Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 05, 2023 | 6:16 AM

सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई: राज्यात आजही मार्डचा संप सुरूच आहे. या शिवाय वीज कर्मचारीही संपावर जात आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वीज बंद राहणार आहे. तसेच, आसाममध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला झाला असून आंदोलकांनी जाळपोळही केली आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jan 2023 07:44 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात

    ठाणे : 

    ठाण्यात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे व सिनेकलावंत शरद पोंक्षे असणार एकाच व्यासपीठावर

    ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या माध्यमातून जयोस्तुते कार्यक्रमाचे आयोजन

    ठाणे शहरातील मनसे पदाधिकारी अलोक कडव व विनायक नलावडे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर जयोस्तुते कार्यक्रमाचे आयोजन

    ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमाचे आयोजन.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे होणार देवाणघेवाण

  • 04 Jan 2023 04:48 PM (IST)

    वीज कर्मचारी संपाचा न्यायालयालाही फटका

    काही काळासाठी जिल्हा न्यायालयातली बत्ती गुल

    टॉर्चच्या उजेडात न्यायालयाचे अंशतः कामकाज सुरू

    लाईट नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज झाले ठप्प

    लाईट गेली मात्र दुरुस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध नाही

    वीज कर्मचाऱ्यांचा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाला फटका

  • 04 Jan 2023 02:29 PM (IST)

    माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली महावितरण कर्मचाऱ्यांची भेट

    ज्या ठिकाणी महावितरणचा महसूल चांगला आहे, चांगल्या पद्धतीने वसुली होते, तिथे तुम्ही खासगीकरणाला चालना देणार

    तर ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे

    ही राज्य सरकारची चुकीची भूमिका, खासगी लोकांना आपण मलिदावाला भाग देणार

    त्यामुळे बाकीच्या भागाला अन्याय होणार, तुम्ही मुंबईचे मंत्री आहात का राज्याचे?

    तर सकारात्मक निर्णय सरकारने घेतला पाहिजे, तनपुरे यांची मागणी

  • 04 Jan 2023 01:40 PM (IST)

    खाजगीकरणच्या मुद्द्यावरून इम्तियाज जलील यांची नरेंद्र मोदींवर टीका

    औरंगाबाद : खाजगीकरण करायचं तर मग पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर अडाणीला बसवा,

    अदाणी आणि रतन टाटा सगळं करू शकतात तर मग मोदी साहेबांचं काय काम,

    एअर इंडिया टाटा चालवू शकतात, महावितरण अदाणी चालवणार तर मग मोदी साहेब काय करणार,

    खाजगीकरण वरून इम्तियाज जलील यांचा नरेंद्र मोदींवर सवाल.

  • 04 Jan 2023 01:37 PM (IST)

      एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची पंकजा मुंडे यांना खुली ऑफर

    पंकजाताई भाजप मधून बाहेर पडा, आणि आम्हाला सोबत घ्या

    इम्तियाज जलील यांचं पंकजा मुंडे यांना खुलं आव्हान

    पंकजाताईनीं भाजप मधून बाहेर पडून आम्हाला सोबत घेतल्यास महाराष्ट्रात मोठा बदल होणार

    इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा

    इम्तियाज जलील यांनी दिली पंकजा मुंडे यांना भाजप मधून बाहेर पडण्याची ऑफर

  • 04 Jan 2023 01:00 PM (IST)

    बीड: धनंजय मुंडे मुंबईला रवाना

    परळीत अपघातानंतर पुढील उपचारासाठी मुंडे मुंबईला रवाना

    मुंडेंच्या छातीला आणि डोक्याला दुखापत

    लातूरहुन एअर अम्ब्युलन्स ने मुंबईला जाणार

    परळीच्या बंगल्यावरून मुंडे लातूरला निघाले

  • 04 Jan 2023 11:43 AM (IST)

