Maharashtra Breaking News in Marathi : जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करा-वंचित

| Updated on: Feb 25, 2024 | 7:13 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 24 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करा-वंचित

मुंबई, दि. 24 फेब्रुवारी 2024 | पुण्यात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीसह इतर घटक पक्ष सभेला उपस्थित राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. आजपासून त्यांचा रास्ता रोको आंदोलन सुरु होणार आहे. शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात येणार आहे. पुणे ड्रग्स प्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या आरोपींना दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे दौरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले जाणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Feb 2024 08:31 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांना बघून ‘निष्ठेचा प्रसाद घ्या’ अशा घोषणा, ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    ठाणे : कल्याण श्री मलंगगड यात्रेत मुख्यमंत्र्यांना बघून निष्ठेचा प्रसाद घ्या, अशा घोषणा देणाऱ्या ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कल्याण पश्चिमेतील ठाकरे गटाचे शाखा प्रमुख केदार शेरे आणि उल्हासनगरमधील सागर कांबळे या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

  • 24 Feb 2024 07:56 PM (IST)

    आम्ही निवडणूक लढू शकतो त्या जागांचा सर्व्हे सुरु : खासदार इम्तियाज जलील

    चंद्रपूर : ज्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढू शकतो त्याचा सर्व्हे सुरु आहे. त्यानंतर कुठल्या पक्षाला कुठली जागा सुटणार आणि कोण उमेदवार राहणार हे निश्चित झाल्यावर आम्ही आमचे उमेदवार देऊ असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. चंद्रपुरमध्ये एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

  • 24 Feb 2024 07:43 PM (IST)

    महासंस्कृती महोत्सवाचा मंडप कोसळला, चार महिला किरकोळ जखमी

    बीड : महासंस्कृती महोत्सवाचा मंडप कोसळून चार महिला जखमी झाल्याची घटना बीडमध्ये घडलीय. अचानक वारा आल्याने मंडप कोसळला. छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावरील ही घटना घडली. मंडप कोसळून तो स्टॉलवर पडल्याने स्टॉलमधील महिला अडकल्या. स्टॉलमधील साहित्याचे नुकसान झाले आहे.

  • 24 Feb 2024 07:34 PM (IST)

    महागाई काय आहे हे विसरा… सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला

    अमरावती : महागाई काय आहे हे विसरा, एक तास देशाकरीता सर्वांनी वेळ दिला पाहिजे असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवोत्थान कार्यक्रमात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातील एकता टिकविण्यासाठी सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन चाललं पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

  • 24 Feb 2024 07:22 PM (IST)

    मी म्हणत होतो ती गोष्ट खरी झाली, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

    नांदेड : भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपातील खासदार आणि आमदारांना चहाचे निमंत्रण दिले. या बैठकीनंतर बोलताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मला वाटत होतं अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीत येतील ती गोष्ट खरी झाली. आजची बैठक झाली यावेळी अशोकराव चव्हाण यांनी सर्वांमध्ये समन्वय असावा, अशी भावना व्यक्त केली. ते पक्षात आल्यामुळे आता काही वादाचा विषय राहिला नाही त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.

  • 24 Feb 2024 07:11 PM (IST)

    घड्याळाचे चिन्ह घेऊन आम्ही येणार आहोत, अजित पवार

    मुळशी : उद्या निवडणुका जाहीर झाल्यावर घड्याळाचे चिन्ह घेऊन आम्ही येणार आहोत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य ऐकलं. अजित पवारांच्या विचारांचा खासदार बारामतीत असणार. श्रीरामाचे मंदिर झालं. 500 वर्ष झगडत होतो. देशाने स्वागत केलं. चांदणी चौकाची काय अवस्था होती. केंद्र सरकारने पैसे दिले. सत्ता असलेल्या विचारांचा खासदार असणे गरजेचे आहे. मोदी साहेबांचे सरकार येणार आहे असा पुनरुच्चार अजित पवार यांनी मुळशी येथील मेळाव्यात बोलताना केला.

