मुंबई | 29 डिसेंबर 2023 : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. NDA आणि INDIA आघाडीकडून जागावाटप आणि मोर्चेबांधणी सुरु आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे. त्यावरुनही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला मराठा आरक्षण आंदोलनसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत. त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुंबईत जाण्याचा मार्ग काय असेल? काय वस्तू सोबत घ्याव्यात? याविषयी माहिती दिली. त्याचवेळी काल तीन दिवसात पहिला कसोटी सामना निकाली निघाला. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या तीन दिवसात टीम इंडियावर विजय मिळवला. आजही देश आणि राज्य पातळीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील.
नागपूर : कोरोना जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेत मनपा कार्यक्षेत्रातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज झालीय. कोरोना विषाणूच्या जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत संपूर्ण आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. तरी जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून, कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले आहेत.
पुणे : प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पुणे मेट्रो विशेष उपक्रम राबवणार आहे. पुणे मेट्रो स्थानकात लवकरच सेल्फी पॉईंट साकारण्यात येणार आहे. यासह पुणे मेट्रो विशिष्ट दिवशी तिकिटात सवलत देखील देणार आहे. पुणे मेट्रो प्रशासन मेट्रोचा पुढचा टप्पा देखील लवकरच सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पुणे मेट्रो सर्वरोपरी प्रयत्न करणार आहे.
आजपासून महाविकासआघाडीची जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच मुंबईत देखील बैठक होणार आहे. अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. सुरुवातीला विभागवार अहवाल तयार करण्यात आले आहेत. लवकरच उमेदवारांच्या नावाने अहवाल मागवण्यात येणार आहे. त्यानंतर आणखी २ बैठका जागा वाटपासंदर्भात होणार. त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वात कामोठे व कळंबोलीमध्ये फूटपाथवरती, दुकानाबाहेर, रस्त्याच्याकडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत पान टपाऱ्या, हातगाड्या इतर अनिधिकृत टपऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने मोठी तोडक कारवाई करण्यात आली.
पुणे : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी PMPL प्रशासन देखील सज्ज आहे. 1 जानेवारी रोजी PMPL जादा बसेस सोडणार आहे. PMPL प्रशासनाकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी या ज्यादा बसेस चालवल्या जाणार आहेत. पार्किंग व्यवस्थेपासून देखील पीएमपीएल बसेस सोडणार आहे. एकूण 17 जादा बसेस PMPL सोडणार आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांसोबत लोकसभा निवडणुकीबाबत झालेल्या बैठकीनंतर दुसरी बैठक होत आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राष्ट्रीय आघाडी समितीची बैठक सुरू आहे. बैठकीत मुकुल वासनिक, भूपेश बघेल, अशोक गाहेलोत उपस्थित आहेत. बैठकीनंतर महाराष्ट्र संदर्भातील अहवाल काँग्रेस कार्य समितीला देण्यात येणार आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी यांचे पत्रिकेत नाव टाकले नाही म्हणून एमआयएमचे कार्यकर्ते नेते आक्रमक होत छत्रपती संभाजी नगरातील रेल्वे स्थानकावर जोरदार घोषणाबाजी करत आहेत, जलील यांचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन कार्यालयात आले आहेत. उद्या वंदे भारत ट्रेन अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.
अंगणवाडी सेविकांच्या 4 डिसेंबरपासून इंदापूर पंचायत समिती समोर आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारला कामे करायला अंगणवाडी सेविका पाहिजे मात्र त्यांच्या मागण्यासाठी विचार केला जात नसल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला. अंगणवाडी सेविकांना सरकाने न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे, शिवाय त्यांनी लोकांच्या केलेल्या कामांमुळे लोकसभेत ते जो उमेदवार देतील तो निवडून येणार, असे अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी सांगितले. सुप्रिया सुळेंना बारामतीत ठाण मांडून बसण्याचा अधिकार आहे.त्या बारामतीच्या खासदार आहेत, त्यामुळे त्यांना रणनीती आखण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा आहे. या भागातील पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. नंदुरबार, सिंदखेडराजा, चाळीगाव, अंबड आणि इतर तालुक्यांचा त्यात समावेश आहे.
पुण्यात कात्रज बोगद्यात अपघात झाला. त्यात 5 गाड्या एकमेकांना धडकल्या.बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा अपघात झाला. बोगद्यात अचानक कारने ब्रेक दाबल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात एक महिला जखमी झाल्याचे समजते.
