महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
भंडारा :5101 दिव्यांनी उजळून निघाले पवनी शहर
पवनी शहरातील ऐतिहासिक पवनराजा परकोट किल्ल्यावर 5101 दिव्यांचा दीपोत्सव
– विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरात 5101 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा साजरा
यानिमित्त किल्ले निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्य
पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळवल्याची माहिती
गेल्या आठवड्याभरापासून होतो आहे त्रास
गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली होती आरोग्य तपासणी
केल्या होत्या काही शारीरिक चाचण्या
पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता
दिवाळी निमित्त ‘वर्षा’वर शुभेच्छांच्या भेटीगाठीही मुख्यमंत्र्यांनी टाळल्या
मुंबई : एस.टी. कर्मचारी संपाचा मुद्दा ‘जैसे थे’
आजही हायकोर्टात संपावर तोडगा नाहीच
कर्मचारी संपावर ठाम, राज्य सरकारचा अद्यादेश अमान्य
संपकरी संघटना, राज्य सरकारसह सर्वांना आपली भूमिका प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर केली जोरदार टीका
सरकारचा गलथान कारभार सुरू
आम्हाला वाटलं ठाकरे सरकार आहे, मात्र ते दोन्ही काँग्रेसमध्ये गुतले असून या सरकारच्या पापाचा घडा भरला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांची टीका
नागपूर : भर वस्तीत असलेल्या नाल्यात आढळली मगर
– धरमपेठ परिसरातील नाल्यात आढळली मगर
– स्थानिक मुलांनी मगरीचे फोटो काढले
– वेणा नदीच्या पुरातून मगर नागपुरातील नाल्यात आल्याची शक्यता
– वन विभागाच्या टीमकडून मगरीचा शोध सुरु
– नाल्याशेजारी राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
औरंगाबाद ब्रेकिंग : सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदाराची घसरली जीभ
शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांची घसरली जीभ
राज्यातील ग्रामसेवकांबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य
सगळ्यात भामटे ग्रामसेवक असल्याचं केलं वक्तव्य
तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही
शिवसेना आमदारांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे खळबळ
राज्यातील ग्रामसेवकांवर खालच्या भाषेत केली टीका
अहमदनगर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला ठराव
जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनेबरोबरच इतर काही तक्रारी होत्या
त्यानुसार हा ठराव करण्यात आल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : नारायण राणे राजभवन येथे पोहोचले
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी नारायण राणे राजभवनात दाखल
मुंबई – अडीच तास उलटूनही प्रभाकर साईलची अद्याप चौकशी सुरूच
– CRPF कॅम्प ऑफिसमध्ये एनसीबीची टीम करतीये चौकशी
– प्रभाकर साईलसोबत वकील तुषार खंदारे आहेत हजर
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचा इंदापूरमध्ये रास्तारोको
इंदापूर शहरातील पुणे- सोलापूर महामार्गावर बसस्थानकासमोर आंदोलन सुरू
मागण्या मान्य न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा दिला इशारा
आंदोलन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
एसटी महामंडळाचा प्रश्न चिघळलाय यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार
कर्मचाऱ्यांशी किमान संवाद साधणं गरजेचं
आज महामंडळ आणि कर्मचारी वा-यावर
कर्मचाऱ्यांची मागणी काय आजची नाही
मंत्री तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी अवस्था
कर्मचाऱ्यांशी तात्काळ संवाद सुरू करा
मुलभुत मागण्या मान्य करून राज्यातील जनतेचे हाल थांबवा
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
हे सरकारला जबाबदारी झटकण्याच्या कामाचं
काही घडलं की केंद्राकडे बोट दाखवलं जातं
जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी नवाब मलिक दररोज पत्रकार परिषदा घेतात
राधाकृष्ण विखे पाटील यांची आघाडी सरकारवर टीका
भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे न्यायालयात,
वृत्त वाहिनीवरील चर्चासत्रात काँग्रेस पक्षावर निराधार आरोप करत बदनामी केल्याचा आरोप,
नागपूरच्या जिल्हा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी मानहाणीचा दावा,
सोमय्या यांच्या विरोधात 1 रुपया मानहाणीचा दावा,
यापूर्वी अतुल लोंढे यांनी सोमय्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे आधीच केली आहे तक्रार
मी मुंबईचा पालकमंत्री, अनेक कार्यक्रमांची निमंत्रण येत असतात
काशिफने मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण दिलं होतं
जिकडे जायचं नाही त्याची मी माहिती घेत नाही
ड्रग्ज प्रकरणातील सर्व पुरावे नवाब मलिक यांनी मीडियासमोर ठेवलेत
काशिफने मला निमंत्रण दिलं, त्याने मला फोन केला होता, पण मी त्याला ओळखत नाही
आमंत्रणापाठीमागचा कट काय, त्याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा
या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम सुरु
गुजरातमध्ये मिळालेल्या 4 हजार कोटींच्या ड्रग्जचं काय झालं
हा देश सरकार चालविणार की उद्योगपती
क्रूझ पार्टीला परवानगी देण्याचं काम राज्य सरकारचं नाही
सुशांत सिंग प्रकरणाचं पुढे काय झालं
कोर्टात व्हॉट्सअॅप चॅट ग्राह्य धरत नाही, पुरावा धरत नाहीत
मग फक्त चॅटच्या आधारावर अटक कशी काय?
