Maharashtra Breaking News : वाशिममध्ये 25 वर्षीय युवकाने घेतली इमरतीवरुन उडी, आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी

| Updated on: Nov 08, 2021 | 12:59 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News : वाशिममध्ये 25 वर्षीय युवकाने घेतली इमरतीवरुन उडी, आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Nov 2021 11:32 PM (IST)

    अकोल्यात दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे  गंभीर जखमी 

    अकोला : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे  गंभीर जखमी

    वाडेगाव येथील महादेव शिंदे तर जांभरून येथील नारायण लठाड गंभीर जखमी

    जखमींना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे

    जिल्हातील पातूर तालुक्यातील चान्नी फाटा समोरील बुलडाणा अर्बन वेअर हाऊसजवळ घडली घटना

  • 07 Nov 2021 09:16 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी होणार संपात सहभागी

    कोल्हापूर : जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

    कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी होणार संपात सहभागी

    आज मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर जाणार

    सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे होणार हाल

    कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे नियंत्रकांना पत्र

  • 07 Nov 2021 09:14 PM (IST)

    वाशिममध्ये 25 वर्षीय युवकाने घेतली इमरतीवरुन उडी, आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी

    वाशिम: वाशिम शहरात असलेल्या लाखाळा परिसरातील एका बिल्डिंग वरून 25 वर्षीय युवकाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राहुल चंद्रशेखर असं आत्महत्या करण्याऱ्या युवकाचं नाव असून या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

  • 07 Nov 2021 07:54 PM (IST)

    दापोली एसटी आगारातील चालक हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर

    रत्नागिरी -दापोली एसटी आगारातील चालक हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर

    अशोक वनवे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर

    दापोली-ठाणे या शिवशाही बसवर ड्युटीसाठी बांगड्या भरून झाले हजर

    चालक मुळचे बीड येथील असून कुटूंब नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहेत

    राज्यभर जे आंदोलन सुरू त्याला अशा प्रकारे पाठिंबा

  • 07 Nov 2021 06:49 PM (IST)

    महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समिती राज्यभर बंद पुकारणार, सोमवारी निर्णय  

    पुणे – महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समिती उद्यापासून राज्यभर बंद करण्याच्या तयारीत

    – उद्या सकाळी यासंदर्भातला अंतिम निर्णय होणार

    – कृती समितीशी चर्चा करून उद्या सकाळी निर्णय जाहीर करणार

    – आजच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाहीय

    – संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांची टीव्ही 9ला माहिती.

  • 07 Nov 2021 06:04 PM (IST)

    आटपाडीत गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीचा गट आमनेसामने, गाड्या फोडल्या, काहीजण जखमी

    सांगली : आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीचा गट आले आमनेसामने

    जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन झाला वाद

    पडळकर यांची गाडी फोडली, त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या, काहीजण जखमी

    आटपाडी मधील साठे चौकातील घटना

    आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण. आटपाडी मध्ये पोलीसाची कुमक वाढवली

  • 07 Nov 2021 05:39 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 69 कोरोना रुग्णांची वाढ 

    पुण्यात दिवसभरात 69  कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 82 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2

    -103 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 504759

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 657

    – एकूण मृत्यू -9077

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 495025

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5667

  • 07 Nov 2021 05:34 PM (IST)

    सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल

    सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल

  • 07 Nov 2021 04:36 PM (IST)

    मला या प्रकरणात गोवण्यात आलं, प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे- सुनिल पाटील

    सुनिल पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला.  मी दिलीप वळसे पाटीला यांनी भेटलेलो नाही. अनिल देशमुख यांना फक्त एकदाच भेटलो. त्यानंतर त्यांची आणि माझी भेट नाही. मी ट्रन्सफरचे रॅकेटचालवतो असा आरोप केला जातो. पण तसे काही नाही. मला या प्रकरणात फसवण्यात आले आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पोहिजे. मी सह्याद्री येथे कधीही गेलेलो नाही. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी झाली पाहिजे. माझी आणि नवाब मलिक यांची भेट झालेली नाही. मलिक आणि माझं दहा तारखेला बोलणं झालं. मला अडकवण्यात येईल असं मी त्यांना सांगितलं. आणि झालंही तसंच, असे सुनिल पाटील म्हणाले.

