Maharashtra Breaking News in Marathi : आजचा निकाल हा घटनेचं अधपतन, घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Maharashtra Breaking News in Marathi : आज 15 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि. 15 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सहा जागांसाठी महायुतीने पाच तर महाविकास आघाडीने एक उमेदवार जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे २० फेब्रुवारी रोजी अधिवेशन होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
कांदा प्रश्नावर मार्ग निघणार? पडद्यामागे महत्त्वाची घडामोड
नवी दिल्ली | राधा कृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते. या भेटीत कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कांद्यावर निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती विखे पाटील यांनी केली. अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार लवकरात लवकर कांदा निर्यातीसंदर्भात निर्णय घेईल अशी ग्वाही दिल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.
-
आम्ही काही मजा मस्ती म्हणून राजकारण करत नाही- आदित्य ठाकरे
2024 मध्ये सरकारचा निधी आपल्याला आणायचा आहे. आम्ही काही मजा मस्ती म्हणून राजकारण करत नाहीये. लडाख मध्ये 30 ते 40 हजार लोक रस्त्यावर उतरले. जणू केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा चेअरा बघायचं नाही अशीच परिस्थिती दिल्लीत आज असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
-
-
ठाण्यातील मानपाडा येथील पेट क्लिनिकची आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी
ठाण्यातील मानपाडा येथील पेट क्लिनिक मध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थात आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह वेटिक पेट क्लिनिक, मानपाडा येथे पाहणी केली. क्लिनिकच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
-
मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या नवे स्थानकाच्या कामाला गती मिळणार – खासदार राजन विचारे
दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे – मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवे रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे, ठामपा, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसेच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या सोबत पाहणी करण्यात आली.
-
“एक संधी राज ठाकरे साहेबांच्या मनसेला देऊया”
सगळ्यांना आपण संधी दिली, सर्वाना आपण अजमावून पाहिलं. हाती काय लागलं? एक संधी राज ठाकरे साहेबांच्या मनसेला देऊया,अशा आशयचा बॅनर कल्याण पूर्वेत लावण्यात आला आहे.
-
-
सोलापूर धुळे महामार्गावर टायर जाळल्याने दोन तास वाहतूक खोळंबली
सोलापूर धुळे महामार्गावर टायर जाळल्याने दोन तास वाहतूक खोळंबली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये मराठा समाज संघटना आक्रमक झाल्या असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
-
आमच्याकडे आहे ती म्हणजे शरदचंद्रजी पवार- प्रशांत जगताप
आमच्या हातातून सगळेच गेलं पण एक गोष्ट आमच्याकडे आहे ती म्हणजे शरदचंद्रजी पवार. पक्ष चिन्ह किती जरी गेले तरी त्यांच्या नावावर नवीन पक्ष काढून आणि जनतेच्या मनात राहू, असं शरद पवार गटाचे पुण्याचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
-
“आमदारांवरून जर पक्ष ठरत असेल तर हे लोकशाहीला धोकादायक”
मुंबई | “आजचा निकाल हा घटनेचं अधपतन आहे”, अशी प्रतिक्रिया घटनातज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे. निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच असल्याचं जाहीर केलं त्यानंतर या निर्णयावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहे. यावरुन उल्हास बापट काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
10 व शेडूल कायदा का आणला की पक्षांतरबंदी व्हावी म्हणून
हा कायदा भक्कम झाला पाहिजे.
आमदारांवरून जर पक्ष ठरत असेल तर हे लोकशाहीला धोकादायक आहे.
नवीन शब्दांचा शोध आज लावला आहे कदाचित त्यांना त्याचा अर्थ माहीत नसावा.
आता सगळी जबाबदारी ही सुप्रीम कोर्टावर आहे.
दुसऱ्या पक्षात त्यांचं स्वागत होत इथे लोकशाहीचं अधपतन सुरु झालं आहे.
शेवटच कोर्ट हे जनता आहे निवडणूक आहेत.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली तेव्हा त्यांना सत्तेवरुन लोकांनी दूर केलं.
-
हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने, लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने, वर्षा गायकवाड यांची जोरदार टीका
मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच असल्याचं निर्णय दिला.तसेच शरद पवार गटाचे आमदारही पात्र ठरले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगानंतर दादांच्या बाजूने निकाल दिला. त्यांनतर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत टीका केली आहे.
