Maharashtra News LIVE Update | नाशिकमध्ये थोड्याच भागात पाऊस, पाणी संकट दूर झाले नाही : भुजबळ

| Updated on: Jul 23, 2021 | 7:06 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नाशिकमध्ये थोड्याच भागात पाऊस, पाणी संकट दूर झाले नाही : भुजबळ
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jul 2021 06:08 PM (IST)

    नाशिकमध्ये थोड्याच भागात पाऊस झाला, त्यामुळे नाशिकवरच पाणी संकट दूर झाले नाही : भुजबळ

    मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    नाशिकमध्ये थोड्याच भागात पाऊस झाला, त्यामुळे नाशिककरवरच पाणी संकट दूर झाले नाही

    कोकणात रॉकेल अन्नधान्यची मदत सुरू केली आहे

    विभागाला तात्काळ मदत करण्याचे ऑर्डर दिलेल्या आहे ,जशी मदत लागेल तशी दिली जाईल

    शिवभोजन थाळीद्वारे मदत करणार

    कोकणातील सर्व रस्ते पाण्याने वेढले आहे, NDRF ची टीम पोहोचायला देखील वेळ लागला

  • 23 Jul 2021 05:38 PM (IST)

    पुण्यात कोरोनाचे 250 नवे बाधित, 9 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात २५० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २२२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४. -२२४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८५२८५. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०३०. – एकूण मृत्यू -८७२०. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७३५३५. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८४०३.

  • 23 Jul 2021 05:28 PM (IST)

    सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा पहिला बळी

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा पहिला बळी. कणकवली-दिगवळे येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू. संगीता जाधव (वय ४२) असं महिलेचे नाव. महिलेचा पती आणि सासरा जखमी. पती प्रकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल. घराशेजारी पाच ते सहा फूट उंचीची दलदल. डोंगराचा भाग खचून दगड, माती व मोठ मोठे वृक्ष आले खाली.

  • 23 Jul 2021 04:36 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोलचा पुरवठा बंद

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलचा पुरवठा बंद होणार

    वाढती पूर परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

    अत्यावश्यक सेवेतील वाहने आपत्ती व्यवस्थापनाचे वाहनांना मिळणार इंधन

    पूरपरिस्थिती गंभीर होत असताना लोक विनाकारण बाहेर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

    पुढील आदेश येईपर्यंत सरसकट इंधन विक्री न करण्याचे आदेश

  • 23 Jul 2021 04:27 PM (IST)

    सह्याद्री अतिथीगृहावरील मराठा आरक्षण संदर्भातील बैठक स्थगित

    राज्यातील मराठा समाजाच्या प्रश्न, मागण्यांबाबत झालेल्या आश्वासन नंतर कार्यवाहीची सद्य परिस्थीती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागाच्या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विविध विभागाचे सचिव आणि सोबत आमदार विनायक मेटे हे देखील उपस्थित राहनार होते. पण ही बैठक स्थगित करण्यात आली आहे

  • 23 Jul 2021 09:45 AM (IST)

    आंबोली घाटात दरड कोसळली

    आंबोली घाटात दरड कोसळली वाहतूक बंद

    मुसळधार पावसाचा फटका

    दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू होईल.

    दरड बाजूा करण्यास दुपारी 2 वाजण्याची शक्यता

  • 23 Jul 2021 09:21 AM (IST)

    पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग ठप्प, कणकवली-वागदेजवळ रस्त्यावर पाणी

    पाणी आल्याने पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग ठप्प. कणकवली – वागदे येथे सकाळी पाचच्या सुमारास रस्त्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला.

    वाहनांच्या मोठ्या रांगा…

    चार तासानंतर आता पाणी ओसरू लागल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे…

  • 23 Jul 2021 09:15 AM (IST)

    कोल्हापूरच्या पूरस्थितीचं गंभीर रुप, नद्यांची पाणी पातळी वाढल्याने पुणे बेंगलोर महामार्ग बंद

    कोल्हापूर जिल्ह्याची पूरस्थिती गंभीर रूप घेतीय. पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणार्‍या नद्यांची पाणी पातळी वाढल्याने महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

Published On - Jul 23,2021 7:49 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.