News Live | विद्रोही साहित्य संमेलन सुरू असताना अचानक मंडप कोसळला
Maharashtra Breaking News in Marathi : आज 3 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.3 फेब्रुवारी 2024 | कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या प्रकरणानंतर ठाणे आणि कल्याण परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज दिवसभर पुण्यात आहेत. सुप्रिया सुळे सकाळी कात्रज परिसरात विकास कामांची पाहणी करणार आहेत. आज संध्याकाळी प्रतापराव पवारांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत. अजित पवार यांनी आज सकाळीच पक्ष कार्यालयास भेट दिली. वेळ कमी असल्याने सकाळीच पक्ष कार्यालयात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
नितीश कुमार यांनी भाजपासोबत मोट बांधल्याने इंडिया आघाडीचा प्रश्नच नाही- केसी त्यागी
जेडीयु नेते केसी त्यागी यांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. नितीश कुमार बाहेर पडल्यानंतर या आघाडीचा काहीच उपयोग नाही. काँग्रेसच्या आडमुठेपणाचा हा परिणाम आहे. ममता बॅनर्जीनी वेगळं लढणार असल्याचं सांगितलं आहे. तर पंजाबमध्ये भगवंत मान यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे.
-
राहुल गांधी बाबा बैद्यनाथ धाममध्ये पोहोचले, लोकांकडून जोरदार घोषणाबाजी
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी झारखंडमधील देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये पोहोचले. राहुल गांधी जेव्हा पूजेसाठी बैद्यनाथ धाम मंदिरात पोहोचले तेव्हा आवारात उपस्थित लोकांनी घोषणाबाजी केली.
-
-
शिवसेनेचे दोन दिवसीय अधिवेशन १६, १७ फेब्रुवारी होणार
गोळीबार प्रकरणानंतर अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. कोल्हापूरला १६ आणि १७ फेब्रुवारीला अधिवेशन होणार आहे. पहिल्या दिवशी नेते, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुस-या दिवशी सायंकाळी सभा होणार आहे. या अधिवेशना करता जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी बाबत या अधिवेशनात होणार मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
-
मंडप कोसळल्याने आयोजकांसह नागरिकांची तारांबळ
अमळनेर | जळगावच्या अमळनेरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन सुरू असताना अचानक मंडप कोसळला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तीन सभागृह तयार करण्यात आलं आहे. साहित्यिकांच्या जेवणासाठी तयार करण्यात आलेला मंडप अचानक कोसळला. त्यामुळे आयोजकांसह नागरिकांची तारांबळ उडाली.
-
मुळशी डॅममधील पाणी पुण्याला देणार, अजित पवार यांची घोषणा
सोलापूर : आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सरकार आणले. मात्र एकनाथराव शिंदे आणि वेगळी भूमिका घेतली. नरेंद्र मोदी यांना देशभरामध्ये कोणी तोड नाही. मुळशी डॅममधील पाणी साताऱ्यात विजनिर्मितीसाठी दिले जाते पण आता आम्ही ते पाणी पुण्याला देणार आहोत अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
-
-
शिंदे गटाचे आमदार म्हणाले, कुठलाही बाप आपल्या मुलासाठी…
बुलढाणा : ही घटना गुन्हेगारीची नाही तर ती प्रॉपर्टी वादाची आहे. कुठलाही बाप आपल्या मुलासाठी मुलासाठी चिडू शकतो. अचानकपणे त्यांना साक्षात्कार होतो की, एकनाथ शिंदे यांच्या काळात गुन्हेगारी वाढली. यापूर्वी आम्ही सगळे एकत्र राहिलो त्यावेळी त्यांना शिंदे साहेब गुन्हेगार वाटले नाही? यापूर्वी त्यांनी कधी आरोप केले नाही, असा टोला आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना लगावला.
-
सुधा साने यांचा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सन्मान
जळगाव : अमळनेर मध्ये 97 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या साहित्य संमेलनाला दुसऱ्या दिवशी पूज्य साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने यांची उपस्थिती होती. या संमेलनात सुधा साने यांचा लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल देवून विशेष सन्मान करण्यात आला.
-
गणपत गायकवाड यांचा स्वभाव तापट, शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिक्रिया
मुंबई : गणपत गायकवाड यांचा स्वभाव तापट आहे. जी काही घटना घडली ती तपास करण्यासारखी घटना नाही. सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काही प्रवक्ते 10 गोळ्या झाडल्या असे म्हणतात. पण, एवढ्या गोळ्या झाडल्या नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काहीच वाद नाही. हे प्रकरण वैयक्तिक आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिली.