वर्षा गायकवाड यांचं ट्विट
सगळेच पात्र..न्याय मात्र अपात्र – भाग २
हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने,लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने…
… पण शेवटी खरे कोण आणि खोटे कोण? हे अखेर जनतेच्या कोर्टात ठरणारंच आहे… खरी लढाई जनतेच्या कोर्टात होईलच… जनता सत्याच्या अर्थात आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि…
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 15, 2024
-
“राष्ट्रवादी पक्ष ज्यांनी पळवला हे आज पक्षाचे मालक असा निकाल अध्यक्षांनी दिला”
जळगाव | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष ज्यांनी पळवला हे आज पक्षाचे मालक असा निकाल आज अध्यक्ष यांनी दिला आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचाच, सर्व आमदारही पात्र
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे. 41 आमदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी अजित पवार गटालाच मूळ राष्ट्रवादी असल्याचं स्पष्ट केलं. तसेच सर्व पात्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा निर्णय शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
-
शेतकरी आंदोलनावरील सुनावणी पुढे ढकलली
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनावरील सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाला परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.
-
अजित पवार बाजूने निकाल, अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष
शरद पवार गटाला आमदार अपात्रता सुनावणीत धक्का बसला आहे. अजित पवार गट हीच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
ज्ञानवापी प्रकरणात आपले म्हणणे मांडण्यासाठी मुस्लिम पक्षाला 28 फेब्रुवारीपर्यंत वेळ
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लिम पक्षाला आपले म्हणणे मांडण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. गुरुवारी, राखी सिंगने हिंदू बाजूच्या वतीने एएसआयने ज्ञानवापी कॉम्प्लेक्सच्या दोन तळघरांचे सर्वेक्षण करण्याची विनंती न्यायालयात केली. न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयने ज्ञानवापी संकुलातील उर्वरित भागांचे सर्वेक्षण केले आहे.
-
इम्रान खान यांच्या पक्षाने उमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केलं घोषित
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने ओमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून घोषित केले आहे. ते इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात पाकिस्तानचे आर्थिक व्यवहार मंत्री राहिले आहेत. सध्या ते पीटीआयचे सरचिटणीस आहेत.
-
जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, महिलांची मागणी
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. परंतु, या उपोषण दरम्यान जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने त्यांनी उपचार घ्यावे. सरकारने जरांगे यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी अंतरवाली येथील महिलांनी केली.
-
संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर हे दिवस – दादा भुसे यांची टीका
नाशिक : संजय राऊत हे भविष्यकार आहेत. त्याच्या या कुटील कारस्थानंमुळे माझ्या शिवसेनेला हे दिवस आले आहेत. कोणता मतदार संघ कोणाकडे हा निर्णय वरिष्ठ घेतात. राष्ट्रवादीचा जो निकाल येईल त्याचा मान ठेवला पाहिजे. जो काही निर्णय होईल त्याचे स्वागत केले पाहिजे. जनता सोबत आहे त्यांचे आशीर्वाद एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे असे मंत्री दादा भुसे म्हणाले.
-
शिवसेने सारखाच निकाल लागेल – शंभुराज देसाई
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा याचा निकाल काहीच वेळात येणार आहे. शिवसेनेला जो न्याय मिळाला तोच न्याय राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार का? याची उत्सुकता लागलीय. यावर उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेनेबाबत दिलेला निकाल हा कायद्याच्या चौकटीत राहुन दिलाय. याच पद्धतीचा निकाल माननीय अध्यक्षांकडुन येणार असे विधान त्यांनी केलंय.
-
माणसं नसल्यामुळे सभा रद्द होते त्यांच्यावर… उद्य सामंत यांचा टोला
मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल याचा आम्हाला आनंद आहे. पाच वाजता कळेल की निवडणूक बिनविरोध होते की नाही. आदित्य ठाकरे यांची माणसं नसल्यामुळे नाशिकमधील एक सभा रद्द झाली. ज्यांची सभा माणसं नसल्यामुळे रद्द होते त्यांच्यावर काय बोलायचं असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला. नारायणराव राणे यांच्याबद्दल सहानुभूती आणि सहानभूतीपूर्व बोलण्याची कुणाला आवश्यकता नाही असेही ते म्हणाले.