  • 24 Feb 2024 06:52 PM (IST)

    दिल्लीत आप-काँग्रेसमधील जागा वाटप

    आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये दिल्लीतील जागांवर करार झाला आहे. आप 4 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर लढणार आहे.

  • 24 Feb 2024 06:37 PM (IST)

    तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

    तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूरजवळ सुरू असलेल्या एका खासगी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • 24 Feb 2024 06:27 PM (IST)

    पीएम मोदी 8 मार्चला दोन दिवसांसाठी आसामला जाणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 मार्च रोजी आसामला भेट देणार आहेत. 8 मार्चला आसामला पोहोचल्यानंतर आणि अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर पीएम मोदी 9 मार्चला सकाळी काझीरंगा येथील जंगल सफारीला जाणार आहेत.

  • 24 Feb 2024 06:15 PM (IST)

    भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 29 फेब्रुवारीला!

    भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 29 फेब्रुवारीला होऊ शकते. या बैठकीनंतर भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे असतील. यासह गमावलेल्या जागांव्यतिरिक्त, इतर काही महत्त्वाची नावे असतील. विशेषत: राज्यसभेतून नियुक्त केलेल्या मंत्र्यांना पहिल्या यादीत ठेवले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीत जवळपास 125 उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते.

  • 24 Feb 2024 05:52 PM (IST)

    आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

    आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार गायकवाड यांनी म्हटले होते , की मी वाघाची शिकार केली आहे आणि गळ्यातील दात हा वाघाचा आहे. वनविभागाने आमदार गायकवाड यांचा जबाब नोंदवला. तर जप्त केलेली गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठवणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

  • 24 Feb 2024 05:42 PM (IST)

    कार्यकर्त्याने वेधले लक्ष

    पुण्यातील संजीव इर्मल या कार्यकर्त्याने शर्टवर तीनही पक्षाची चिन्हं काढली आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचं तुतारी , शिवसेना ठाकरे गटाचं मशाल आणि काँग्रेसच पंजा ही तिन्ही चिन्ह शर्टावर कोरली आहेत. हा कार्यकर्ता सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 24 Feb 2024 05:32 PM (IST)

    मराठा समाजाचं रास्ता रोको

    धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुलीवर रस्ता रोको करण्यात आला. मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

  • 24 Feb 2024 05:22 PM (IST)

    ‘वंचित’चं महाविकास आघाडीला पत्र

    काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मविआच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.

  • 24 Feb 2024 05:12 PM (IST)

    सर्व सणासुदीवरील बंदी उठली आहे- मुख्यमंत्री

    धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली यात्रा निरंतर सुरू आहे. रोप वे ची सेवा 15 दिवसांत सुरू होणार आहे. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने हे सरकार उभं राहिलं आहे. हे सरकार आल्यानंतर सर्व सणासुदीवरील बंदी उठवली आहे.संस्कृती जपणारं राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • 24 Feb 2024 05:01 PM (IST)

    शिर्डीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही…

    राज्यातील 48 पैकी अनेक जागांवर एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून शिर्डीची जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. शिर्डीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. जो उमेदवार निवडून येईल तो आघाडीचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 24 Feb 2024 04:01 PM (IST)

    गोंदिया मेडिकल कॉलेजच्या 70 डॉक्टरांच्या संप सुरू

    गोंदिया – गोंदिया मेडिकल कॉलेजच्या 70 डॉक्टरांच्या संप सुरू आहे. ओपीडी व रुग्णांना तपासण्याचे डॉक्टरांचे काम बंद आंदोलन. मागणी पूर्ण ना झाल्यास इमर्जन्सी सेवा देणे ही बंद करणारा असल्याचा इशारा.

