Maharashtra News Live Update : पंढरपूरसह पाच तालुक्यात उद्यापासून निर्बंध शिथिल
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी…..
LIVE NEWS & UPDATES
-
पंढरपूरसह पाच तालुक्यात उद्यापासून निर्बंध शिथिल
पंढरपूर : पंढरपूरसह पाच तालुक्यात उद्यापासून निर्बंध शिथिल, जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने राहणार उघडी, तर शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना राहणार बंद, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यानी काढला नवा आदेश
-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज वरळी कोळीवाड्यात, त्यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण
-
-
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ
अहमदनगर :
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ
तहसिलमधील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय
कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत यांना सर्वांना निवेदन
-
पुण्यात दिवसभरात 221 नवे कोरोनाबाधित, 9 जणांचा मृत्यू
पुणे : – दिवसभरात २२१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २५४ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४. – २०९ रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९१६६५. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१०८. – एकूण मृत्यू -८८७९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८०६७८. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८७३३.
-
नाशिकच्या प्रसाद भालेराव खून प्रकरणातील संशयित आरोपी अतुल पिठेकरचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू
– नाशिकच्या प्रसाद भालेराव खून प्रकरणातील संशयित आरोपी अतुल पिठेकरचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू – हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती – 28 जुलैला सिडको परिसरातील हॉटेल सोनाली मध्ये किरकोळ वादातून संशयित आरोपी अतुल पिठेकर आणि त्याच्या साथीदारांनी प्रसाद भालेरावचा केला होता खून – खून प्रकरणातील आरोपाखाली न्यायालयीन कोठडी दिली असता अतुल पिठेकरची मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती रवानगी
-
-
ठाकरे सरकारचा फक्त देवळांवर आकस, तुषार भोसलेंची टीका
आचार्य तुषार भोसले यांची प्रतिक्रिया :
ठाकरे सरकारचा फक्त देवळांवर आकस उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सर्व मंदिरे खुली करा अन्यथा राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार जेलमध्ये टाका, काहीही करा आमची लढाई मंदिर, भाविक आणि लाखो गरिबांच्या उपजिविकेसाठी
राज्याचे मुख्यमंत्री स्वत: घाबरलेले त्यामुळे लॉकडाऊनची भिती दाखवतायत जनतेला घाबरलेल्या अवस्थेत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याने भयभीत करणे एवढाच एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू
शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळावर नातेवाईकांची वर्णी लागावी म्हणून दिरंगाई आपले नातेवाईक नेमण्यासाठी मंत्र्यांना रस सरकारला भाविक आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांविषयी आस्था नाही कुटूंबातील माणसे व्यवस्थापन समितीवर असावी त्यासाठी विश्वस्त मंडळ नेमण्यास दिरंगाई होतेय
-
अफगाणिस्तानमधून 168 नागरिक परतले, 107 भारतीयांचा समावेश
Indian Air Force’s C-17 aircraft that took off from #Afghanistan‘s Kabul earlier this morning, lands at Hindon IAF base in Ghaziabad.
168 people, including 107 Indian nationals, were onboard the aircraft. pic.twitter.com/oseatpwDZv
— ANI (@ANI) August 22, 2021
-
अफगाणिस्तानमधून 168 भारतीय नागरिक परतले, C-17 ग्लोबमास्टर विमान भारतात दाखल
अफगाणिस्तानमधून 168 भारतीय नागरिक परतले
C-17 ग्लोबमास्टर विमान भारतात दाखल
गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर विमान लँड
Indian Air Force’s C-17 aircraft that took off from #Afghanistan‘s Kabul earlier this morning, lands at Hindon IAF base in Ghaziabad.