सुधीर मुनगंटीवार यांची जानेवारीत सरकार पडणार विधानावरून महाविकास आघाडीवर टीका केली. लांडगा आला रे आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान असल्याचे ते म्हणाले. दर महिन्याला सरकार पडणार असे म्हणतात,आता 10 जानेवारी म्हणत आहेत,पण 10 जानेवारी नंतर ही सरकार पडणार नाही.पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असे पडले की पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेचे राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
अहमदनगर जिल्हा परिषद प्रांगणात आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. सकाळपासूनच जिल्हा परिषद प्रांगणात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू होते.आंदोलन करणाऱ्या शेकडो अंगणवाडी सेविकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सूटका केली.
काठमांडूला अडकलेल्या ५८ भाविकांची झाली सुटका झाली आहे. पैसे नाहीत, पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवले. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करून मदतीची याचना करूनही प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली.
पुण्यात कात्रज बोगद्यात अपघात झाला आहे. कात्रज बोगद्यात 5 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. मुकुल वासनिक यांच्या घरी आज ४ वाजता होणार बैठक. थोड्या वेळात नेते यायला होणार सुरूवात. नाना पटोले, विजय वडेटीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, दिल्लीत दाखल झाले आहेत.
इंडिया आघाडीसाठी स्थानिक राज्यातील युती करण्याची जबाबदारी गेहलोत समितीवर. गेहलोत समिती आज आणि उद्या सर्व राज्यांशी चर्चा करणार आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची प्रदेशाध्यक्ष, प्रभारी महासचिव यांच्यासोबत येत्या 4 जानेवारी रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर ज्या 14 राज्यांमध्ये ‘भारत न्याय यात्रा’ जाणार त्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. येत्या 4 जानेवारीला यात्रेचा लोगो आणि डिझाईन प्रसिद्ध केले जाणार आहे. 8 जानेवारीला यात्रेचा मार्ग सांगितला जाणार आहे. 12 जानेवारीला यात्रेचे थीम सॉंग लॉन्च होणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात नवीन वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात 233 गुन्हे दाखल करत 35 वाहने जप्त करीत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त दारु आतापर्यंत जप्त केली आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दि.31 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर-19 ए, नेरुळ येथे असलेले वंडर्स पार्क दि.31 डिसेंबर 2023 रोजी बंद राहील असे पालिकेने म्हटले आहे.
जरांगेंचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल झालं आहे. शिष्टमंडळाकडून आझाज मैदानाची पाहाणी सुरू आहे. 20 जानेवारीला मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने कुच करणार आहे.
शिवसेना आणि भाजप युतीमध्ये निवडणूक लढवणार आहे. शिवसेना धनुष्यबाणावर तर भाजप कमळ या चिन्हावर निवडणूक लढवेल असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. आमच्यामध्ये मतभेद नाही असंही ते म्हणाले.
राज ठारके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आनंदच होईल असं संजय सिरसाट म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज शिंदे समितीचा आढावा घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची शिंदे समितीच्या सदस्याबरोबर बैठकही होणार असल्याची माहिती आहे.
जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून दादरमधील शिवाजी पार्कची पाहणी… मुंबईतील आंदोलनासाठी मैदानांची पाहणी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क, BKC ऐवजी आझाद मैदान सोयीचे… असं सांगण्यात येत आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची पुन्हा सुनावणी… 8 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा आयोगासमोर राहणार हजर… अनेक पोलीस अधिकाऱ्यांची देखील उलट तपासणी 8 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात कारने घेतला पेट… घाट चढून आल्यावर महिंद्रा XUV कारने घेतला पेट… चालकाने प्रसंगावधान राखत गाडी उभी करत सर्वांना बाहेर काढले… सुदैवाने जीवितहानी नाही… महामार्ग पोलिस, इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल… आग आटोक्यात आणण्यात यश
मराठा बांधवांनी घाबरु नये, आपली वाहनं मुंबईत घेऊन या… असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. आम्हाला कोणी आडवलं तर फडणवीसांच्या दारात जाणार. फडणवीस यांच्या मुंबई, नागपुरातील घराबाहेर जाऊन बसणार. आमची वाहनं रोखली, तर आम्ही सर्व सामान कशात घेऊन जाणार? असं देखील जरांगे पाटील म्हणाले..
मनसे नेते अमित ठाकरे पुढील महिन्यात पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. 4 आणि 5 जानेवारीला अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय पुणे दौऱ्यात अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. अमित ठाकरेंवर पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजप कैकेयीच्या भूमिकेत आहे की रामभक्त हनुमानाच्या हे जनताच सांगेल. सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही मात्र महाराष्ट्राच्या मंथरेची भूमिका नेटाने निभावताय. मंथरा जशी रोज सकाळी उठून कैकेयीचे कान भरायची, तसे तुम्ही रोज उद्धवजी आणि तुमच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांचे कान भरत असता. वाचाळ बडबडीने महाराष्ट्राच्या जनतेचेही कान किटवत राहता. परंतु जनता भाजपमागे ठामपणे उभी आहे. मंथरेने जसे आपल्या मालकिणीचे नुकसान केले, तीच भूमिका या कलियुगात तुम्ही बजावताय, असं भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्यामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. बीएससी आणि स्थानिक पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहेत. अयोध्येतील सर्व रस्त्यांवर मोठ्या वाहनांसाठी बंदी करण्यात आली आहे.