-
रविकांत तुपकर यांच्यावर अटकेची तलवार कायम
बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. या संदर्भात उद्या होणार फैसला आहे. रविकांत तुपकर यांच्या वकीलांनी अतिरिक्त पुरावे सादर केले. त्यावर सरकारी वकीलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यांना उद्याची तारीख देण्यात आली आहे. उद्याच्या युक्तीवादानंतर न्यायमूर्ती आपला निकाल देऊ शकतात किंवा निकाल राखूनही ठेवण्याची शक्यता आहे.
-
पुण्यातील घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल
वडिलांनी घेतलेले उसने पैसे परत न दिल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे,तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे प्रकरण माध्यमाद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पुणे पोलिसांकडून याबाबत अहवाल मागविल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली.
-
विरोधकांवर खासदार शिंदे यांची टीका
मुख्यमंत्री शिंदे झोपतात कधी हा रिसर्च चा विषय झाला आहे. हा असा कसा मुख्यमंत्री असा विरोधकांना प्रश्न पडला आहे पोटशूळ उठत आहे. रोज सकाळी शिव्या देण्याच काम होते. यापूर्वीच्या मुख्यमंत्री यांनी काय काम केले आताच्या मुख्यमंत्री किती काम करत आहे हे पहा, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
-
तहसील कार्यालयाला ठोकले कुलूप
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तहसील कार्यालयाला शेतकऱ्यानी कुलूप ठोकले आहे. नुकसान झालेल्या, खरडून गेलेल्या शेतीच्या तक्रारीसाठी तहसीलदारांनी कॅम्प बोलाविले होता. मात्र कॅम्प बोलवून सुद्धा तहसीलदार यांच्यासह सर्व अधिकारी गैहजर असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
-
नगरसेवकावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पारनेर येथील हॉटेल दिग्विजय जवळ ही घटना घडली. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
पेटीएमच्या भ्रष्टाचारावर बोला
पेटीएममध्ये इतक्या हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला, केंद्र सरकारने हीच माहिती दिल्याचा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जर नोटबंदी झाली तर इतका मोठ घोटाळा होतो कसा? पेटीएममध्ये चीनी कंपनीचा शेअर आहे. त्यामुळे एकीकडे चीनविरोधात असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
शुल्क न भरल्याने पालकांना नेले उचलून
सोलापुरात शाळेची फी न भरल्याने शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांची थेट पोलिस स्टेशनमध्ये रवानगी करण्यात आली. पालकांसह विद्यार्थ्यांना पोलिस व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये नेल्याने पालक संतप्त झाले आहेत. शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यापासून वंचित ठेवल्याचा पालकांचा आरोप आहे. शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केल्याने शाळा प्रशासनाकडून पालकाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीनंतर पालकांसह विद्यार्थ्यांना पोलिस व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये नेले.
-
दोन वर्षात खोके सरकारने कृषी साठी काहीच केलं नाही – आदित्य ठाकरे
दोन वर्षात खोके सरकारने कृषी साठी काहीच केलं नाही.दोन वर्षात विम्याचे पैसे शेतकरी यांना मिळाले नाही. दोन वर्षात खोके सरकारने एकही उद्योग आणला नाही. उलट उद्योग इतर राज्यात गेले. ते गुजरातचे मध्ये गेले हे मुख्यमंत्री यांना माहित नव्हतं. असे हे सरकार चालवतात. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
-
मराठा समाजाने चक्काजाम आंदोलनात मांडल्या चुली
मराठा समाजाने चक्काजाम आंदोलनात चुली मांडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बैलगाडी आणत आंदोलन सुरु आहे. सरकारने मराठा आरक्षण अंमलबजावणी करावी व जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी प्रत्यन करावे अशी मागणी आंदोलक करत आहेत.
-
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत नवीन सुरुवात – अशोक चव्हाण
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत नवीन सुरुवात करत असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. कायदेशीर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आयुष्यातील नवी राजकीय सुरुवात करत आहे.