  • 24 Feb 2024 04:00 PM (IST)

    मराठा आंदोलक आक्रमक

    बुलढाण्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी नागपूर – पुणे महामार्ग रोखला.टायर जाळून राहेरी बुद्रुक येथे महामार्ग रोखण्यात आला.मराठा आरक्षणसाठी चक्का जाम करण्यात आला.

  • 24 Feb 2024 03:25 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मलंगगड परिसरात दाखल होणार

    अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड परिसरात मच्छिंद्रनाथाच्या आरतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा दाखल होणार आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेवाळी फाट्याजवळ असणाऱ्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने उतरणार आहेत.

  • 24 Feb 2024 02:53 PM (IST)

    अंकिता पाटलांची ट्विट करत सुप्रिया सुळेंवर टीका

    ताईंना, बारामती लोकसभेबद्दल अधिक काळजी निवडणुकीच्या तोंडावर का होईना वाटली, हेही नसे थोडके.. दुष्काळी परिस्थितीचा सामना करायला महायुती सरकार सज्ज आहे.पण बारामतीच्या दुष्काळाची दाहकता तुम्हाला आताच का दिसली? कमी पाऊसचा भाग असला, तरी हा भाग सिंचनापासून वंचित का राहिला?, असे अंकिताने म्हटले.

  • 24 Feb 2024 02:41 PM (IST)

    आमदार संजय गायकवाड यांचेवर कारवाईची टांगती तलवार

    मदार गायकवाड यांनी म्हटले होते , की मी वाघाची शिकार केली आणि गळ्यातील दात हा वाघाचा आहे. वनविभागाने आमदार गायकवाड यांचे बयाण नोंदविले. तर जप्त केलेला गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठविणार. वनविभगाची माहिती

  • 24 Feb 2024 02:30 PM (IST)

    पुणे विमानतळावर केंद्रीय पोलीस यंत्रणेनं केलं मॉकड्रिल

    बॉम्बशोधक पथकाने केलं मॉकड्रिल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणा अलर्ट मोडवर.

  • 24 Feb 2024 02:07 PM (IST)

    रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर टीका

    आमच्या दादांशिवाय तुमचे पान हालत नाही. रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळे व रोहित पवारांना टोला?. जोरदार टीका करताना रुपाली चाकणकर दिसल्या आहेत.

  • 24 Feb 2024 01:50 PM (IST)

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “ती तुतारी प्राणपणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी, अशा त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाल पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही.”

  • 24 Feb 2024 01:40 PM (IST)

    पुण्यातील हडपसरमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा रस्त्यावर झोपून रास्ता रोको

    पुण्यातील हडपसरमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोन सुरू आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. आज मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 24 Feb 2024 01:30 PM (IST)

    राठा आरक्षणाचं शेवटी काय झालं? राज ठाकरेंचा सवाल

    “मराठा आरक्षणाचं शेवटी काय झालं? महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णय घेणं गरजेचं आहे. मी जे आधी बोललो ते लोकांना नंतर पटतं,” असं राज ठाकरे म्हणाले.

  • 24 Feb 2024 01:20 PM (IST)

    लोकांनी नेत्यांना वठणीवर आणलं पाहिजे- राज ठाकरे

    “आगामी निवडणुकांसाठी आमचा सर्व्हे सुरू आहे. लोकांनी नेत्यांना वठणीवर आणलं पाहिजे. लोकांनी नेत्यांना वठणीवर आणलं नाही तर राजकारणाचा आणखी चिखल होईल. हल्ली कोण कुठल्या पक्षात हेच मला कळत नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली.