  • 07 Nov 2021 04:27 PM (IST)

    विठ्ठलवाडी बस डेपोतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

    कल्याण : विठ्ठलवाडी बस डेपोतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

    जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद राहणार

    कामगारांचा प्रशासनाला इशारा

    दुपारपासून आंदोलन सुरू

  • 07 Nov 2021 04:11 PM (IST)

    बुलडाण्यात काँग्रेस भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करणार 

    बुलडाणा : उद्या काँग्रेस भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करणार

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य

    तर सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी काहीही फरक पडत नाही

    जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल

  • 07 Nov 2021 02:55 PM (IST)

    प्रभाकर साईलला NCB उद्या समन्स देणार, सूत्रांची माहिती

    एनसीबी प्रभाकर साईलच्या वकिलांना ऊद्या सेशन कोर्टात समन्स देण्याची शक्यता

    प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीच्या तपासावर ऊपस्थित केले होते प्रश्नचिन्ह

    मुंबई एनसीबी ऑफिसमध्ये प्रभाकर साईल उद्या जबाब नोंदवणार

    यापुर्वीच प्रभाकरने मुंबई पोलीस झोन वन इथे आपला जबाब नोंदवला होता

    संपूर्ण प्रकरणात एनसीबीचे तपास अधिकारी संजय सिंह यांच्या उपस्थितीत जबाब नोंद होणार

  • 07 Nov 2021 02:49 PM (IST)

    माळशिरस तालुक्यातील रेड्याच्या टकरीत एका रेड्याचा मृत्यू

    पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील खळवे गावात विना परवानगी रेड्याच्या टकरी भरवण्यात आल्या होत्या. या टकरीदरम्यान एका रेड्याचा मृत्यू झाल्याची घडलीय. तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार हपडला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

  • 07 Nov 2021 01:39 PM (IST)

    NCB कडून आर्यन खान आणि पूजा ददलानीची चौकशी होणार

    नवी दिल्ली- NCB कडून आर्यन खान आणि पूजा ददलानीची चौकशी होणार

    NCB सूत्रांची टीव्ही नाईन मराठीला माहिती

    येत्या आठवड्यात दोघांकडेही कसून चौकशी होण्याची शक्यता

    NCB तपासामध्ये अजून काही गोष्टी समोर येणार

    सूत्रांची टीव्ही नाईन मराठीला माहिती

    सगळ्या संशयितांची स्टेटमेंट इन कॅमेरे घेतली जात आहेत

  • 07 Nov 2021 01:38 PM (IST)

    जळगावात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचं आंदोलन

    एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे

    जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन पुकारले असून बस सेवा दिवाळीच्या काळात ठप्प झाली आहे

    आज दुपारी बारा वाजेपासून बसेस एसटी आगारात उभ्या आहेत, त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत

    आज फक्त एसटी बसेस बंद आहेत, उद्यापासून आम्ही परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे

  • 07 Nov 2021 12:08 PM (IST)

    मलिक खोटे आरोप करतायत, त्यांना कोर्टात खेचणार : मोहित कंबोज

    मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही, शेवटी विजय सत्याचा होईल : मोहित कंभोज नवाब मलिक खोटे आरोप करतायत भाजप नेते मोहित कंबोज यांचा मलिकांवर हल्लाबोल मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही, शेवटी विजय सत्याचा होईल मंत्र्यांच्या मुलांचा ड्रग्ज पेडलरशी काय संबंध मी मलिकांविरोधात न्यायालयात जाणार मलिकांना मी घाबरत नाही मलिकांची ड्रग्ज माफियांसोबत काय जुगलबंदी सुरु आहे अस्लम शेख यांचं नाव मलिकांनीच उघड केलंय आम्ही वाट पाहतोय, मलिक कधी तुरुंगात जातोय चिंकू पठाण समीर खानचा काय संबंध? 1100 कोटींशी माझा काय संबंध ते सांगावं ललित हॉटेलचे सीसीटीव्ही तपासावे माझ्या विधानानंतर सुनीलचा मला फोन आल्याचं मान्य केलं अजित पवार, अनिल देशमुखांबाबत मलिक बोलत नाहीत सुनील पाटील आणि मलिकांचे संबंध उघड येतील तुम्ही खरे असाल तर माझ्या नोटिसींना उत्तरं द्या सुनील पाटीलचे राष्ट्रवादीशी संबंध काय?