    अमरावतीच्या नवाथे चौकातील मल्टिफ्लेक्सला स्थानिकांचा विरोध

    महापालिका मल्टिप्लेक्स उभारतयं

    महानगरपालिकेने त्या ठिकाणी जीवनावश्य वस्तूचे संकुल उभारण्याची मागणी

    या परिसरात असलेल्या ऐतिहासिक हनुमान मंदिर आणि शितला मातेच्या मंदिराला धक्का लावू नये

    अमरावती शहर सुरक्षा नागरिक कृती समिती करत आहे आंदोलन

  • 04 Jan 2023 11:33 AM (IST)

    महानगरपालिकेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या मल्टिफ्लेक्सला स्थानिकांचा विरोध

    अमरावती : शहरातील नवाथे चौकात महानगरपालिकेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या मल्टिफ्लेक्सला स्थानिकांचा विरोध,

    महानगरपालिकेने त्या ठिकाणी जीवनावश्य वस्तूचे संकुल उभारण्याची मागणी,

    या परिसरात असलेल्या ऐतिहासिक हनुमान मंदिर व शितला मातेच्या मंदिराला धक्का लावू नये,

    अमरावती शहर सुरक्षा नागरीक कृती समिती करत आहे आंदोलन.

  • 04 Jan 2023 11:16 AM (IST)

    परळी: धनंजय मुंडे यांना अपघातानंतर उपचारासाठी मुंबईला हलवणार

    ब्रिज कॅन्डी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी धनंजय मुंडे दुपारी दोन वाजता लातूर वरून होणार रवाना

    दुपारी दोन वाजता एअर ॲम्बुलन्सने लातूरवरून मुंबईकडे उपचारासाठी नेले जाणार

  • 04 Jan 2023 10:27 AM (IST)

    उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेला खिंडार

    अहमदनगर : अहमदनगर मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे युवसेनेला खिंडार,

    युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कतोरे यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत प्रवेश,

    दक्षिण जिल्हा युवासेनेची जबाबदारी, तर योगेश गलांडे यांचाही झाला प्रवेश,

    मुंबईत मध्ये झाला दोन्ही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश,

    अहमदनगर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव बाबू टायर वाले यांच्या प्रयत्नाला अखेर यश

  • 04 Jan 2023 10:13 AM (IST)

    परळी  – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

    परळी शहरातील आझाद चौकात रात्री झाला अपघात

    धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर

    धनंजय मुंडे स्वतः कार चालवीत होते

    उपचारासाठी मुंबईला हलवणार

  • 04 Jan 2023 09:46 AM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर

    शरद पवार यांचे सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर झाले आगमन

    रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठकीत राहणार हजर

    वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला देखील राहणार उपस्थित

  • 04 Jan 2023 09:43 AM (IST)

    उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वीजपुरवठा खंडित

    महावितरण कर्मचाऱ्यांचा संपाचा आरोग्यसेवेलाही फटका

    मध्यवर्ती रुग्णालयात सध्या जनरेटरवर वीजपुरवठा सुरू

    जनरेटरवर वीजपुरवठा सुरू असल्यानं रुग्णांना सध्या कोणताही त्रास नाही

    मात्र जनरेटरची कॅपेसिटी संपल्यानंतर होऊ शकतो गोंधळ

  • 04 Jan 2023 09:41 AM (IST)

    तब्बल आठ तासांनी अंबरनाथ शहरातील वीजपुरवठा पूर्ववत

    सर्वोदय नगरमध्ये 12.45 वाजल्यापासून वीजपुरवठा होता बंद

    अखेर महावितरणच्या आपत्कालीन यंत्रणांकडून वीजपुरवठा पूर्ववत

  • 04 Jan 2023 08:52 AM (IST)

    औरंगाबादच्या उद्योजकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद..

    महा एक्सपोतील उद्योजकांशी पंतप्रधान यांचा असणार विशेष संवाद..

    शेंद्रा येथील ऑरिक सिटी मध्ये पाच ते आठ जानेवारी दरम्यान औद्योगिक एक्सपोचे आयोजन..

    मराठवाडा स्मॉल स्किल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर असोसिएशनच्या महा ऍडवांटेज औद्योगिक एक्सपोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच जानेवारी रोजी उद्घाटन..