-
विद्रोही साहित्य संमेलनाने फुंकली तुतारी
जळगावच्या अमळनेरमध्ये 18 वे विद्रोही साहित्य संमेलन आज पार पडत आहे. या संमेलनात देशभरातून साहित्यिक हे सहभागी झाले असून सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या 54 वर्षीय साहित्यिकाचे एक वेगळी चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा येथील ५४ वर्षीय साहित्यिक फुलचंद नागटिळक हे गाडगेबाबांचे वेशभूषेत संमेलनात सहभागी झाले आहे.
-
अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांचे टोचले कान
अजित पवारांनी सोलापूरातील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. आपल्याला पक्षात एकजूट दाखवायची आहे.घरात देखील भांड्याला भांडे लागते पण त्याचा आवाज होऊ द्यायचा नाही. एकेमकांबद्दल आकस बुद्धीने पाहू नका. काहीही झाले तरी मनात वेगळा विचार आणू नका.शहर आणि ग्रामीण या दोन्ही कार्यालयातर्फे लोकांची कामे झाली पाहिजेत, असे ते म्हणाले.
-
आमदार गणपत गायकवाड यांना करणार हजर
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात न्यायालयाने व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याची विनंती फेटाळण्यात आली. थोड्याच वेळात भाजपा आमदार गणपत गायकवाड ,हर्षल केणे, संदीप सरवणकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
माजी आमदार राष्ट्रवादीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार आणि सोलापूरचे नेते रविकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
-
प्रकाश आंबेडकर यांची भुजबळांवर टीका
प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. मला ज्या ज्या ओबीसी महासंघाने बोलावलं त्याच्या सभेला मी गेलो. मराठा समाज आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून माझा प्रयत्न असेल. काही ओबीसी नेत्यांना ती तेढ जाणीवपूर्वक निर्माण करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्ता द्या आम्ही तोडगा देतो, असे ते म्हणाले.
-
पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृषण अडवाणी यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ही भेट होण्याची शक्यता आहे. आजच अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लालकृषण अडवाणी यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यात येणार.
-
आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्कार मिळणे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान आहे – विनोद तावडे
आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्कार मिळणे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, देशाचा सन्मान असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
-
तळेगाव ढमढेरे येथे ओबीसींचे संजय गायकवाड यांच्या फोटोलो जोडे मोरो आंदोलन
आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्याच्या तळेगाव- ढमढेरे येथे ओबीसी समाजाने संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारीत आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले.
-
महाविकास आघाडीचे जागावाटप 10 तारखेला निश्चित होणार – सतेज पाटील
महाविकास आघाडीचे जागावाटप 10 तारखेला निश्चित होणार असल्याची माहीती काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली आहे.
-
पुणे विद्यापीठ संघटना वादाप्रकरणात विद्यापीठ कायद्यानूसार कारवाई – कुलगुरु
पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात काल झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या वादात विद्यापीठ कायद्यानूसार योग्य कारवाई करण्यात येईल असे कुलगुरु सुरेश गोसावी यांनी म्हटले आहे.
-
महेश गायकवाड याच्यावरील गोळीबाराचे सीसीटीव्ही पुढे
शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून आता या प्रकरणातील एक सीसीटीव्ही पुढे आलाय. यामध्ये महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड हे गोळ्या झाडताना दिसत आहेत. हा सीसीटीव्ही पुढे आल्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय.
-
विद्यार्थ्यांनी निवेदन देत केली मोठी मागणी
ABVP च्या विद्यार्थ्यांकडून कुलगुरूंना निवेदन. काल झालेल्या गोंधळानंतर ABVP च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू सुरेश गोसावी यांना दिल निवेदन. दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन
-
एकनाथ शिंदे ज्युपिटर हाॅस्पिटलमध्ये दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महेश गायकवाड यांना भेटण्यासाठी थेट ज्युपिटर हाॅस्पिटलमध्ये पोहचले आहेत.
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
पुणे पोलिसांनी विद्यापीठात सुरक्षा वाढवली. काल विद्यार्थी संघटनांमध्ये झालं होता राडा
-
गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक, तीन जण फरार
शिंदे गटाच्या पदाधिकारावर गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाड गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार आहे. गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर तीन जण फरार आहेत.
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उच्चस्थरीय चौकशीचे आदेश
गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारानंतर या प्रकरणी उच्चस्थरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गणपत गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
-
शिंदे गटाचे महेश गायकवाड व्हेंटीलेटरवर
महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
-
मी जिवंत आहे.. निधनाच्या चर्चांदरम्यान पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर
अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे. तिने खुद्द सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. याशिवाय आज दुपारी 1 वाजता ती सोशल मीडियावर लाइव्ह येऊन सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे.
