Parambir Singh Letter Live Updates | अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही- जयंत पाटील.

| Updated on: Mar 21, 2021 | 11:57 PM

अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

Parambir Singh Letter Live Updates | अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही- जयंत पाटील.
Breaking News

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट खळबळ माजली आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Mar 2021 09:03 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही- जयंत पाटील.

    महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार आणि मी पंढरपूरला गेलेलो. त्यानंतर आम्ही दिल्लीत येऊन शऱद पवार यांच्याशी चर्चा केली.  एक पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे. पण आमचे मित्रपक्ष आहेत. त्यांच्याशीही चर्चा करुन त्याबाबतीत निर्णय झाहीर करु असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगिततं.

    एनआयए, एटीएस या प्रकरणात चौकशी करत आहेत. या चौकशीच्या माध्यमातून काहीतरी ठोस बाहेर येईल असा आमचा विश्वास आहे. अंबानी यांच्या घरासमोर जी गाडी ठेवण्यात आली त्याची चौकशी व्हावी अशी राष्टवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे मत आहे. मनसुख हिरेन यांची हत्या. अंबानी यांच्या घरासमोरील गाडी याबाबत चौकशी करण्याकडे आमचे लक्ष आहे. लक्ष विचलित न होऊ देणे गरजेचे आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक नेत्यांवर आरोप झाले. त्यांनी कोणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. त्यांच्यासशी आमची काही स्पर्धा नाही. परंतु सध्या जो महत्त्वाचा गुन्हा आहे, त्याच्यावरुन लक्ष्य विचलित होता कामा नये, असं जयंत पाटील म्हणाले.

  • 21 Mar 2021 07:02 PM (IST)

    राजीनामा मागणे असा उद्योग सुरु झाला आहे- संजय राऊत

    माझी शरद पवार यांची भेट झाली. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शऱद पवार हे आता दिल्लीत येतील. सरकार विरोधी पक्षासाठी चालत नाही. ते राज्यासाठी, जनतेसाठी चालतं. विरोधकांकडे बहुमत असले तर विरोधकांनी सरकार स्थापन करावे. विरोधकांची प्रत्येक मागणी ही सत्यावरच आधारलेली असेल असं नाही. त्यांनी एखादी मागणी केली असेल. उठसुट राजीनामा मागणे असा उद्योग विरोधकांचा सुरु झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

    पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय कोणालाही नोकरीवर घेतलं जात नाही. आमच्यासाठी वाझे हा विषय आता संपला आहे. जुलिओ रिबेरो यांनी राज्यातील या प्रकरणावर एक लेख लिहला आहे. त्यांनी जर या प्रकरणाची चौकशी केली. तर त्यांच्या अहवालावर सगळेच विश्वास ठेवतील.

    मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख आहेत. देशमुख यांच्याविषयी  तेच निर्णय घेतली. सरकार आहे. आपापले राजकीय पक्ष आहेत. त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते सगळे निर्णय घेतील. असेही संजय राऊत म्हणाले. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक जोरदार पत्रकार परिषद घेतली आहे. काँग्रेसने त्यांची भूमिका मांडली आहे.

  • 21 Mar 2021 06:27 PM (IST)

    ठाण्यात भाजपचे आंदोलन, देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी वसुलीभाई गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नैतिकता म्हणुन गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. आज ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांंनी निदर्शने केली. ठाण्यातही भारतीय जनता युवा मोर्चा व भाजप ओबीसी सेलच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर निदर्शने करून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

  • 21 Mar 2021 06:16 PM (IST)

    संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक शंपली, संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रवादीची पुन्हा बैठक

    दिल्लीतील संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक शंपली. खासदार सुप्रिया सुळेसुद्धा बैठकीला उपस्थितीत होत्या. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. आज संध्याकाळी राष्ट्रवादीची बैठक  होणार आहे. या बैठकीसाठी जंयत पाटली आणि अजित पवारसुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत.

