Maharashtra Breaking News in Marathi : रवींद्र वायकर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल, ठाकरे गटाला खिंडार

| Updated on: Mar 11, 2024 | 7:06 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 10 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : रवींद्र वायकर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर दाखल, ठाकरे गटाला खिंडार

मुंबई | दि. 10 मार्च 2024 : पुणे मेट्रो पाठोपाठ पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात पवार कुटुंबातील अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या मल्टिसपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला दोघं उपस्थित राहणार आहेत. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरिन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका सोमवारी सकाळी ११ वाजता वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर १४ वा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Mar 2024 08:47 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नाव प्रकरणात मोठी अपडेट

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्या याचिकेवर 11 मार्चला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया विरोधात शरद पवार यांच्या गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. याप्रकरणी दुपारी दोन नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

  • 10 Mar 2024 07:43 PM (IST)

    रवींद्र वायकर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

    मुंबई | ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांचा आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडत आहे.

  • 10 Mar 2024 05:43 PM (IST)

    Sanjay Nirupam on Amol Kirtikar | उमेदवारीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली असून हा आमचा अंतर्गत प्रश्न : सचिन अहिर

    चाकण-पुणे | उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 9 मार्च रोजी मुंबईतील अंधेरीत एका कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मविआचा उमेदवार जाहीर केला. ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवार घोषित केलं. यावरुन काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. निरुपम यांनी ट्विट करत कीर्तीकर यांच्यावर खिचडी घोटल्याचा आरोप केला. आता यावरुन ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

    संजय निरुपण यांचे हे वैयक्तिक मत आहे. पदाधिकारी किंवा अशोक चव्हाण अनेक घोटाळे केलेत. मग आम्ही बोलायचं का त्यांच्यावर? आम्ही आरोप करू शकलो असतो.आरोप करणे आणि तो सिद्ध होणं यात फरक आहे. उमेदवारीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली असून हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे असल्याचा सचिन आहेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

  • 10 Mar 2024 05:09 PM (IST)

    जबाबदारी घेणं हे काय सोप नसतं, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

    पुणे | आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचलं आहे. शरद पवार प्रमुख होते तेव्हा शरद पवार बोलायचे. आता ते प्रमुख झाले आहेत. आता ते वाटाघाटी करायला जातायेत पण काहीच चालत नाही. २ किंवा ३ जागा घ्याव्या लागतायत. आधी सांगितलेल्या १० जागा तरी घ्या. जबाबदारी घेणं हे काय सोप नसतं, असं म्हणत रोहित पवारांनी दादांना टोला लगावलाय.

  • 10 Mar 2024 04:50 PM (IST)

    काँग्रेस लोकसभा उमेदवार छाननी समितीची बैठक

    काँग्रेसची लोकसभा उमेदवार छाननी समितीची डॉ. मधुसूदन मिस्त्री यांच्याअध्यक्षतेखाली बैठक झाली.  बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत कोल्हापूर मधून शाहू छत्रपती, पुणे रवींद्र धंगेकर ,सोलापूर प्रणिती शिंदे, भिवंडी दयानंद चोरगे, गडचिरोली डॉ नामदेव उसेंडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

  • 10 Mar 2024 04:40 PM (IST)

    अधिवेशनात बोललो म्हणून कारखान्यावर जप्तीची नोटीस- रोहित पवार

    अधिवेशनात बोललो म्हणून कारखान्यावर जप्तीची नोटीस आली. मी सरकारविरोधात असल्याने ईडीची कारवाई झाल्याचं रोहित पवार म्हणाले.