-
गोंदियात मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि पान मसाला जप्त
गोंदियात मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्याजवळ असलेल्या मध्यप्रदेश राज्यातून हा माल येत असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी 5 लाख 57 हजार 129 रुपये किंमतीचा हा माल जप्त केला आहे. गोंदियातील रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
-
नाशिक- जय भवानी रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार
नाशिक- जय भवानी रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या युवकासोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाद प्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाद प्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. काल झालेल्या प्रकारानंतर ललित कला केंद्राच्या 6 विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाटकाचा दिग्दर्शक आणि कलावंतांसह एकूण 6 जणांना पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटक दाखवण्यावरून काल संध्याकाळी वाद झाला होता. आज सकाळी या प्रकरणी पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांना देखील अटक झाली आहे.
-
भाजप आमदार गोळीबाराच्या घटनेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
भाजप आमदार गोळीबाराच्या घटनेवर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील सरकार कोणत्या दिशेने चाललं आहे हे दाखवणार आहे. एमएमआर परिसरात जागा घेणं, बळकावणं, अतिक्रमण करणं अशी गुन्हेगारी वाढत आहे. ज्यांनी गोळीबार केला ते एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत. ते कोणाच्या जवळचे आहेत हे सगळ्यांना माहित आहे. हे असं पहिल्यांदा झालं आहे. आमदार महोदयांचं धाडस पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करेपर्यंत वाढलं आहे,” असं ते म्हणाले.
-
Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
एमपीएससी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट… नगरपरिषदेच्या 2022 च्या जाहिरातीत जागांची वाढ करावी ही मागणी विद्यार्थ्यांची आहे. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी करणार चर्चा… विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला शरद पवारांचं आश्वासन…
-
Live Update : भीती निर्माण करून राज्य करणे, हीच खरी मोदींची गॅरेंटी आहे का? वडेट्टीवार यांचा सवाल
कल्याणमधील गोळीबार प्रकरण गंभीर; राज्यातील कायदा सुव्यस्था धुळीला… महायुतीतील आमदार गायकवाडांच्या वक्तव्यामुळे अपात्र महायुतीचे भयंकर रूप जनतेसमोर… विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल… भीती निर्माण करून राज्य करणे, हीच खरी मोदींची गॅरेंटी आहे का? वडेट्टीवार यांचा सवाल
-
Live Update : विद्रोही साहित्य संमेलन, साने गुरुजी यांची कर्मभूमी अमळनेर नगरी गजबजली..
विद्रोही साहित्य संमेलन… साने गुरुजी यांची कर्मभूमी जळगाव येथील अमळनेर नगरी गजबजली… आज आणि उद्या पार पडत आहेत अमळनेर मध्ये १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन… देशभरातून मोठ्या संख्येने असलेले साहित्यिक आणि नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यी विचार यात्रेत सहभागी… संपूर्ण अमळनेर शहरातून काढण्यात आली विचार यात्रा..
-
Live Update : राज्यातील पोलिसांमध्ये दहशतीचं वातावरण – नाना पटोले
राज्यातील पोलिसांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील जनता सरकारला मार करणार नाही… असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
-
Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार निरंजने डावखरे कळवा पोलीस ठाण्यात पोहोचले
भाजप आमदार निरंजने डावखरे कळवा पोलीस ठाण्यात पोहोचले. ते पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल रात्री उल्हासनगरमध्ये महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता, त्यानंतर गायकवाड यांच्यासह दोन साथीदारांना कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते.
-
Ganpat Gaikwad Firing | गणपत गायकवाडसह दोन साथीदारांना कळवा पोलिस ठाण्यात आणलं
महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे गणपत गायकवाड यांच्यासह दोन साथीदारांना कलवा पोलिस ठाण्यात आणलं आहे. गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवणकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघे अद्याप फरार
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, फडणवीसांचे आदेश
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश. गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री केली होता गोळीबार.
-
एकच बाजू पाहून बोलणं योग्य नाही – छगन भुजबळ
एकच बाजू पाहून बोलणं योग्य नाही. प्रतिकार म्हणून गोळीबार का केला हे देखील पहावं लागेल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी उल्हासनगर गोळीबाराप्रकरणी दिली.