168 people, including 107 Indian nationals, were onboard the aircraft. pic.twitter.com/gDMozFkzEA
— ANI (@ANI) August 22, 2021
-
एकनाथ शिंदेंनी एटापल्लीतील पोलीस भगिनींसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला भेट देऊन पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटूंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
-
बैलगाडी शर्यतीच्या परवानगीबाबत महत्त्वाची बैठक, जयंत पाटलांची माहिती
बैलगाडा शर्यतीच्या परवानगीवरुन राज्यात वातावरण तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. अशातच 24 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यत परवानगीबाबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
-
पुणेकरांनो सावधान रस्त्याने एकटे फोनवर बोलत असताना चोरीचा धोका
पुणेकरांनो सावधान रस्त्याने एकटे फोनवर बोलत जात असाल तर खबरदारी बाळगा, निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही लुटले जाल, रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना, हडपसरमधील यश रवी पार्क सोसायटीच्या समोरील घटना, दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील पर्सची चोरी, भामटे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, महिलेकडून 1 किलोमीटरपर्यत चोरांचा पाठलाग, दोन चोरट्यांनी पर्स आणि मोबाईल हिसकावला, वानवडी पोलिसांकडून तपास सुरू
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोपhttps://t.co/W4b8MRo5vn#YashomatiThakur #AjitPawar #Akola @AdvYashomatiINC @AjitPawarSpeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021
-
VIDEO: साताऱ्यात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग, 3 दुकानांमधील सामान जळून खाक
VIDEO: साताऱ्यात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग, 3 दुकानांमधील सामान जळून खाकhttps://t.co/DzgX52m76Y#Satara #Fire
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021
-
सोलापुरात उद्यापासून जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम
सोलापूर– उद्यापासून जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम
ग्रामीण भागात सध्या पंढरपूर सांगोला माळशिरस माढा करमाळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने लागू करण्यात आली आहे संचारबंदी
कडक उपायोजना करूनही कोरोना संसर्ग कमी नाही
बोगस डॉक्टरांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे प्रशासनाचा निष्कर्ष
आजारी असलेले लोक अशा बोगस डॉक्टर कडे उपचारासाठी जातात
आरोग्य विभागाला कोणतीही माहिती न देता बोगस डॉक्टर करत आहेत रुग्णावर उपचार
जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून बोगस डॉक्टरांची शोध मोहीम हाती घेण्यात येणार
-
तब्बल 30 वर्षांनंतर भारतीय संरक्षण दलाच्या तीनही प्रमुखांची पुण्यातल्या एनडीएला भेट
तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुखांची पुण्यातल्या एनडीएला भेट,
– नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश कुमार भदौरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी खडकवासला येथील एनडीएला एकत्र भेट दिली,
– तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता,
– या भेटी दरम्यान त्यांनी एनडीएतील प्रशिक्षण सुविधांचा आढावा घेतला
-
ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी पर्यावरण प्रेमी एकवटले
ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी पर्यावरण प्रेमी एकवटले.. – विकासाच्या नावाखाली त्रंबकेश्वर मधील ब्रम्हगिरी पर्वत पोखरण्याचे काम होत असल्यामुळे पर्यावरण प्रेमी आक्रमक – ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ही एक दिवस पर्यावरणीय आंदोलन करणार
-
आंबिल ओढ्याला बाजूने संरक्षक भिंत बांधण्यासाठी पुणे महापालिका सरसावली
आंबिल ओढ्याला बाजूने संरक्षक भिंत बांधण्यासाठी महापालिकेने घेतले काम हाती,
– भिंतीचे 70 टक्के काम पूर्ण झाले असले तरी यासाठी निधी उपलब्ध नव्हता.
यासाठी ११ कोटी ९६ लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर,
– दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता,
– कात्रज पासून ते नवी पेठे पर्यंत आंबिल ओढ्याचा शेजारील निवासी भागात मोठ्याप्रमाणात वित्त व जीवितहानी झाली होती.
-
नागपूर विभागात अजूनही धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा
नागपूर विभागात अजूनही धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा
नागपूर विभागात मागील वर्षाच्या तुलनेत 19.65 टक्के पाणी साठा कमी
नागपूर विभागात 384 धरणात 46.68 टक्के पाणी साठा
हाच साठा मागील वर्षी 67.68 टक्के होता
सध्या पाणी साठा कमी असला तरी येणाऱ्या दिवसात तूट भरून निघण्याची शक्यता
येणाऱ्या दिवसात पावसाची शक्यता आहे त्यामुळे तफावत भरून निघेल
मात्र धरण क्षेत्रात पावसाची आवश्यता
-
बैलगाडा शर्यत झाली पाहिजे ही सरकारची भूमिका- अजित पवार
सरकारची भावना ही बैलगाडा मालकांसोबत आहे. आमचीही भूमिका आहे की बैलगाडा शर्यत झाली पाहिजे. पण फक्त आम्हाला वाटून चालत नाही. कोर्टाच्या निर्णयानुसार बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे, असं उपमुख्यंमंत्री अजित पवार म्हणाले.
-
आमदार नीलेश लंके यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट
आमदार नीलेश लंके यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने केली चर्चा,
योग्य त्या कारवाईसाठी अण्णा मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार
असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन
-
काबूलमधून भारताला विमानाच्या 2 उड्डाणांना परवानगी
काबूलमधून भारताला विमानाच्या 2 उड्डाणांची परवानगी
अमेरिकेकडून भारताला 2 विमान उड्डाणांना परवानगी
C-17 ग्लोबमास्टरचं विमान आज नवी दिल्लीत दाखल होणार
काबूलमध्ये भारताचे 300 पेक्षा जास्त लोक अडकले
Published On - Aug 22,2021 6:35 AM