काँग्रेसने राज्यात नेमलेल्या प्रभारींना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्या जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे याची माहिती हायकमांडला द्या अशा सूचना राज्याच्या प्रभारींना दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला हे पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेणार आहेत. जागा वाटपात वाद टाळण्यासाठी आधी कोणता पक्ष इच्छुक आहे याची माहिती द्या, असे हाय कमांडचे आदेश आहेत. त्यामुळे काँग्रेस प्रभारींमार्फत जागांची माहिती गोळा करणार आहे.
दिल्लीतील दाट धुक्याचा फटका दिल्ली पुणे विमानसेवेला बसला आहे. या धुक्यामुळे पुणे ते दिल्ली चार विमाने रद्द करण्यात आली आहे. पुण्याहून एकूण 9 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेय दिल्ली – पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी कधी होणार आहे, याची तारीख आज निश्चित होणार आहे. यामुळे शिवसेनेचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादीचा निकाल येणार आहे.
अयोध्या येथील विमानतळाचे उद्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
राम मंदिर हा भाजपचा इव्हेंट आहे. राम पुन्हा वनवासात जातील, असे कृत्य कोणी करु नये. राम मंदिराच्या निमंत्रणाची आम्ही वाट पाहत बसलो नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यात संवाद सुरु आहे. जिंकलेल्या जागा त्यांच्याकडेच राहणार आहे, हे आधीच स्पष्ट झाले आहे. आम्ही २३ जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे आम्ही २३ जागा लढवणार आहोत. नाना पटोले यांना अधिकार नाही, यामुळे त्यांनी यासंदर्भात बोलणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या जागा वाटपाचा फार्मूला दिल्लीत ठरणार आहे. काँग्रेससोबत आमची जी चर्चा सुरु आहे, ती दिल्लीत सुरु आहे, असे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
कोल्हापूर उपनगरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत , गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
फुलेवाडी, बोंद्रेनगर, साने गुरुजी, नानापाटील नगर परिसरात पाणीटंचाई. थेट पाईपलाईनचे पाणी शिंगणापूरला जोडण्याचे काम सुरु आहे.
मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता पाणी बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उपनगरात पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस आज जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक घेणार आहेत. राज्यात अनेक भागात दुष्काळ परिस्थिती असून त्या भागात योजना राबवण्याच्या नियोजनासंदर्भात ही बैठक होणार आहे.
आमच्या गाड्या अडवल्या तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू , असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर जाऊन बसू असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणा संदर्भात आज शिंदे समितीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची तयारी केली जात असताना दुसरीकडे सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. शिंदे समितीसोबत मुख्यमंत्री यांची सह्याद्री किंवा वर्षा बंगल्यावर ही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणात पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. NIA कडून विशेष सत्र न्यायालयात ६ आरोपींविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
देशविरोधीत अजेंड्यासाठी तरूणांना भडकावण्याचा कट रचण्यात आल्याचे एनआयएने नमूद केलं.
माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
संजीवराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्याने लोकसभेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष माढा लोकसभेत सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढू शकतात.
दिल्लीत आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पार पडणार बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडणार बैठक. जागा वाटपात काँग्रेसला किती जागा मिळाव्यात. किती जागांवर काँग्रेस लढू शकत यावर चर्चा होणार. नाना पटोले ,विजय वडेटीवार ,अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण राहणार उपस्थित
नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचे पदाधिकारी नियुक्त. 7 अशासकीय सदस्यांपैकी तीन सदस्य अजित पवार गटाचे. सत्ताधारी भाजपा आणि पालकमंत्री पद असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा. अजित पवार गटाचे रंजन ठाकरे, रवींद्र पवार, प्रेरणा बलकवडे यांची झाली नियुक्ती
महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चा आज तिसरा दिवस. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथून 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार. तिसऱ्या दिवसाची सुरुवात दौंड शहरातून पदयात्रा काढून होणार. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड व इंदापूर या तालुक्यातील गावांमधून आज हा आक्रोश मोर्चा जाणार
मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालय. मुंबईत आझाद मैदान येथे जाऊन जागेची पाहणी हे शिष्टमंडळ करणार आहे.