  • 10 Mar 2024 04:20 PM (IST)

    जरंडेश्वरला दिलेली नोटीस आम्हाला कॉपी करून दिली- रोहित पवार

    मला कोर्टाच्या लढाईसाठी कामगार म्हणाले दादा एक महिन्याचा पगार नाही दिला तरी चालेल. जरंडेश्वरला दिलेली नोटीस आम्हाला कॉपी करून दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

  • 10 Mar 2024 04:15 PM (IST)

    कन्नड कारखान्यावरील जप्तीची नोटीस मला आलेली नाही- रोहित पवार

    कन्नड कारखान्यावरील जप्तीची नोटीस अजून मला आलेली नाही. कुणीची काळजी करण्याची गरज नाही. कंपनीमध्ये साडे आठ हजार लोक काम करतात- रोहित पवार

  • 10 Mar 2024 03:56 PM (IST)

    आणखी बरेच मोठे नेते येतील; मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे विधान

    जळगाव : आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करतील की नाही याबद्दल मला माहित नाही. पण, येत्या एक-दोन दिवसात आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये, शिंदे गटात तसेच अजित दादा यांच्या राष्ट्रवादीत येतील. अनेक मोठे नेते आहेत की ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे आता कोणीही आलं तर आश्चर्य वाटू नये, असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.

  • 10 Mar 2024 03:44 PM (IST)

    तिकडे जाऊन किर्तीकर यांना किती फायदा झाला? आमदार शिंदे यांचा टोला

    पालघर : आमदार रविंद्र वायकर यांच्या जाण्याबाबत चर्चा माध्यमातून समोर येतात. परंतु, जातील तेव्हा बोलू, माझ्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यातील वाद वारंवार समोर आले होते. संपुर्ण राज्याने हे पहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाद मिटवायचे प्रयत्न झाले. त्यांच्यातील वाद अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे तिकडे जाऊन किर्तीकर यांना किती फायदा झाला हे त्यांनी सांगावे असा टोला ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी लगावला.

  • 10 Mar 2024 03:35 PM (IST)

    पक्षाचा आदेश आल्यास लोकसभा लढविणार – संजय बनसोड

    लातूर : क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी लातुर लोकसभा निवडणूक लढविण्यास अनुकूलता दर्शविली आहे. महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास आपण लोकसभा लढवू असं त्यांनी म्हटले आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. नेत्यांचा आदेश आल्यास तो पाळणार असं संजय बनसोडे यांनी म्हटले आहे. ते लातुर जिल्ह्यातल्या उदगीर इथं बोलत होते.

  • 10 Mar 2024 03:24 PM (IST)

    महायुतीच्या प्रचारासाठी सर्वच घटक, नेते एकत्र येतील – माजी खासदार आढळराव पाटील

    शिरूर : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांची सदिच्छा भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती. आमदार दिलीप मोहिते यांची भूमिका तेच सांगू शकतात. महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. शिरुरची जागा राष्ट्रवादीला जाते, शिवसेनेला जाते, की भाजपला जाते हे लवकरच ठरेल. पण, महायुतीच्या प्रचारासाठी सर्वच घटक, नेते एकत्र येतील असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

  • 10 Mar 2024 03:18 PM (IST)

    ठाण्यात सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन

    ठाणे : ठाण्यातील सुपर मॅक्स कंपनी गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत पडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांनी सुपर मॅक्स कंपनीबाहेर ठिया मांडत कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केल्या. कामगारांचा पगार आणि न्याय मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकड घातले आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला आहे.

  • 10 Mar 2024 12:54 PM (IST)

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीकडून बॅनर बाजी

    कल्याण कोळशेवाडी परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून बॅनर बाजी

  • 10 Mar 2024 12:41 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्धाटन

    पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडले आहे.

  • 10 Mar 2024 12:26 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी भिडे गुरुजी कोल्हापूर विमानतळावर दाखल

    कार्यक्रम सुरू होण्याआधी भिडे गुरुजी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता

  • 10 Mar 2024 12:12 PM (IST)

    भास्कर जाधव यांना अश्रू अनावर

    मुलाच्या भाषणामुळे भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळतंय. भास्कर जाधव रडताना दिसले.