-
शिवसेना शिंदे गटाचं कोल्हापुरात दोन दिवसीय महाअधिवेशन
शिवसेना शिंदे गटाचं कोल्हापुरात दोन दिवसीय महाअधिवेशन उद्या पासून होणार आहे. अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातील पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. महासैनिक दरबार हॉल मध्ये दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. गांधी मैदान वर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. शिवसेनेच्या अधिवेशनाची कोल्हापुरात जय्यत तयारी सुरु आहे. शहरभर शिवसेना नेत्यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत.
-
आदित्य ठाकरे यांचे जळगावला कार्यक्रमासाठी जात असताना स्वागत
आदित्य ठाकरे जळगावकडे जात असताना शहराबाहेरील पारोळा चौफुलीवर त्याचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
-
जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे – महंतांची विनंती
नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांची जरांगे पाटील यांना उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याची विनंती केली आहे.
-
विधान भवन परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ
परिसरात कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेटिंग. आज राज्यसभा ऊमेदवारी प्रक्रिया पार पाडेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात
-
जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस
उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचाराची गरज, जरांगे पाटील त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत.
-
काँग्रेसचा कदाचित आमदारांवर विश्वास नसेल, त्यामुळे बैठक घेत असतील- अनिल पाटील
“काँग्रेसचा कदाचित आमदारांवर विश्वास नसेल, त्यामुळे बैठक घेत असतील. प्रफुल्ल पटेलांना अधिक काळ संधी मिळावी ही अपेक्षा असू शकते. नव्या चेहऱ्याला संधी मिळावी याकरता काही कालावधी लागू शकतो. यामुळे प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी दिली आहे. अपात्रतेच्या सुनावणीचा निर्णय मेरीटवर व्हावा ही अपेक्षा आहे, ” असं अनिल पाटील म्हणाले.
-
श्रीकांत शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड श्री क्षेत्र पोहरादेवीच्या दौऱ्यावर
वाशिम- खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड आज श्री क्षेत्र पोहरादेवीच्या दौऱ्यावर आहेत. बंजारा समाजाचे संत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ते सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसंच पोहरा देवीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. मागील वर्षी पोराहदेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 593 कोटी रुपयांच्या विकास कामाची पायाभरणी केली होती.
-
लोकांचा आग्रह म्हणून मी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात- स्वामी श्रीकंठानंद महाराज
“लोकांचा आग्रह म्हणून मी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे. नाशिकची जागा शिंदे गटाची असली तरी लोक आणि भाजप नेते निर्णय घेतील. नि:स्वार्थ आणि समाजाला समर्पित असल्याने साधू महंत निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. साधू, महंत निवडणूक लढल्यास राजकारणाची पातळी सुधारेल,” अशी प्रतिक्रिया स्वामी श्रीकंठानंद महाराज यांनी दिली.
-
येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण
पुणे- येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण करण्यात आली आहे. येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव पठाण असं आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी अधिकारी गंभीर जखमी झाला असून येरवडा कारागृहात गोंधळ निर्माण झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे.
-
धाराशिव- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ सांजा गावातील मराठा बांधव आक्रमक
धाराशिव- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ सांजा गावातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. बैलगाडी, दुचाकी घेऊन धाराशिव शहराकडे कूच करत त्यांनी बेमुदत शहर बंदची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाची सरकारकडून अंमलबजावणी आणि जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यात यावं या त्यांच्या मागण्या आहेत.
-
नवी दिल्ली – इलेक्ट्रॉल बाँड बाबत सामान्य नागरिकांना माहिती व्हायला हवी, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, इलेक्ट्रॉल बाँड बाबत सामान्य नागरिकांना माहिती व्हायला हवी. राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे, असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले.
राजकीय पक्षांनी गुप्तपणे इलेक्ट्रॉल बॉण्ड घेणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
-
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला 3 आमदार राहणार अनुपस्थित
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित राहणार. मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर हे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणार.
-
शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा
शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राहिलेले बबनराव घोलप यांनी शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला आहे. बबनराव घोलप यांची अनेक दिवस नाराजी होती त्यानंतर आज घोलप यांनी राजीनामा दिला आहे
भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात पक्ष प्रवेश दिल्याने घोलप यांची नाराजी होती. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदावरून देखील घोलप यांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली होती.
-
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय – संजय राऊत
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे.