  • 07 Nov 2021 11:58 AM (IST)

    राजधानी दिल्लीत हवा प्रदूषणासोबत पाण्याचेही प्रदूषण

    नवी दिल्ली – राजधानीत हवा प्रदूषणासोबत पाण्याचेही प्रदूषण

    यमुना नदीच्या पाण्यावर फेसच फेस

    यमुना नदीच्या पाणी प्रदूषणात प्रचंड वाढ

    बर्फाप्रमाणे नदीपात्रात मोठा फेस

    नदी पात्रात मोठे मोठे फेसाची पुंजके

  • 07 Nov 2021 11:21 AM (IST)

    नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी शाम फर्नांडिससह दोघांवर गंभीर हल्ला

    नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी शाम फर्नांडिस सह दोघांवर गंभीर हल्ला – दोघा भावांचे वाद सोडवण्यास गेले असता हल्ला केल्याची माहिती – संशयित संतोष ढमाळने -चॉपरने केले सपासप वार – अशोकनगर परिसरातील जाधव संकुल येथील घटना – तिघांवर ही रुग्णलयात उपचार सुरू,प्रकृती चिंताजनक – सातपूर पोलीस स्टेशनमध्ये संशयित संतोष ढमाळवर गुन्हा दाखल

  • 07 Nov 2021 10:50 AM (IST)

    मोहित कंबोजने 1100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

    भाजपमध्ये गेल्यानंतर घोटाळ्याची चौकशी नाही

    मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने 1100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचं पद दिलं. या घोटाळ्याप्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झालं, असा दावाही नवाब मलिक यांनी केला.

  • 07 Nov 2021 10:47 AM (IST)

    कंबोजच्या सांगण्यावरून तिघांना सोडलं : नवाब मलिक

    9 तारखेला मी एक पीसी घेतली होती. त्यावेळी एक व्हिडीओ दाखवला होता. त्यात वानखेडे 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगत असल्याचं दिसत होतं. त्यावर 8 की 10 लोकांना ताब्यात घेतलं? एक अधिकारी नेमका आकडा का सांगत नाही? असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन 8 नव्हे तर 11 लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा,ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना एनसीबी कार्यालयातून घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने पीसी घेऊन 14 लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या 14 लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे, असंही ते म्हणाले.

  • 07 Nov 2021 10:30 AM (IST)

    मोहित कंबोजच्या मालकीची 12 हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी तो समीर वानखेडेंची मदत घ्यायचा : नवाब मलिक

    मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. आपल्या हॉटेल्सचा कारोभार वाढण्यासाठी तो आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंची मदत घ्यायचा, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

  • 07 Nov 2021 10:25 AM (IST)

    वानखेडे आणि कंबोजचे व्हिडीओ लवकरच रिलीज करणार : मलिक

    वानखेडे आणि कंबोजचं चांगले संबंध आहेत. त्यांचे व्हिडीओ लवकरच जारी करणार. ७ तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमी जवळ भेटले. त्यांचं नशीब चांगलं होतं की पोलीसांचं सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. ड्रग्जचा धंदा सुरू राहावा हेच वानखेडेंना वाटतं. बॉलिवूडमध्ये कोण ड्रग्ज घेतं याची माहिती घेऊन वानखेडेंनी दहशत निर्माण केली.

  • 07 Nov 2021 10:12 AM (IST)

    आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत गेला नाही, त्याला बोलावलं गेलं : नवाब मलिक

    आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि सचदेवने बोलावलं. हे किडनॅपिंगचं प्रकरण होतं. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड हा मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो १२ हॉटेल चालवतो.

  • 07 Nov 2021 10:11 AM (IST)

    क्रूझ ड्रग्ज पार्टी कारवाई फर्जीवाडा, समीर वानखेडेंनी 14 लोकांची नावे का सांगितली नाही? : नवाब मलिक

    ९ तारखेला मी एक पीसी घेतली. त्यात वानखेडे ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचं व्हिडीओत सांगत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे एक अधिकारी नेमके किती लोकांना अटक केली हे का सांगत नाही असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन ८ नव्हे तर ११ लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा, ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना घेऊन जात असल्याचं दाखवलं जात असल्याचं दाखवलं होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने पीसी घेऊन १४ लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या १४ लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे.

    मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचं पद दिलं. दीड वर्षापूर्वी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झालं.

  • 07 Nov 2021 10:04 AM (IST)

    नवाब मलिक काय म्हणाले?

    2 ऑक्टोबर रोजी पार्टीची खबर आली होती. एका मेगास्टारच्या मुलाला ताब्यात घेतल्याची बातमी आली. ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खान सहीत आठ लोकांना अटक केल्याची बातमी आली. ६ तारखेच्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावर आम्ही काही प्रश्न केले होते. ते फर्जीवाडा असल्याचं म्हटलं होतं.

    दोन व्यक्तीचे व्हिडीओ व्हायरल केले होतेत. एक केपी गोसावी,. तो आर्यन खानला घेऊन जातांना दिसत होता. दुसरा अरबाज मर्चंटला मनिष भानुशाली घेऊन जात असल्याचं दिसत होता. हे व्यक्ती सतत एनसीबीच्या कार्यालयात जात होते हे आम्ही दाखवत होतो. हाय प्रोफाईल आरोपींना घेऊन जाणारे हे लोक कोण असा सवाल आम्ही केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर सिंह यांनी हे आमचे साक्षीदार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी या ९ साक्षीदारांचे नाव जाहीर केलं होतं.

    मलिक पूर्वग्रह ठेवून आरोप करत असल्याचं सांगितलं जात होतं. जावयाला अटक केल्यानेच मलिक आरोप करत असल्याचं सांगितलं जात होतं. मला प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर मी माहिती दिली होती.

  • 07 Nov 2021 08:27 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण

    -राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय

    -महापालिका निवडणुकांपूर्वी अनेक आजी-माजी नगरसेवक पक्ष बदल करत असताना थेट भाजप आणि राष्ट्रवादी च्या आमदारांची ही भेट अनेकांना आश्चर्यचकित करत आहे

  • 07 Nov 2021 08:25 AM (IST)

    एनसीबी एसआयटी सोमवारी मुंबईत होणार सक्रिय

    -एनसीबी एसआयटी सोमवारी मुंबईत होणार सक्रिय…

    – क्रूझ टर्मिनल, कॉर्डेलियावर जाऊन तपास करणार असल्याची माहीती…

    – एसआयटीने याआधी मुंबईत येऊन सलग तीन दिवस तपास केलेला आहे.

    – त्यात समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली आहे, तसेच काही कागदपत्रेही ताब्यात घेतली गेली आहेत.

    – प्रभाकर साईल यालाही जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याच्यापर्यंत समन्स पोहचला नाही. तो या चौकशीपासून दूरच राहिला.

    -सोमवारी ८ नोव्हेंबरला पुन्हा हे पथक मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत… क्रूझवर जाऊन तपास करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

    मुंबई येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून हे क्रूझ गोव्याला निघाले होते. त्यामुळे या टर्मिनलवरही तपास केला जाईल, अशी माहीती सुत्रांकडून मिळतेय

  • 07 Nov 2021 08:06 AM (IST)

    मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, तब्बल अडीच वर्षांनंतर सुरू होणार पॅसेंजर रेल्वे

    मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

    तब्बल अडीच वर्षांनंतर सुरू होणार पॅसेंजर रेल्वे

    अडीच वर्षांपासून बंद आहेत नांदेड विभागातील पॅसेंजर रेल्वे

    पॅसेंजर सुरू झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना मिळणार आहे दिलासा

  • 07 Nov 2021 08:00 AM (IST)

    दिवाळीनंतर महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार का याकडे लागले लक्ष

    दिवाळीनंतर महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार का याकडे लागले लक्ष

    राज्य सरकारने प्रत्येक्ष वर्ग सुरू करण्याची दिली परवानगी

    मात्र सगळ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण अनिवार्य आहे

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि तंत्र शिक्षण विभाग याना अजूनही विधर्थ्यांच्या लसीकरणाचा डेटा उपलब्ध झाला नाही

    त्यामुळे उपस्थित होत आहे प्रश्न चिन्ह

    विद्यापीठ काय पावलं उचलणार याकडे लागलं आहे विद्यार्थ्यांचे लक्ष

  • 07 Nov 2021 07:54 AM (IST)

    मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा

    मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा

    अतिवृष्टीग्रस्त शेतजाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली तब्बल अडीच हजार कोटींची रक्कम

    मराठवाड्यातील तब्बल 47 लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा

    अतिवृष्टीग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाईची मदत

  • 07 Nov 2021 07:49 AM (IST)

    नाशिक पंचवटी परिसर बनला टवाळखोरांचा अड्डा

    नाशिक – पंचवटी परिसर बनला टवाळखोरांचा अड्डा

    रामकुंड,गोदाघात,काळाराम मंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास तवाळखोरांचा त्रास

    रस्त्यावर मद्यपान करून केली जाते महिलांची छेडछाड

    नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊन देखील पोलीस प्रशासन ढिम्म..

    पोलिसांनी गस्ती वाढवण्याची नागरिकांची मागणी

  • 07 Nov 2021 07:49 AM (IST)

    नाशिक स्मार्ट सिटीच्या कामांचा शहरात उडाला बोजवारा, अर्धवट झालेल्या कामांमुळे नाशिककरांचे प्रचंड हाल

    नाशिक – स्मार्ट सिटीच्या कामांचा शहरात उडाला बोजवारा

    अर्धवट झालेल्या कामांमुळे नाशिककरांचे प्रचंड हाल..

    काहइ तासांच्या पावसाने रस्त्यांवर साचक पाणी

    व्यापारी, दुकानदारांकडून महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी

    कोट्यवधींचा निधी पाण्यात, तरी लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत

  • 07 Nov 2021 07:42 AM (IST)

    लष्करी विमानांचा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी भुजबळ आग्रही

    नाशिक – लष्करी विमानांचा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी भुजबळ आग्रही

    प्रकल्प नाशिकला आणण्यासाठी भुजबळ यांचे रतन टाटा यांना साकडे

    22 हजार कोटींची प्रकल्प नाशिकमध्ये आल्यास होणार जिल्ह्याचा कायापालट

    HAL नंतर एकही मोठा प्रकल्प नाशिकमध्ये नाही

    टाटांचा प्रकल्प नाशिकमध्ये आल्यास 6 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता

  • 07 Nov 2021 07:42 AM (IST)

    नागपूर महानगरपालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत तयार होणार

    महानगर पालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबर पर्यन्त तयार होणार

    नवीन रचनेत 52 प्रभाग , तर 156 नगरसेवक राहण्यावर शिक्कामोर्तब

    महापालिका यंत्रणा लागली कामाला

    आगामी काळात होणार आहे महापालिकेच्या निवडणूका

    लोक संखे नुसार ठरणार जाती,जमाती व महिला आरक्षण

    राजकीय पक्षांच्या सुद्धा जोरदार हालचाली सुरू

  • 07 Nov 2021 07:24 AM (IST)

    – खडकवासला प्रकल्पातील 4 धरण क्षेत्रात आज अखेर 27.57 टीएमसी पाणीसाठा

    – खडकवासला प्रकल्पातील चार धरण क्षेत्रात आज अखेर 27.57 टीएमसी पाणीसाठा,

    – गेल्यावर्षी आज दिवशी या प्रकल्पात 28.97 टीएमसी पाणीसाठा होता,

    – शहरला खडकवासला,वरसगाव , टेमघर आणि पानशेत धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

  • 07 Nov 2021 07:24 AM (IST)

    पुणे शहरासह जिल्ह्यात आज आकाश अंशत: ढगाळ राहणार

    शहरासह जिल्ह्यात आज आकाश अंशत: ढगाळ राहणार,

    – शिवाय तुरळक पाऊस पडण्याची शक्यता,

    – तर सोमवारी हवामान कोरडे राहील,

    – हवामान विभागाने वर्तविला अंदाज,

    – गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

  • 07 Nov 2021 06:46 AM (IST)

    पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का, मोदी-शहा आज दिल्लीत नवी रणनीती आखणार

    देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला होता. मात्र, पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपला धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले होते. अन्य राज्यांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांचा बदलता कल लक्षात घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी कोणती नवी रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.

Published On - Nov 07,2021 6:42 AM

Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.