  • 10 Mar 2024 10:55 AM (IST)

    Live Update | शेख सल्लाह दर्गा प्रकरणात आरोपींवर गुन्हे दाखल

    शेख सल्लाह दर्गा प्रकरणात आरोपींवर गुन्हे दाखल.. चुकीची माहिती पसरवणाऱ्या ३० ते ३५ जणांवर गुन्हे दाखल… फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल… दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा परिसरात असणाऱ्या दर्ग्या संदर्भात अफवा पसरवत अनेक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करण्यात आली होती… दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रमाणे 30 ते 35 जणांवर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल…

  • 10 Mar 2024 10:40 AM (IST)

    Live Update | पुण्यात मध्यरात्री गाड्यांची तोडफाड, दोन आरोपींकडून दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड

    पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन जणांकडून परिसरात दहशत माजवण्यासाठी गाड्यांची करण्यात आली तोडफोड… दोन आरोपींकडून दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड… तोडफोड प्रकरणातील दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी घेतलं ताब्यात… दारूच्या नशेत आरोपींकडून गाड्यांची तोडफोड केली असल्याची कबुली

  • 10 Mar 2024 10:25 AM (IST)

    Live Update | शेख सल्लाह दर्गा प्रकरणात आरोपींवर गुन्हे दाखल

    शेख सल्लाह दर्गा प्रकरणात आरोपींवर गुन्हे दाखल.. चुकीची माहिती पसरवणाऱ्या ३० ते ३५ जणांवर गुन्हे दाखल… फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल… दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा परिसरात असणाऱ्या दर्ग्या संदर्भात अफवा पसरवत अनेक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करण्यात आली होती… दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रमाणे 30 ते 35 जणांवर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल…

  • 10 Mar 2024 10:22 AM (IST)

    Live Update | निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतंय – संजय राऊत

    निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतंय… निवडणक आयोगाचा जास्त काही फरक पडत नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 10 Mar 2024 10:14 AM (IST)

    Live Update | रुग्णालयातील साधनं जागतिक दर्जाचे असणार – फडणवीस

    पालिकेच्या रुग्णालयाच्या खर्चाचा भार असणार नाही… रुग्णालयातील साधनं जागतिक दर्जाचे असणार… रुग्णालयाचा संपूर्ण भार नेदरलाँडच्या कंपनीकडे असणार आहे… असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 10 Mar 2024 10:05 AM (IST)

    Live Update | महापालिका निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या – अजित पवार

    पालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं भूमीपूजन… अजीत पवार – सुप्रिया सुळे एकाच मंचावर… अजित पवार म्हणाले, ‘महापालिका निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या’

  • 10 Mar 2024 10:00 AM (IST)

    सोलापूरात विधवा स्त्रियांसठी हळदी कुंकव कार्यक्रम

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मध्ये विधवा स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. समाजातील विधवा स्त्रियांना एकटेपणा जाणवू नये यासाठी शिवसेना आणि समर्पिता फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.महिला दिनीनिमित्त समाजातील विधवा महिलांचा अनोखा सन्मान करण्यात आला.

  • 10 Mar 2024 09:51 AM (IST)

    नगरसेवकांना पण संधी द्यावी

    सत्तेचे विक्रेंद्रीकरणाचे स्वप्न माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले होते. त्यामुळे नगरसेवक हा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या निवडणुका (मनपा निवडणूक) लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

  • 10 Mar 2024 09:40 AM (IST)

    उद्धघाटनापूर्वी सोशल वॉर

    कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या उदघाटनापूर्वी सतेज पाटील आणि महाडिक गटात सोशल वार रंगलाय. महाडिक खासदार असताना आणि सतेज पाटील पालकमंत्री असताना दोघांनीही विमानतळ विकासासाठी प्रयत्न केले आहेत.मात्र आपल्यामुळेच हे काम झाल्याचा दावा दोघेही करत आहेत.सोशल मीडियात याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. संभाजी राजे यांनी देखील पाठपुराव्यामुळे टर्मिनल बिल्डिंग झाल्याचा दावा ट्विट करत केला आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने याचे उदघाटन होत आहे.

  • 10 Mar 2024 09:30 AM (IST)

    अजितदादा-सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर

    अजित पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात एकाच व्यासपीठावर आले आहेत. एका हॉस्पिटलच्या भूमीपूजनानिमित्त ते एकाच व्यासपीठावर आले आहेत. पण गेल्यावेळी बारामतीतील कार्यक्रमात एकत्र आले असताना त्यांनी अबोला धरला होता.