-
भाजप फुगलेला बेडूक – संजय राऊत
भाजप फुगलेला बेडूक आहे, प्रत्येक वेळी आकडे फुगवून सांगतात. सरकारकडून हुकूमशाही, झुंडशाही सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
ठाकरे गटाला मोठा धक्का
नाराज बबन घोलप शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. बबन घोलप ठाकरे गटाला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहेत. बबन घोलप माजी मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. उद्धव ठाकरे शिर्डीत असताना कालच घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
-
शिंदेंच्या दौऱ्याआधी स्वाभिमानी आक्रमक
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. मागील हंगामात तुटलेल्या उसाला शंभर रुपयाचा जादा हप्ता अद्याप न मिळाल्याने स्वाभिमानीची भूमिका आहे. शेतकऱ्यांचे पैसे द्या मगच कोल्हापुरात पाय ठेवा, असं म्हणत शेट्टींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलं. ॉ
-
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीने एकच चर्चा…
कल्याण लोकसभेतून खासदार श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरे गटातील जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यान्हा लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र पूलाचा प्रस्ताव माझा असल्याने आपल्या परिसरात मुख्यमंत्री आले. याच्या त्यांच्या स्वागतासाठी गेलो असल्याचे सुभाष भोईर यांनी स्पष्ट केले.
-
कोल्हापुरात शिंदे गटाचं महाअधिवेशन
शिवसेना शिंदे गटाचं कोल्हापुरात दोन दिवसीय महाअधिवेशन होत आहे. उद्यापासून या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातील पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. महासैनिक दरबार हॉलमध्ये दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर अधिवेशनात चर्चा होणार आहे.
-
Maharashtra News | नाशिकमध्ये ठाकरे गटाला झटका बसणार का?
नाराज बबन घोलप शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश. बबन घोलप ठाकरे गटाला मोठा दणका देण्याच्या तयारीत. बबन घोलप माजी मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते. उद्धव ठाकरे शिर्डीत असताना कालच घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.
-
Pune news | पुण्यातून भाजपा मराठा उमेदवार देणार का?
मेधा कुलकर्णी यांना थेट राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची गणिते बदलणार. राज्यसभेसाठी पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आता मराठा उमेदवार देण्याची शक्यता जास्त आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे
-
Pune news | पुणे शहरात खाजगी प्रवासी वाहने सुसाट
पुणे शहरात रिक्षांची संख्या लाखांच्या पार तर कॅबची संख्या देखील 50 हजारांच्या वर. प्रशासनाकडून शहरात 1 लाखांपेक्षा अधिक ऑटो रिक्षांना परवाने. खाजगी प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या एका वर्षात लाक्षणिक वाढ.
-
Maharashtra News | रविकांत तुपकरांच्या जामीन रद्दच्या अर्जावर आज फैसला
रविकांत तुपकरांच्या जामीन रद्दच्या अर्जावर आज फैसला. न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष. तुपकरांना पुन्हा जामीन मिळतो की तुरुंगात जावे लागते याचा निर्णय आज होणार. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्धार मेळाव्याचे आयोजन. तुपकर साधणार समर्थकांशी संवाद.
-
Marathi News | आरक्षण आंदोलन, नाशिकमध्ये उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगावमध्ये सकल मराठा समाजाच्या विशाल वडघुले व भास्कर झाल्टे यांनीही बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी शासनाने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
-
Marathi News | व्हॅलेंटाइन’दिनी ३८ जोडप्यांचा विवाह
पुण्यात व्हॅलेंटाइन’दिनी ३८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. पुणे शहर व जिल्ह्यातील ३८ जोडप्यांनी बुधवारी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी ४४ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.
-
Marathi News | राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
काँग्रेसच्या लोणावळा येथील चिंतन शिबिरात प्रदेश सचिवांना प्रवेश नाही. १६ आणि १७ तारखेला हे शिबीर होत आहे. चिंतन शिबीरासाठी बोलावलं नसल्याने अनेक प्रदेश काँग्रेस सचिवांची नाराजी व्यक्त केली आहे. या शिबिरात राज्यातील प्रमुख ३०० नेते सहभागी होणार आहे.
-
Marathi News | राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
राज्यसभेची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
Published On - Feb 15,2024 7:12 AM