  • 21 Mar 2021 04:47 PM (IST)

    भाजप, परमबीर सिंहाविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

    नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

    परमबीर सिंह आणि भाजपविरोधात आंदोलन

    जोरदार घोषणाबाजी करत आणि टरबूज फोडत केली आंदोलनाला सुरुवात

  • 21 Mar 2021 04:33 PM (IST)

    जनाची किंवा मनाची असेल तर राजीनामा घेतील- चंद्रकांत पाटील

    हा नुसता भ्रष्टाचार नाहीये ही अनैतिकता आहे. लोकांना जो मेसेज जायचा तो गेला. पवारांना जनाची नाही तर मनाची असेल तर ते अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतील, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. “परमबीर सिंह यांनी जे आरोप केले ते खोटे असतील तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांनी चौकशी करावी. मुद्दा हा आहे की, वाझे या प्रकरणाशी निगडीत आहेत की नाही?. लोकांना जास्त काळ उल्लू बनवता येणार नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    तसेच  फडणवीस यांच्याकडे ही सगळी माहिती कोठून आली हे महत्त्वाचे नाही. तरी ही माहिती कोठून आली हे तपासा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

    आता लपून राहण्याचा काळ संपला आहे. काल आणखी एक डेड बॉडी सापडली आहे. राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं ते अगदी बरोबर आहे. या प्रकरणाचा तपास निट झाला तर तो कुठपर्यंत जाईल ते सांगता येत नाही. असेही पाटील म्हणाले.

    सर्व प्रकाराचा तपास सखोल व्हायला पाहिजे, मात्र अनिल देशमुख जर पदावर असतील तर या सर्व प्रकरणांची तपासणी योग्य पद्धतीने होणार नाही. आतापर्यंत सर्व पुरावे नष्ट झाले आहेत. त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. एका दिवसात तीन-चार घटना समोर येत आहेत, असे वक्तव्य पाटील यांनी केले.

    शरद पवार यांचं पक्षावरचं कन्ट्रोल सुटत चाललं आहे. धनंजय मुंडे यांच्यावेळी सुद्धा मुंडे यांची मोठी चूक झाल्याचे मत पवार यांचे होते. मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं पवार यांचं मत होतं. मात्र, सहकाऱ्यांमुळे पवार यांना राजीनामा घेता आला नाही. पवार यांना त्यांचं मन बदलावं लागलं. मुंडे यांचा राजीनामा घेता आला नाही. यामुळे पवार व्यतिथ आहेत. त्यामुळे पवार यांच्याकडून काही अपेक्षा नाहीये. तपास करु, अहवाल येऊद्या हे कशासाठी? असा सवाल चंद्रकातं पाटील यांनी केला.

    शरद पवार जे म्हणतात त्यापेक्षा ते वेगळं करतात. ये तो बस झाकी आहे. पुढे आणखी मोठी लढाई आहे. आता पुढच्या आठवड्यात बघा काय होतं तर, असा इशारासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

  • 21 Mar 2021 03:19 PM (IST)

    सरकारकडून दारुवाल्यांना 450 कोटी सूट, बिल्डरांनाही सूट, पण गोरगरिबांना वीजबिलात नाही : मुनगंटीवार

    “मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांचे हस्ताक्षर नव्हते, असं म्हटलंय. पण हे कान माझे नव्हते, असं म्हटलं नाही. तमचेच कान होते ना? मग तुम्ही आतापर्यंत याचं खंडन का केलं नाही? परमबीर सिंगांनी पत्रात सांगितलेलं आधीही सांगितलं होतं, असं का मान्य करत नाहीत? आज जेव्हा एक पत्र निघालं. तुम्ही एक शृंखूला बघा. १७५० बार मुंबईत आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लक्ष घेतले पाहिजेत. म्हणजेच ४० ते ५० कोटी जमा होतील. आणि इतर माध्यमातून महिन्याला ५० कोटी रुपये. याच्यातून हे शंभर कोटी मागितले गेले की नाही? हा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसेनेचे वार्डाचा कार्यकर्तेही सांगायचे, महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झाली म्हणून गोरगरिबांच्या वीजबिलात सूट देऊ शकत नाही, असं सांगायचे. तरीही दारुच्या लायसन्सला का सूट दिली? ही सूट ४५० कोटीची होती. बिल्डरांना सूट दिली. ही सूट साधारणत: राज्याचं उत्पनात ३० हजार कोटी ठरलं. तर अर्थसंकल्पात ८ हजार कोटींनी उत्पन्न कमी झालं”, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • 21 Mar 2021 02:46 PM (IST)

    अनिल देशमुख यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरु राहणार

    जेवढ्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण कोण वापरत होत याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. भाजपने आज पासून आंदोलन सुरू केलं ते आंदोलन जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तो पर्यंत सुरू राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 21 Mar 2021 02:34 PM (IST)

    सुबोध जैस्वाल यांनी सादर केलेल्या रिपोर्टवर कारवाई झाली : देवेंद्र फडणवीस

    सचिन वाझे यांच्या अटक नंतर वेगवेगळे खुलासे होत आहेत. परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा झाला आहे. या आधी सुद्धा असे खुलासे झाले आहेत. सुबोध जैस्वाल यांनी केंद्रात जाताना मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट दिला होता. सुबोध जैस्वाल यांनी सादर केलेल्या रिपोर्टवर कारवाई झाली नाही. सुबोध जैस्वाल  आणि रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालावर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती.

    शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यांनी बनवलेल्या सरकारला डिफेन्ड करावा लागतं, त्यांची गोष्ट मी समजू शकतो.

    शरद पवार सांगतात ते अर्धसत्य आहे. परमबीर सिंह यांच्या कमिटीनं सचिन वाझे यांना पदावर घेतलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं आणि निर्देशानुसार झाली.

    चौकशी कुणाची परमबीरसिंह यांची की गृहमत्र्यांची करणार?,  या सरकारला वाचवण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यातून सत्यातून दूर जाण्याचा प्रयत्न  झाला.

  • 21 Mar 2021 02:24 PM (IST)

    बदलीपूर्वी परमबीर मला भेटले होते – शरद पवार 

    बदलीपूर्वी परमबीर मला भेटले होते, अन्याय होतोय असं म्हणाले होते – शरद पवार

  • 21 Mar 2021 02:08 PM (IST)

    परमबीर सिंग यांचे आरोप हे बदलीनंतर – शरद पवार

    परमबीर सिंग यांचे आरोप हे बदलीनंतर, पदावर असताना कुठलेही आरोप नाहीत

    उत्तम अधिकाऱ्याकडून आरोपांची चौकशी करा, लेटरबॉम्ब प्रकरणी शरद पवारांचा सल्ला

    सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही

    मविआ सरकार स्थिरच आहे

    चौकशीअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार

    – शरद पवार

  • 21 Mar 2021 01:57 PM (IST)

    गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे – शरद पवार

    शरद पवार –

    परमबीर सिंग यांच्या पत्राचे दोन भाग आहेत

    एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे

    डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती

    या पत्रात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

    यात गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत

    गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे

    त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे

    यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाहीत

  • 21 Mar 2021 01:55 PM (IST)

    अनिल देशमुखांवर लागलेले आरोप हे गंभीर – शरद पवार

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर लागलेले आरोप हे गंभीर, शरद पवारांची दिल्लीतून पत्रकार परिषद

  • 21 Mar 2021 01:12 PM (IST)

    सचिन सावंतानी अमित शाहांविरोधातील पोलीस अधिकाऱ्याची तक्रार वाचून दाखवली

    एखाद्या अधिकाऱ्याने पत्र लिहून आपली तक्रार आपल्या मनातली खदखद बोलून दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही

    गुजरातमध्ये २०१२ मध्ये डीजी वंजारा यांनी पत्र लिहून तत्कालिन गृहमंत्री अमित शाहांवर जे आरोप केले होते ते विसरता कामा नये

    त्यांचे आरोप यापेक्षा भयंकर आहेत, त्यावेळी अमित शाहांनी राजीनामा दिला होता का

    त्यांना पुन्हा सहा वर्षांनी पुन्हा पोलीस सेवेत घेतलं होतं

    तसेच, तत्कालिन पोलीस अधिकारी संजीव भट यांनीही तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते,

    तेव्हा मोदींनी राजीनामा दिला होता का?

    त्यामुळे हे आता ज्या पद्धतीने लेटरबॉम्ब सांगत आहेत तुम्ही त्यावेळी राजीनामा दिला होता का? याचं उत्तर द्या

  • 21 Mar 2021 01:08 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न – सचिन सावंत

    गोदी मीडिया नावाचा प्रकार या कालावधीत तयार झाला आहे

    आज दिवसभरात, कालपासून मी बातम्या पाहातोय की एका अधिकाऱ्याने पत्र लिहिलं

    त्यानंतर न्यायदानाची संपूर्ण प्रक्रिया पारच पाडून टाकली सर्व माध्यमांनी

    कुठल्याही प्रकारचं तथ्य जाणून न घेता महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा पूर्ण दावा जो भाजपचा आहे त्यावर मीडियाचा एक भाग चालतोय, ही वस्तूस्थिती आहे

    – सचिन सावंत

  • 21 Mar 2021 01:05 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकार वर्षभरापासून केंद्र सरकारचे अत्याचार सहन करत – सचिन सावंत

    कोरोनाच्या धर्तीवर मध्य प्रदेशचं सरकार पाडण्यासाठी भाजपने काय काय केलं हे आपण पाहिलं

    राजस्थानातील गेहलोत सरकार कं पाडलं हेही आपण पाहिलं

    त्यामुळे साम, दाम, दंड, भेद वापरुन कोणत्याही परिस्थितीत त्यांना सत्ता परिवर्तन करायचा

    गैर मार्गाने पाठिंबा मिळवण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न असतो

    यासाठी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत

    गेल्या वर्षभर महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीचे केंद्र सरकारचे अत्याचार सहन करत आहे ते आपल्या समोर आहे

    सुशांत प्रकरणातही तीन यंत्रणा कामाला लागल्या, मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली

    – सचिन सावंत

  • 21 Mar 2021 12:57 PM (IST)

    राज्य सरकारने शासन करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे – रविशंकर प्रसाद

    मुख्यमंत्र्यांना माझा एक सवाल आहे

    तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहात ना ज्यांनी जय महाराष्ट्र सांगितलं होतं

    मी त्यांचा आदर करतो

    एकतर तुम्ही बेईमानीचं सरकार बनवलं, फक्त खुर्चीसाठी

    महाराष्ट्रात करोडो रुपयांची लूट होत आहे

    हा प्रश्न फक्त गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा नाही

    तर संपूर्ण राज्य सरकारने शासन करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे

  • 21 Mar 2021 12:51 PM (IST)

    शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी सांगावं संपूर्ण महाराष्ट्राचं टार्गेट काय होतं? – रविशंकर प्रसाद

    100 कोटी हे मुंबईचं टार्गेट असेल, तर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी सांगावं संपूर्ण महाराष्ट्राचं टार्गेट काय होतं

    एका मंत्र्याचं टार्गेट हे होतं तर इतर मंत्र्यांचं काय होतं

    हा भ्रष्टाचार नाही, याला ऑपरेशन लूट म्हणतात

    सरकारचा वापर करुन जनतेचे पैसे लुटा

    – रविशंकर प्रसाद

  • 21 Mar 2021 12:48 PM (IST)

    गृहमंत्री वसुली कुणासाठी करत होते, रविशंकर प्रसाद यांचा सवाल

    गृहमंत्र्यांवर जो आरोप लागलाय, ते ही वसुली स्वत:साठी करत होते, पक्षासाठी करत होते की संपूर्ण सरकारसाठी करत होते, १०० कोटी रुपये दर महिन्याला वसुली करणे सांगणे, हे गंभीर आहे, यावर शरद पवारांनी उत्तर द्यावं लागेल, मुख्यमंत्री उद्धवर ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल, ही लहान गोष्ट नाही, हे भ्रष्टाचाराचं एक गंभीर प्रकरण आहे,

  • 21 Mar 2021 12:45 PM (IST)

    नागपुरातील लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात तृतीयपंथी रस्त्यावर

    नागपूर-

    नागपुरातील लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात तृतीयपंथी रस्त्यावर

    नागपुरच्या संविधान चौकात आंदोलन

    राज्य सरकार व पालकमंत्र्याविरोधात नारेबाजी

    लॉक डाऊन हटविण्यात यावी अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे

  • 21 Mar 2021 12:43 PM (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड भाजपकडून आंदोलन

    पिंपरी चिंचवड

    -गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड भाजपकडून आंदोलन

    -अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आंदोलन

    -जर राजीनामा नाही दिला तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा भाजप महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे यांचा इशारा

  • 21 Mar 2021 11:39 AM (IST)

    अंबरनाथमध्ये भाजपचं गृहमंत्र्यांविरोधात अनोखं आंदोलन, अनिल देशमुखांच्या फोटोला घातला नोटांचा हार

    अंबरनाथमध्ये भाजपचं गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात अनोखं आंदोलन

    भाजपनं अनिल देशमुखांच्या फोटोला घातला नोटांचा हार

    महिलांकडून फोटोला जोडे मारो आंदोलन

    देशमुख यांना पैशाची हाव असल्यानं नोटांचा हार घातल्याची भाजपची प्रतिक्रिया

  • 21 Mar 2021 11:38 AM (IST)

    नाशकात राज्य सरकारविरोधात भाजपाची निदर्शने

    नाशिक –

    राज्य सरकारविरोधात भाजपाचे निदर्शने

    ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक

    ठाकरे सरकार हे भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप

    नाशिकच्या आर के परिसरात भाजपचा आंदोलन

  • 21 Mar 2021 11:37 AM (IST)

    औरंगाबादेत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न

    औरंगाबाद –

    भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न

    तर पोलिसांकडून आंदोलकांना अडवले, पुतळा जाळण्यास पोलिसांकडून मज्जाव

    पोलीस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ

  • 21 Mar 2021 11:21 AM (IST)

    परमबीर सिंह यांच्या लेटरबाॅम्बनंतर भाजप आक्रमक, दादर स्वामी नारायण मंदिराबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरु

    परमबीर सिंह यांच्या लेटरबाॅम्बनंतर भाजप आक्रमक

    दादर स्वामी नारायण मंदिराबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरु

    मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित

  • 21 Mar 2021 11:17 AM (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी औरंगाबादेत भाजपकडून आंदोलन

    औरंगाबाद

    गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन

    औरंगाबादच्या सिडको चौकात भापचे निदर्शने, महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप आक्रमक

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

    गृहमंत्र्यांन सह मुख्यमंत्र्यांनी राजनाम द्यावा

  • 21 Mar 2021 11:16 AM (IST)

    परमबीर सिंगाचे पत्र बदलीनंतर, पत्राच्या सत्यतेबाबद शंका – बाळासाहेब थोरात

    परमबीर सिंगाचे पत्र बदलीनंतर, पत्राच्या सत्यतेबाबद शंका, मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालताहेत, आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही, बाळासाहेब थोरात यांची परमविर सिंग प्रकरणावर प्रतिक्रिया

    केंद्र सरकारची एजन्सी तपास करते आहे, सत्य समोर येईल जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करत असल्याच्या प्रश्नावर थोरातांची प्रतिक्रीया.

  • 21 Mar 2021 10:56 AM (IST)

    पहिले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – नारायण राणे

    पहिले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, पैसा द्या आणि विकत मिळते,  हे राज्य जनतेचं राज्य नाही, जो पैसे देईल त्याचं राज्य, पैसे द्या आणि कोणाचाही मुडदा पाडा, असं राज्य चाललं आहे,   – नारायण राणे

  • 21 Mar 2021 10:55 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा : नारायण राणे

    राज्यात कायदा-सुव्यस्था राहिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, वाझेंना मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात आणलं : नारायण राणे

  • 21 Mar 2021 10:53 AM (IST)

    सचिन वाझे मुख्यमंत्र्यांसाठी काम करायचा, नारायण राणेंचा गंभीर आरोप

    सचिन वाझेला पोलीस खात्यात रुजू कोणी केलं, त्यांना सर्व जबाबदारी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे, परबीर सिंहाचा आरोप हा मुख्यमंत्र्यांवरही, गेली अनेक दिवस वाझे वर्षावर, ऑबेरॉयमध्ये राहायचे, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं का,

  • 21 Mar 2021 10:53 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? : नारायण राणे 

    मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कळवलं होतं, सिंग यांनी वसूलीची माहिती उद्धव ठाकरेंना दिली होती : नारायण राणे

  • 21 Mar 2021 10:50 AM (IST)

    राज्यपालांकडे हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार – प्रकाश आंबेडकर

    महाराष्ट्रातल्या राजकारण – प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने 100 कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्यादृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालंय. उद्या आम्ही वंचितच्यावतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार आहोत. हे चोर, खुन्याचं सरकार आहे.

    – प्रकाश आंबेडकर

  • 21 Mar 2021 10:24 AM (IST)

    डोंबिवलीत भाजपचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

    डोंबिवली : भाजपचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

    परमीवर सिंग यांनी पाठवलेले पत्र आणि 100 कोटीची मागणी याची दखल घेत भाजपचे सरकार विरोधात आंदोलन

    ठाकरे सरकार विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

  • 21 Mar 2021 10:17 AM (IST)

    गृहमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न, भाजपचे 25 ते 30 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न, भाजपचे 25 ते 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • 21 Mar 2021 09:20 AM (IST)

    शरद पवारांनी बोलावलेली बैठक आधीच ठरलेली – जयंत पाटील

    शरद पवारांनी बोलावलेली बैठक तातडीची नाही ती आधीच ठरलेली – जयंत पाटील

  • 21 Mar 2021 09:18 AM (IST)

    परमबीर सिंह लेटरबॉब्मवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

    राज्य सरकार या गुन्ह्याच्या खोलात जाणार, कोण अधिकारी, कितीही उच्चपदस्थ असला तरी तो ओळखण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले, ज्यावेळी जे कोणी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी जबाबदार असेल, अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यासाठी जबाबदार असतील, त्या सर्वांना ओळखण्यासाठी राज्य सरकार कसून प्रयत्न करत आहेत, असं लक्षात आल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं

  • 21 Mar 2021 09:11 AM (IST)

    शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली, गृहमंत्री बदलणार?