  • 24 Feb 2024 01:09 PM (IST)

    कोणासोबत स्टेज शेअर केला म्हणजे युती किंवा आघाडी होत नाही- राज ठाकरे

    “शाखाध्यक्षांच्या बैठका आम्ही सुरू केल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी चाचपणी सुरू आहे. कोणासोबत स्टेज शेअर केला म्हणजे युती किंवा आघाडी होत नाही,” अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

  • 24 Feb 2024 12:50 PM (IST)

    जालन्यात आंदोलक आणि पोलीसांमध्ये बाचाबाची

    जालन्यात आंदोलक आणि पोलीसांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आहे. धोपटेश्वर येथील ही घटना आहे. 8 ते 10 आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 24 Feb 2024 12:47 PM (IST)

    वरळीत अनेक समस्या आहेत – राहूल नार्वेकर

    वरळी कोळीवाड्यातील बांधवांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन राहूल नार्वेकर यांनी दिले आहे. वरळीत अनेक समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन राहूल नार्वेकरांनी दिले. वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही तो काम करणाऱ्याचा बालेकिल्ला होईल असंही ते म्हणाले.

  • 24 Feb 2024 12:40 PM (IST)

    नार्वेकरांचा वरळी विधानसभा मतदारसंघात दोन दिवसीय दौरा

    विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत दोन दिवसीय वार्डनिहाय दौरा आहे. लोकांना विकासाची अपेक्षा होती पण इथे असं काहीच झालं नाही असं ते म्हणाले.

  • 24 Feb 2024 12:31 PM (IST)

    जनता हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार- संजय राऊत

    जनता हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीला आव्हन दिलं आहे.

  • 24 Feb 2024 12:28 PM (IST)

    ठाकरेंच्या शिलेदारांविरोधात भाजपचे दिग्गज रिंगणात उतरणार?

    ठाकरेंच्या शिलेदारांविरोधात भाजपचे दिग्गज रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. राहूल नार्वेकर लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना लढण्याचे आदेश वरिष्ठांना दिले असल्याचे सुत्रांची माहिती आहे.

  • 24 Feb 2024 12:22 PM (IST)

    बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सलग तिसऱ्या दिवशी भूमीपूजन

    सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये सगल तिसऱ्या दिवशी भूमीपूजन करण्यात आले आहे. बारामतीतील भिमनगरमध्ये We Support वहिनीसाहेब असे फलक लागले आहेत.

  • 24 Feb 2024 12:13 PM (IST)

    खडकवासला येथे अजित पवार यांचे जंगी स्वागत

    खडकवासला येथे अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. मोठा पुष्पहार घालून अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. मतदार संघात आज अजित पवार यांचा दौरा आहे.

  • 24 Feb 2024 12:08 PM (IST)

    नांदेडमध्ये मराठा आंदोलकाने स्वःताची दुचाकी जाळली

    रास्तारोको करताना मराठा आंदोलकाने स्वःताची दुचाकी जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये ठिकठिकाणी मराठा आंदोलक रास्तारोको करत आहेत.

  • 24 Feb 2024 11:57 AM (IST)

    Live Update | कल्याण ग्रामीण मधील 38 शाळेला मनसे मध्यवर्ती शाखेकडून पुस्तक वाटप

    कल्याण ग्रामीण मधील 38 शाळेला मनसे मध्यवर्ती शाखेकडून पुस्तक वाटप… मध्यवर्ती शाखेत या शाळेपैकी चार शाळांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात येणार आहे.

  • 24 Feb 2024 11:40 AM (IST)

    Live Update | राज ठाकरे डोंबिवली मध्यवर्ती शाखेमध्ये दाखल

    राज ठाकरे डोंबिवली मध्यवर्ती शाखेमध्ये दाखल… आधी मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात होणार सहभागी नंतर पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाची सहभागी राहणार… कल्याण लोकसभेत मनसेचे शक्तिप्रदर्श राज ठाकरे चे स्वागत करत मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढत मनसे कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन…

  • 24 Feb 2024 11:30 AM (IST)

    Live Update | मराठा आंदोलकांनी मालेगावात मुंबई आग्रा महामार्ग रोखला…

    मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर मालेगावात ठिकठिकाणी रस्ता रोको.. मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर रस्ता रोकोत सहभागी.. एक मराठा लाख मराठा घोषणा.. मुंबई आग्रा महामार्ग वरील वाहतूक ठप्प.. विद्यार्थी आणि अँब्युलन्स साठी अडचण होणार नाही याची आंदोलकांनी काळजी.. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त..