-
कसलं कायद्याचं राज्य, गृहमंत्री कुठे आहेत ? – संजय राऊतांचा सवाल
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच गोळीबार होतो हे गंभीर आहे. महाराष्ट्र इतका रसातळाला कधीच गेला नव्हता अशी टीका संजय राऊत यांनी केली.
फडणवीसांनी समोर येऊन सत्य सांगावं. कसलं कायद्याचं राज्य, गृहमंत्री कुठे आहेत ? असा सवाल विचारत त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.
-
गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा – संजय राऊत
उल्हासनगरमध्ये आमदाराकडून झालेला हा गोळीबार धक्कादायक घटना आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा देण्यात आला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
नाशिक – पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
नाशिक – पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी २५०० कोटी मंजूर झाले आहेत. ६० टक्के इक्विटीतून रेल्वे मंडळाकडून निधीला मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित लोहमार्ग साठी केंद्र आणि राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली होती.
-
पुण्यात ११०० लहान मुलांचा योगा
पुण्यातील सारस बागेत लहान मुलांनी योगा केला. ११०० विद्यार्थी सहभागी झाले होते. गंगाधर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सूर्यनमस्कार कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.
-
सादलगाव ते धर्मवीरगड तरुणांचा घोड्यावर प्रवास
पुण्यातील सादलगाव ते धर्मवीरगड असे अंतर काही तरुणांनी घोड्यावर कापले. 1 फेब्रुवारी हा दिवस संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काळा दिवस त्या दिवशी धर्मवीर गडावर काही फितुरांनी संभाजीराजेना पकडून दिलं होतं. या दिवसाची आठवण आणि त्यांच्या शौर्याला मांवनदना देण्यासाठी तरुणांनी थेट घोड्यावर धर्मवीर गड गाठला. सादलगाव ते धर्मवीरगड हे अंतर 40 किलोमीटर आहे. इतिहासकालीन काळात मावळे हे घोड्यांचा वापर करायचे हेच हेरून तरुणांनी घोड्यावर धर्मवीर गडावर गेले.
-
नाशिकमध्ये तरूणीवर बलात्कार
नाशिक बळजबरीने दारू पाजून इंजिनीअर तरुणीवर रिसॉर्टमध्ये बलात्कार करण्यात आला. अश्लिल फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी देणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीची मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
-
Ganpat Gaikwad Firing | गोळीबारावर गणपत गायकवाड यांची काय प्रतिक्रिया?
“मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता” अस गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे.
-
Pune news | अजित पवार आणि भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा मिटला वाद
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना मिळाल कामाच बुकलेट. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना जी काम प्रस्तावित होती ती काम मंजूर. बुकलेटमध्ये आता पर्यंतच्या सगळ्या कामाचा समावेश. भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी अजित पवारांवर व्यक्त केली होती नाराजी.
-
America Air Strike | अमेरिकेची बदल्याची कारवाई, एकाचवेळी 85 ठिकाणांवर हल्ला
अमेरिकेने इराणला दणका दिला आहे. अमेरिकेने त्यांच्या तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अमेरिकेने अशी कारवाई करणार हे आधीच सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी ही Action घेतली आहे. वाचा सविस्तर….
-
ललित कला केंद्राच्या संचालकावर गुन्हा दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या राड्या प्रकरणी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ललित कला केंद्रात जब वी मेट या नाटकाचं आयोजन केलं होतं. मात्र या नाटकात सीतेचं आक्षेपार्ह पात्र दाखवण्यात आलं. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी काल नाटक बंद पाडलं. या प्रकरणी चतुशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित कला केंद्राच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Marathi News | बनावट खाते करुन मागितले पैसे
नागपूरचे माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट तयार करुन लोकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रुकमुद्दीन याला पोलिसांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून अटक केली आहे.
-
Marathi News | राज्यात मराठा सर्वेक्षणाच काम संपले
राज्यात मराठा सर्वेक्षणाच काम पूर्ण झाले. या सर्वेक्षणात ३ कोटी लोकांची माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या आधारे मराठा समाजच मागासलेपण तपासले जाणार आहे. सर्वाधिक डाटा मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यातून जमा झाला.
-
Marathi News | तलाठी परीक्षा, कागदपात्रांची पडताळणी
तलाठी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपात्रांची पडताळणी येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. यामुळे पोलीस पाटील पदावर असताना अंशकालीन संवर्गाचा लाभ म्हणून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. हे विद्यार्थी बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
Marathi News | प्रहारच्या सात जणांवर गुन्हा दाखल
बुलढाण्यात प्रहारच्या जिल्हाप्रमुख सह सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर दूध डेअरीवाल्याला ११ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published On - Feb 03,2024 7:22 AM