    5 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान उद्योजकांशी ऑनलाईन संवाद साधणार..

  • 04 Jan 2023 08:41 AM (IST)

    चित्रपटगृहात खाद्यपदार्थ आणि पेय आणण्याबाबत सर्व अधिकार कुणाचा?

    नवी दिल्ली : चित्रपटगृहात अन्नपदार्थ आणि पेय यांच्या विक्रीबाबतचे नियम ठरविण्याचे अधिकार चित्रपटगृहाच्या मालकांना असून बाहेरील अन्नपदार्थ आणण्यास मुभा द्यायची की नाही, याबाबतही मालक निर्णय घेऊ शकतात, अस सर्वोच्च न्यायालयान म्हटलं आहे.

    जुलै 2018 मध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की, मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांनी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी आत आणण्यास प्रतिबंध करू नये.

    हे निर्दश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेत

  • 04 Jan 2023 08:18 AM (IST)

    वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

    जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन आंदोलनाच्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पाठिंबा देणार

    सरकारने वीज कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून वीजेच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी

    महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्यांच्या खाजगीकरणाचा घाट सरकारने घातला आहे

    संभाजी ब्रिगेड वीज कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे

    प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांची घोषणा

  • 04 Jan 2023 08:05 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडवर विशेष लक्ष

    राज ठाकरे पुन्हा 7 आणि 8 जानेवारीला पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा करणार

    7 तारखेला पुण्यात तर 8 ला पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाच्या बैठका

    कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंचे प्रयत्न

  • 04 Jan 2023 08:02 AM (IST)

    वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतांना वीज पुरवठा खंडित

    अहमदनगर : शहरातील अनेक भागात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित,

    वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल,

    तर मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू.

  • 04 Jan 2023 07:53 AM (IST)

    भाजप नेते माधव भंडारी यांच्या पत्नीचे निधन

    काल रात्री 10.15 सुमारास सुमित्रा माधव भंडारी यांचं पुण्यात निधन

    पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

    आज सायंकाळी 4 वाजता पुण्यातील नवी पेठ येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

  • 04 Jan 2023 07:12 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील गावांचे ड्रोन सर्वेक्षण मार्चपर्यंत होणार पूर्ण

    पुणे भागातील 6136 गावांची होणार ड्रोन सर्वेक्षण

    आतापर्यंत 5 हजार पेक्षा जास्त गावांचे ड्रोन संरक्षण झाले आहे पूर्ण

    ड्रोन सर्वेक्षणामुळे गावांचा नकाशा जिल्हा परिषदेला मिळणे होणार सोपे

    पुणे जिल्ह्यातील देखील 1117 गावांचे होणार दोन सर्वेक्षण

  • 04 Jan 2023 06:46 AM (IST)

    त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या घरावर हल्ला

    घराच्या आजूबाजूच्या दुकानांनाही आग लावली

    सीपीएम समर्थकांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप

    मात्र, ही घटना घडली त्यावेळी घरी कोणीच नव्हते

    हल्लेखोरांनी अनेक वाहनांची तोडफोड करून आग लावली

  • 04 Jan 2023 06:43 AM (IST)

    केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मनमाड उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट…

    रुग्णालयाची अवस्था बघून मंत्री डॉ.भारती पवार संतापल्या

    रुग्णांना सेवा देता येत नसेल तर रुग्णालय बंद करा, भारती पवार यांचा संताप

    आपत्कालीन कक्षात धूळ, स्वच्छतेचा मोठा अभाव

  • 04 Jan 2023 06:39 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील वरसगावं धरणात मगरीचा वावर

    पानशेत – लवासा रस्त्यावरील वरसगावं धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या साईव ब्रद्रुक या ठिकाणी मगरीचं दर्शन

    शेतकरी देविदास हनमघर यांनी मगरीचा वावर मोबाईल कॅमेरात केला कैद

    परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

    पर्यटक आणि स्थानिकांनी धरणात न उतरण्याचं, पानशेत वनविभागाचं आवाहन

Published On - Jan 04,2023 6:37 AM

Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.