  • 24 Feb 2024 11:16 AM (IST)

    Live Update | शनिवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! रविवारी मेगा ब्लॉक नाही, मुंबईकरांना दिलासा..

    आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी मध्यरात्री हे मेगा ब्लॉक असणार असून यामध्ये रेल्वेच्या रुळांची तसेच सिग्नलची दुरुस्ती करण्यात येणार आहे. आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने उद्या रविवारी कुठलाही मेगा ब्लॉक नसणार आहे..

  • 24 Feb 2024 10:43 AM (IST)

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण झालं. शरद पवार यांच्या हस्ते पक्षचिन्हाचं अनावरण करण्यात आलं.

  • 24 Feb 2024 10:40 AM (IST)

    राज ठाकरे आज कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर

    कल्याण पश्चिमेत कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरे आज कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळातच डोंबिवली परिसरातील मध्यवर्ती शाखेत राज ठाकरे होणार दाखल. दुपारी राज ठाकरे यांची डोंबिवली जिमखानामध्ये पत्रकार परिषद होणार.

  • 24 Feb 2024 10:33 AM (IST)

    रायगडावर आज तुतारीचा नाद घुमणार, शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं होणार अनावरण

    रायगडावर आज तुतारीचा नाद घुमणार, शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे, जयंत पाटीलही उपस्थित आहेत.

  • 24 Feb 2024 10:25 AM (IST)

    मराठा आंदोलक समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करण्याची शक्यता, पोलिसांचा कडक बंदोबस्त

    मराठा आंदोलक समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करण्याची शक्यता असल्याने समृद्धी महामार्गावर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

    समृद्धी महामार्गावर चढायला आंदोलकांना मनाई करण्यात आली आहे.

  • 24 Feb 2024 10:14 AM (IST)

    मध्यप्रदेश चे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर

    मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. भाजपच्या क्लस्टर दौऱ्याअंतर्गत घेणार कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाचा आढावा. बिंदू चौक परिसरात चाय पे चर्चा कार्यक्रमाने होणार दौऱ्याची सुरवात. शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळावा ही होणार आहे.

  • 24 Feb 2024 10:08 AM (IST)

    महाराष्ट्रात जनतेच्या हातात मशाल आणि तुतारी – संजय राऊत

    महाराष्ट्रात जनतेच्या हातात मशाल आणि तुतारी आहे. आम्ही महाराष्ट्रात सर्वांची तुतारी वाजवणार. भविष्यातील लढत रोमांचक होईल.

  • 24 Feb 2024 09:57 AM (IST)

    खासदार हेमंत गोडसे यांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया

    राजकारणात निवडणुकांत वैयक्तिक आयुष्यावर जाऊ नये.  काही लोकं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतात. काही नसलं तर उगाच अडचणीत आणण्याचं काम केलं जातं.  सगळे विरोधक एकत्र बसले तरी मी माझ्या कामांमुळे सरस निघेल. माझ्या काळात खुप विकासकामे झाले. नाशिक पुणे रेल्वे आता अंतिम टप्यात असून लवकर कामाला सुरुवात होईल. महायुतीत सर्वच पक्ष दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतील. नाशिकची जागा शिवसेनाच लढते त्यामुळे भाजपचा दावा फोल आहे, अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

  • 24 Feb 2024 09:45 AM (IST)

    देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन

    अमरावतीच्या वरुड मध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सात आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 6 शेतकऱ्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या दहा महिन्यांपासून अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसापूर्वी संत शेतकऱ्यांनी देवेंद्र भुयार यांच्या वरुड येथील कार्यालयावर आंदोलन केले होते. पोलिसांनी यावेळी आंदोलनात शेतकऱ्यांना मारहाण केली व या ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांत धक्काबुक्की सुद्धा झाली. यात एक शेतकरी जखमी सुद्धा झाला आहे.