    दिल्लीत शरद पवारांनी मंत्र्यांची बैठक बोलावली, अजित पवार, जयंत पाटील बैठकीला उपस्थित राहातील, कालच्या लेटरबॉम्बनंतर पुढची रणनिती काय हे ठरवण्यासाठी बैठक असल्याची माहिती, गृहमंत्री बदलले जाणार का, याचीही चर्चा आहे,

  • 21 Mar 2021 09:08 AM (IST)

    योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी पवार साहेब भूमिका पार पाडतील – संजय राऊत

    संजय राऊत –

    सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं

    आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे नक्की जमिनीवर आहेत का

    माझी यात वैयक्तिक भूमिका नाही

    मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो

    महाराष्ट्राला कणा आहे असं आपण म्हणतो

    पोलिसांकडे आम्ही कणा म्हणून पाहतो

    आमची राजवट देखील उत्तम चालली आहे , पण काही तरी दुरुस्त करावं लागेल

    आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त आहेत

    एका प्रकरणात त्यांना पदावरून जावं लागलं आहे

    त्यांच्या कामाबाबद्दल कौतुक, पण त्यांच्या पत्रावर तपास करावा असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे

    योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी पवार साहेब भूमिका पार पाडतील

    मी पवार साहेबांशी दिल्लीत भेटेल

  • 21 Mar 2021 09:07 AM (IST)

    आशा प्रकारचे आरोप होतात हे दुर्दैवी – संजय राऊत

    संजय राऊत –

    महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय

    नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक पत्र

    लोक म्हणतात हा लेटरबॉम्ब

    मात्र यात सत्यता किती हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील

    स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे

    मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे

    आशा प्रकारचे आरोप होत हे दुर्दैवी

    ज्यांनी हे सरकार यावं म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यानसाठी हे धक्कादायक

  • 21 Mar 2021 08:50 AM (IST)

    100 कोटींच्या टारगेट प्रकरणावरुन भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांचा घणाघात

    100 कोटींच्या टारगेट प्रकरणावरुन भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांचा घणाघात

    मंदिर बंद ठेऊन या ठाकरे सरकारला पब आणि बार सुरु करण्याची घाई का झाली होती , हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळतं आहे

    100 कोटींच्या टारगेट साठी तुम्ही देवांना कोंडून ठेवलं, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल

    आज गृहमंत्र्यांना घरी जावं लागेल पण हे सरकारही लवकरच जाणार

    ही तर महा वसुली आघाडी निघाली

  • 21 Mar 2021 08:47 AM (IST)

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्याचा पोलीस बंदोबस्त वाढवला

    माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये महिन्याला मागीतल्याच्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे

    मलबार हिल परिसरातील गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ज्ञानेश्वरी आणि मुख्यमंत्री यांचा वर्षा बंगाला आजूबाजूलाच आहेत

    या बंगल्याकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे

    राज्याच्या राजकारणात गृह खात्यात एवढा मोठा आणि थेट आरोप होणे ही पहिलीच वेळ आहे,

    काल हा आरोप झाल्यानंतर आज मात्र यावर गृहमंत्री यांचा ज्ञानेश्वरी आणि मुख्यमंत्री यांचा वर्षा बंगल्यावर महत्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे

  • 21 Mar 2021 08:39 AM (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा – तृप्ती देसाई

    राज्यात नेमके काय चालले आहे, हे महाविकासआघाडी सरकार आहे की  “महावसुली सरकार”आहे, वाझे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत आणि व्हाट्सअॅप चॅटचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात, खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येते तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे,परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल-तृप्ती देसाई

  • 21 Mar 2021 08:25 AM (IST)

    मविआ सरकार म्हणजे महावसुली सरकार – कंगना रनौत

    मविआ सरकार म्हणजे महावसुली सरकार, कंगना रनौतचं ट्वीट

  • 21 Mar 2021 08:08 AM (IST)

    आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत, संजय राऊतांचं सूचक ट्विट

    संजय राऊत यांनी रविवारी जावेद अख्तर यांचा एक शेर ट्विट केला. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत

Published On - Mar 21,2021 9:08 PM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.