  • 10 Mar 2024 09:20 AM (IST)

    गावकऱ्यांची अनोखी भेट

    जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा अव्हाळे यांची गावाकऱ्यांनी बग्गीततून मिरवणूक काढली. जागतिक महिलादिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव ग्रामस्थांनी अनोखा नागरी सन्मान केला.

  • 10 Mar 2024 09:10 AM (IST)

    नव्या टर्मिनल बिल्डिंगचे लोकार्पण

    कोल्हापूर विमानतळावरील नव्या टर्मिनल बिल्डिंगचा आज लोकार्पण सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित असतील.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर विमानतळवर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असतील.

  • 10 Mar 2024 08:59 AM (IST)

    सोने महागले, चांदी वधारली

    मार्च महिन्यात सोन्याने तुफान फटकेबाजी केली. या दहा दिवसांत आणि या आठवड्यात सोने महागले. तर या महिन्यात 3,430 रुपयांची दरवाढ झाली. चांदीने पण तुफान बॅटिंग केली. या आठवड्यात चांदी 2300 रुपयांनी महागली. या दरवाढीने ग्राहकांना मोठा फटका बसला.

  • 10 Mar 2024 08:57 AM (IST)

    राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

    राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात दिरंगाई केल्याने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी ही नोटीस आहे. वेळेत तपासणी अहवाल सादर न करणाऱ्या पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २३ फेब्रुवारीच्या आत अहवाल सादर न केल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • 10 Mar 2024 08:45 AM (IST)

    शरद पवार मैदानात, घेतली ‘या’ नेत्याची भेट

    सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात… शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली.  सुप्रिया सुळेंनी थोपटे कुटूंबियांची भेट घेतली होती.  सुनेत्रा पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा बारामतीत आहेत.

  • 10 Mar 2024 08:30 AM (IST)

    अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

    अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मल्टिसपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला हे दोघे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहेत. ३८० कोटीचं हे हॉस्पिटल उभं राहतंय.

  • 10 Mar 2024 08:15 AM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे आज ठाणे दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर- हिंगोली- ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता कोल्हापूर मा. पंतप्रधान महोदयांचे हस्ते व्ही.सी. द्वारे होणाऱ्या कोल्हापूर विमानतळ इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.  तर दुपारी हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.  संध्याकाळी कल्याण लोकसभेत कल्याणमध्ये जगन्नाथ शिंदे विजयनगर क्रीडा संकुल आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे व्हि.सी.द्वारे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

  • 10 Mar 2024 07:57 AM (IST)

    Marathi News | वरळी ते मरिन ड्राईव्ह मार्गिका उद्यापासून खुली होणार

    मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरिन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2024 07:44 AM (IST)

    Marathi News | भाजप-शिंदे गटात डोंबिवलीमध्ये वाद

    डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे चिन्ह कमळ काढले होते. अशा ४५० चिन्हांवर शुक्रवारी मध्यरात्री कोपर भागातील दोन शिवसैनिकांनी काळे फासल्याने या दोन पक्षातील स्थानिक पातळीवरील वितुष्ट पुन्हा एकदा दिसून आले. दरम्यान या प्रकरणी भाजप नेते समीर चिटणीस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

  • 10 Mar 2024 07:28 AM (IST)

    Marathi News | मुंबई विमानतळावर जाणे सोपे होणार

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वरून पुढे वांद्राच्या दिशेने जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टर्मिनल १ जवळ एक उड्डाणपूल बांधला आहे. हा ७९० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वांद्रे प्रवास आता वेगवान झाला आहे.

  • 10 Mar 2024 07:16 AM (IST)

    Marathi News | 14 मार्चनंतर कधीही आचारसंहिता

    केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर १४ वा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार (११ ते १३ मार्च) या तीन दिवसांत निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देतील.

Published On - Mar 10,2024 7:13 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.