  • 24 Feb 2024 09:30 AM (IST)

    ‘त्या’ दलालाला अखेर अटक

    पिंपरी- चिंचवडमध्ये अवैधरित्या पैशांचे अमिश दाखवून लॉजवर तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. नितीन कोकरे अस अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. या वेश्याव्यवसाय जाळ्यातून दोन तरुणींची सुटका करण्यात आलीय. लॉजच्या चालक- मालक असलेल्या आरोपी विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 24 Feb 2024 09:16 AM (IST)

    छगन भुजबळ आज मनमाड आणि येवला दौऱ्यावर

    मंत्री छगन भुजबळ यांचा आज मनमाड आणि येवला दौरा आहे. मनमाडमध्ये दोन दिवसापूर्वी काही मराठा आंदोलकांनी पंकज भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर आजच्या भुजबळ यांच्या दौऱ्याकडे लक्ष आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज रास्ता रोखो आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

  • 24 Feb 2024 08:55 AM (IST)

    Maharashtra news | अजित पवारांच्या भेटीच्या वृत्तावर राजेश टोपेंच स्पष्टीकरण

    मी अजित पवारांना भेटलो नाही. मी त्या हाऊसवर मुक्कामी होतो. रायगडला तुतारी चिन्हाच्या अनावरणासाठी उपस्थित राहणार आहे. माझी आणि अजित पवारांची भेट झाली नाही. रायगडला राजेश टोपे, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे एकत्र जाणार हेलिकॉप्टरने.

  • 24 Feb 2024 08:37 AM (IST)

    Maharashtra News | आर्थिक वादातून डॉक्टर वर कोयत्याने हल्ला

    नाशिकच्या सुयोग्य हॉस्पिटल मधील डॉ कैलास राठी यांच्यावर हल्ला. रुग्णालय जनसंपर्क अधिकारी महिलेचा पती संशयित. पैशाच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. संशयिताने डॉक्टर वर केले कोयत्याने 16 वार. डॉ कैलास राठी यांची प्रकृती चिंताजनक. घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील रुग्णालय बंदची हाक

  • 24 Feb 2024 08:13 AM (IST)

    Maharashtra news | राजेश टोपे यांनी सुद्धा सर्किट हाऊसवर

    शरद पवार गटाचे राजेश टोपे यांनी सुद्धा सर्किट हाऊसवर अजित पवार यांची भेट घेतली. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज पुण्यात आहेत.

  • 24 Feb 2024 08:06 AM (IST)

    Maharashtra News | रोहित पवार घेणार अजित पवारांची भेट

    रोहित पवार पुणे सर्किट हाऊस येथे दाखल. रोहित पवार घेणार अजित पवारांची भेट. कालवा समितीच्या बैठकीसाठी रोहित पवार दाखल.

  • 24 Feb 2024 07:55 AM (IST)

    Maharashtra News | प्रशांत जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

    अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाच्या दिवशी कोनशीलेची तोडफोड करत अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

  • 24 Feb 2024 07:42 AM (IST)

    Maharashtra News | पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

    पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात उरला केवळ 55 टक्के पाणीसाठा राहिला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 16.19 tmc इतकाच पाणीसाठा आता आहे.

  • 24 Feb 2024 07:28 AM (IST)

    Maharashtra News | जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 15 वा दिवस

    जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 15 वा दिवस आहे. सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंतपर्यंत रस्ता रोको आंदोलन होणार आहे.

  • 24 Feb 2024 07:14 AM (IST)

    Maharashtra News | वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे उद्घघाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्याचे उद्घाटन केले जाणार आहे. वर्धा देवळी कळंब या पहिल्या टप्यातील मार्गाचे उद्घाटन 28 फेब्रुवारीला केले होणार आहे. 1 हजार 900 कोटी 7 लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.

Published On - Feb 24,2024 7:13 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.