Actor Kangana Ranaut receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/rIQ60ZNd9i
— ANI (@ANI) November 8, 2021
Singer Adnan Sami receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/SfL988lugY
— ANI (@ANI) November 8, 2021
Delhi: Olympian badminton player PV Sindhu awarded the Padma Bhushan pic.twitter.com/TqUldnQgr3
— ANI (@ANI) November 8, 2021
Delhi: Former External Affairs Minister Sushma Swaraj awarded the Padma Vibhushan award posthumously. Her daughter Bansuri Swaraj receives the award. pic.twitter.com/fernxD24j2
— ANI (@ANI) November 8, 2021
Noted Hindustani classical singer Pandit Chhannulal Mishra receives the Padma Vibhushan award 2020. pic.twitter.com/IEsJ2AtGt3
— ANI (@ANI) November 8, 2021
Captain of the women’s hockey team Rani Rampal, who led the team in the recent Tokyo Olympics, being conferred the Padma Shri award 2020. pic.twitter.com/T5aUKfprpg
— ANI (@ANI) November 8, 2021
141 जणांना पद्म पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित
आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात. पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
NCB चे DDG ज्ञानेश्वर सिंग मुंबई एयरपोर्टवर उतरले,
अडीज वाजता प्रभाकर साईलची चौकशी करणार
ज्ञानेश्वर सिंह म्हणाले,गरज पडली तर संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलविणार
NCB Deputy Director General Gyaneshwar Singh, who is leading a vigilance team of the agency, leaves for Mumbai from Delhi airport
The vigilance team has summoned Prabhakar Sail, a witness in drugs-on-cruise-case to record his statement in alleged payoff in the case today pic.twitter.com/Gvj2HPvoDI
— ANI (@ANI) November 8, 2021
I won’t take names but all those who are needed will be called (for questioning). I expect Prabhakar Sail to come today (for questioning): NCB Deputy Director General Gyaneshwar Singh in Mumbai pic.twitter.com/16ELDQVEFz
— ANI (@ANI) November 8, 2021
प्रयत्न करुनही मविआ सरकार पाडणं शक्य झालं नाही
वैफल्य येणं स्वाभाविक आहे
सीमेवर चीनने गावं वसवली, जमत असेल तर त्यांना उखडा
संजय राऊत यांचं जेपी नड्डा यांना प्रत्युत्तर
औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर आज पडणार हातोडा
घरे पडण्याच्या भीतीने लेबर कॉलनीतील लोकांची रस्त्यावर गर्दी
घरे पडण्याच्या निर्णयाला लेबर कॉलनीतील नागरिकांचा तीव्र विरोध
आज दहा वाजेपर्यंत घरे खाली करण्याचा शासनाने दिलाय अलटीमेटम
महिला मुला बाळांसह नागरिक उतरले रस्त्यावर
क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस
पुण्यात ड्रग्जप्रकरण प्रलंबित
समीर वानखेडे यांनी उत्तर देण्याचं मलिकांचं आव्हान
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
मनसे नेते मा. बाळा नांदगावकर साहेब हे अहमदनगर जिल्हा रुग्णालयास आज दिनांक 8-11-2021 रोजी सकाळी 11-00 वाजता भेट देऊन जखमींची भेट घेणार आहेत
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 3.30 वाजता कार्यक्रमात सहभागी होणार
स्वारगेट बस डेपोत कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी,
सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी,
जिल्ह्यातील 13 डेपो राहणार आज बंद,
लांब पल्ल्याच्या गाड्या फक्त सुरू,
जिल्हा अंतर्गत प्रवासी सेवा राहणार बंद
पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीच्या चार दिवसामध्ये शहरात विविध ठिकाणी 37 चोरीच्या घटना घडल्यात यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल, पैसे, दागिन्यांची चोरी झाली आहे
-या सर्व घटनांमध्ये तब्बल 25 हजार 86 हजार 247 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे
-भोसरी, सांगवी, चिंचवड, निगडी, पिंपरी, देहूरोड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या 12 घटनांमध्ये दोन लाख 92 हजार 297 रुपये किमतीचे 17 मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत
-तर निगडी, चाकण, एमआयडीसी भोसरी, हिंजवडी, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा घटनांमध्ये जबरी चोरी आणि घरफोडी च्या घटना समोर आल्यात त्यात 17 लाख 61 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेलेत
अहमदनगर जिल्ह्यात रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर पुणे प्रशासन अलर्टवर,
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील फायर ऑडीटचा आढावा घेण्यासाठी बोलावली बैठक,
बैठकीत जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील फायर ऑगीटचा घेणार आढावा,
फायर ऑडीटचा अहवाल सादर केला जाण्याची शक्यता …
अग्निशमन दलाचे अधिकारी, पीएम आरडीएच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवरती होणार
सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्य शासनाकडे ईव्हीएम खरेदीसाठी मागितला 9 कोटीचा निधी,
राज्य शासनानं ईव्हीएम खरेदीसाठी दाखवली,
सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा निकाल मिळणार अवघ्या काही तासात,
सहकारी संस्थांच्या निवडणूका या मतपत्रिकेद्वारे होत असल्याने मतमोजणीला काही ठिकाणी दोन दिवस लागायचे,
मात्र आता राज्य शासनाने ईव्हीएम खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यानं सहकारी संस्थांच्या निवडणूका या ईव्हीएमवरती होणार
नाशिक – कोरोना नियमांबाबत शासनाची मनमानी
शहरातील मंदिरांना नियम कडक, मॉल मध्ये मात्र गर्दी
अनेक मंदिरात लहान मुलांना प्रवेश नाही
देवदर्शनासाठी येणाऱ्या पालकांना नवीन डोकेदुखी
पण मॉल मध्ये मात्र सर्वांना सर्रास प्रवेश
फायद्याचा विचार करूनच मॉल कडून नियमांची मोडतोड सुरू असल्याचा आरोप
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला नागरिकांचा विरोध असलेल्यानं भूसंपादनाची प्रक्रीया रखडली,
पर्यायी दोन जागांचा अहवाल संरक्षण मंत्रालयाला देऊनही अद्याप त्यावरती निर्णय झालेला नाहीये,
येत्या दोन महिन्यांत अंतिम मंजुरीनंतर भूसंपादनाला सुरुवात होण्याची शक्यता,
पुरंदर तालूक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातील तीन अशा एकुण आठ गावातील 3 हजार हेक्टर जिरायती जमीन संपादित करता येऊ शकते असं संरक्षण मंत्रालयास कळवण्यात आलंय
नागपूर चा संकल्प गुप्ता ठरला भारताचा नवा ग्रँड मास्टर
18 वर्षीय संकल्प ने 71 व ग्रँड मास्टर होण्याचा मान पटकावला
सर्बियात राउंड रॉबिन पद्धतीने झालेल्या स्पर्धेत अवघ्या 22 दिवसात तिन्ही नार्म मिळवत ग्रँडमास्टर ‘किताब मिळविला
नागपूरला एक नवा मान
नाशिक – दिवाळी काळात शहरात चोरीच्या घटना वाढल्या
दिवाळीच्या दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सात लाख रुपयांची चोरी
दिवाळी दरम्यान शहरात घरफोडी,वाहनचोरी च्या घटना
नागरिकांना मनस्ताप, चोरट्यांची मात्र दिवाळी
तर लक्ष्मीपूजना साठी ठेवलेली सुमारे 2 लाख रुपयांच्या दागिन्यांची देखील चोरी
तर भाऊबीजेला बाहेर निघालेल्या महिलेच्या पर्स मधून 1 लाखांच्या दागिन्यांची चोरी
शहर पोलिसांच्या दिवाळी पूर्व नियोजनावर मात्र प्रश्नचिन्ह
NCB Deputy Director General Gyaneshwar Singh, who is leading a vigilance team of the agency, leaves for Mumbai from Delhi airport
The vigilance team has summoned Prabhakar Sail, a witness in drugs-on-cruise-case to record his statement in alleged payoff in the case today pic.twitter.com/Gvj2HPvoDI
— ANI (@ANI) November 8, 2021
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उच्च न्यायालयाय सुनावणी,
काल पुण्यातील बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही,
आज मुंबईत एसटी कृती समितिची बैठक,
बैठकीत संपाबाबत ठोस भूमिका ठरणार,
न्यायालयाच्या निकालाकडेही सगळ्यांच लक्ष,
पुणे जिल्ह्यांतर्गत वाहतूक प्रवासी सेवा बंद ठेवण्याचं कर्मचाऱ्यांच एसटी वाहतूक नियंत्रकांना पत्र
सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं , मात्र उलगडा फक्त 28 टक्के गुन्ह्यांचं
गेल्या 2016 पासून2020 पर्यन्त 793 हुन जास्त गुन्ह्यांची नोंद
मात्र या पैकी फक्त 28 टक्केम्हणजे 2 29 गुन्ह्यांचा झाला उलगडा
यात जास्तीत जास्त प्रकरण फसवणुकीची आहेत
ओटीपी च्या फंड्यातून साडे आठ कोटी रुपयांचा घातला गंडा
माहिती अधिकारातून पुढे आली माहिती
भूमिपूजन समारोहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला जोडणाऱ्या 223 किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील. त्याची अंदाजे किंमत 1 हजार 180 कोटी रुपये असणार आहे. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागाचा समावेश असेल.
वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे.