Maharashtra News Live Update : सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा, चर्चेचा मुद्दा काय?
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. भाजप नेते किरीट सोमय्या आज रायगड जिल्ह्यातील कोर्लाई या गावात जाणार आहेत. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी करणार आहेत. कोर्लाईच्या सरपंचांनी किरीट सोमय्यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यामुळं आज राज्याचं लक्ष सोमय्यांच्य दौऱ्यात काय घडतंय तिकडे असेल. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळं देशातील राजकीय वातावरणं तापलेलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. पंजाबमध्ये 20 तारखेला मतदान होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
चोरोको सारे नजर आते है चोर – एकनाथ खडसे यांची गुलाबराव पाटील यांच्यावर टीका
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू असल्याचे वक्तव्य केले होते. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांचा सारखा उच्चशिक्षित निर्व्यसनी कार्यतत्पर असलेले मंत्री महोदय हे एकनाथ खडसे हे डाकू असल्याचे म्हणतात. मला अशा निर्व्यसनी माणसाबद्दल न बोललेले बरे , चोरोको सारे नजर आते है चोर अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
-
सुनील राऊत 9 तासांनंतर पवई पोलीस ठाण्यातून बाहेर
सुनील राऊत 9 तासांनंतर पवई पोलीस ठाण्यातून बाहेर आले.
सुनील राऊत म्हणाले की, पोलिसांनी कारवाईसाठी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे, त्यामुळे आज दोन दिवसांचे हे आंदोलन आम्ही संपवत आहोत.
दोन दिवसांत पोलिसांनी कारवाई केली नाही, तर दोन दिवसांनी पुन्हा आंदोलन करू.
यामध्ये जो दलाल आहे, ज्याने डुप्लिकेट पेपर तयार केला आहे, त्याच्यावर कारवाईची मागणी केली असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.
त्यानंतर तपासात कोणाचे नाव आल्यास पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील.
-
-
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणं आता फारच कठीण झालं आहे
मला वाटत होतं इथं कार्यक्रमाला पोहोचे पर्यत प्रशासनाची नोटीस येती की काय कार्यक्रम करता येणार नाही
महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून खूप वाद सुरु आहेत
जतला तर सगळा पॅरामिलिटरी फोर्स आणून बसवला आहे, जालन्यात तीन दिवस माजी मंत्री बबनराव लोणीकर उपोषणाला बसलेत
त्यामुळे एखादं कार्य ठरवलं आणि तडीस नेलं हे फारच कठीण , त्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं फार कठीण
कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मानाने जगायला शिकवलं त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून ठिकठिकाणी वाद सुरू आहेत
आम्हा सगळ्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा उत्तम प्रशासक हा एकच गुण घेण्याची गरज आहे
-
आदित्य ठाकरे यांची भाजपावर टिका
राजकारणात भाजपाने प्रदूषण वाढवले… राजकारणातील हे प्रदूषण संपवणार… आदित्य ठाकरे यांची भाजपाचे नाव न घेता टिका…. राजकारणाची पातळी घसरलीय… दररोज काहीतरी सुरू…. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मुळा साखर कारखान्यात डिस्लेरीचे उद्घाटन….
-
पहिल्या विजयात रोहित शर्मा, रवी बिश्नोई चमकले
दोन दिवसांपूर्वी झालेला पहिला टी 20 सामना भारताने जिंकला होता. सहा गडी राखून मिळवलेल्या विजयात रवी बिश्नोई आणि रोहित शर्मा चमकले होते.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
विदेशी निर्भरतेपासून मुक्ती पाहिजे
स्वदेशी आत्मनिर्भरतेवर भर
गरीब परिवारांना या नव्या सुविधांचा फायदा होईल
मुंबईच्या विकासाच्या वचनासह सर्वांना धन्यवाद
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
भारत जुन्या विचारांना मागे सोडत पुढे जातोय
गांधीनगर रेल्वेस्टेशन मोठी ओळख
अनेक रेल्वे स्टेशन वायफायने जोडली
येत्या काळात आणखी रेल्वे सेवेसाठी तयार
रेल्वेच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास
रेल्वे फॅक्टरींची स्थिती बिकट होती
वंदे भारत ट्रेन आता याच फॅक्टरीत बनत आहेत
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
कोरोना काळातही किसान रेलचा प्रयोग केला
देशभरातील शेतकऱ्यांना जोडले
सर्वांना डिजीटल माध्यामातून जोडण्याचा प्रयत्न
गतीमान काम करण्यावर आमचा भर
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
मुंबईला इतर शहरांना वेगाने जोडण्यासाठी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्टची गरज
रेल्वेने मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात
याला अधुनिक बनवण्याला आमचे प्राधान्य असणार आहे
रेल्वेने रेकॉर्डब्रेक काम केले आहे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
मागील काळात मुंबईतही मेट्रोचा विस्तार
मेट्रो नटवर्क वेगाने पसरत आहे
लोकलाचा विस्तार करणे आणि अधुनिकरणाची मागणी जुनी होती
हा प्रकल्प 2015 ला पूर्ण होणार होता
पण हा प्रोजेक्ट लटकत राहिला
त्यानंतर आम्ही यावर वेगाने काम सुरु केलं
आपल्या अधिकाऱ्यांनी अनेक मोठी कामं केली
मुंबईचे स्वतंत्र भारताच्या विकासात मोठे योगदान
आत्मनिर्भर भारतमध्येही मुंबईची योगदान
रेल्वेसाठी हजारो कोटींचे प्रकल्प येणार
मुंबई सबरबन तसेच 19 स्टेशन करण्यासाठी योजना सुरू आहे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
ही नवी रेल्वे मुंबईला आणखी गती देणार
या दोन्ही लाईनमुळे मुंबईच्या लोकांना चार फायदे होणार
यामुळे ट्रॅफिक कमी होईल, मेल गाड्या न थांबता चावता येतील
दर रविवारी असणाऱ्या ब्लॉकमुळे होणारी समस्या सुटणार
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
महाराष्ट्र राज्यपाल ,मुख्यमंत्री ,रेल्वे मंत्री ,उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवान
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live
खासदार श्रीकांत शिंदे नवीन मुलगा आहे, काम करणारा आहे, अनेक गोष्टी चा पाठपुरावा करत आहे
रेल्वे मध्ये अनेक अडचणी होत्या मात्र केंद्र आणि मोदी यांच्या मुळे सहकार्य मिळाले
या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेमुळे जलद होणार आहे
अनेक विकास कामांचे जाळे पसरत आहे
विकास झाला की लोकसंख्येसाठी त्याचा उपयोग होणार आहे
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live
रेल्वे मार्गाच्या लोकर्पणात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी लाईव्ह
मुख्यमंत्र्यांनी सांगितला इंग्रजांच्या काळातील किस्सा
इंग्रजांच्या काळात कुणी रेल्वेत बसायला तयार नव्हतं
इंग्रजांनी पैसे आणि सत्कार करून रेल्वेत बसवलं
मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानले
-
पक्षातील नगरसेवक सोडून चालल्याने मानसिक संतुलन बिघडले – शिवसेनेना
कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप च्या नेत्यावर केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे .आदित्य ठाकरे यांच्यावर मानसिक परिणाम झाला असल्याची टीका भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली .शिवसेनेकडून आमदार चव्हाण यांना प्रत्युत्तर देण्यात आला आहे .शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीत होत असलेली विकासकामे पाहून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत ,हे बघून काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडल्याने अशी वक्तव्य करत आहेत ,या वक्तव्याचा निषेध करतो ,त्यांनी जर विकासकामे केली असती तर त्यांना हे दिवस बघावे लागले नसते असा टोला युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी लगावला आहे
-
अन्वय नाईक कुटुंबीय बाईट
आदन्या नाईक ( मुलगी अन्वय नाईक) हो आम्हाला गावकरी सगळे सांगत होते गावाकडची सगळेच लोकं सांगत होती अर्णव गोस्वामी ला अटक झाल्यानंतर हाच सगळीकडे धावत होता. रश्मीताई ना माझी विनंती आहे हा एवढा इंटरेस्ट घेत आहे त्याला एखादं माळ्याचं काम तरी द्या माझ्या वडिलांनी लावलेली झाड त्याची देखरेख करेल 19 कशाला उद्या म्हणेल हजार बंगले आहेत म्हणेल हिरे पण निघत आहेत त्या जमिनीत ना त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी
अनन्या नाईक (अन्वय नाईक यांची पत्नी)
देशाच्या सुरक्षेसाठी जो पैसा चाललाय तोही वाचेल किरीट सोमय्या नाही सांगते 22 व्या शतकात तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन हवी आहे तर शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही आरटीआय टाकून ही ते करता येईल
रश्मी जीना विनंती आहे त्यांनी याला माळ्याची नोकरी द्यावी माझ्या नवऱ्याने किती झाडे लावली आहेत ती सुकत आहेत त्याला चहाची एक टपरी टाकून द्या गेटवर म्हणजे आमच्या चहा ची सोय होईल आणि गादी चालवता येईल
असू शकेल अर्णव गोस्वामी ला अटक झाल्यानंतर जिथे तिथे किरीट सोमय्या दिसते सगळीकडे
किरीट सोमय्या यांनी हे इमीजेट थांबवावं नाही तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू
आदन्या नाईक ( मुलगी अन्वय नाईक)
ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या बाजूने उभे राहणार की गुन्हेगाराला पाठीशी घालणार माझ्या बाबांनी जमीन विकली तेव्हा कोणाच सरकार होतं ते काही बोलले नाहीत आता का तो बोलत आहे राजकीय सूडबुद्धीने खोटं बोलत आहे
-
अमरावती
मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वर शाई फेक प्रकरण….
न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार व रुग्णालयात असलेल्या एका आरोपींच्या जामीना संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली…
चार आरोपीं संदर्भात 23 तारखेला तर रुग्णालयात असलेल्या आरोपी संदर्भात आता 21 तारखेला सुनावणी..
पोलिसांनी जवाब न पाठवल्याने लांबली सुनावणी…
रवी राणा यांच्या वकिलांची माहिती..
अजय बोबडे,संदीप गुन्हाने,सुरज मिश्रा,महेश मुलचंदनी हे आहेत अमरावती कारागृहात तर विनोद येवतीकर आहेत रुग्णालयात…
-
नाशिक
स्मार्ट सिटी प्रशासनाला शिवसेना नगरसेवकांचे पत्र
महा आयटी कंपनीच्या कामांची श्वेत पत्रिका काढण्याची मागणी
अन्यथा स्मार्ट सिटी वर मोर्चा नेण्याचा शिवसेनेचा इशारा
शहरातील अनेक काम स्मार्ट सिटी कंपनीने वर्ग केले महा आयटी ला
महा आयटी कंपनीने हातात घेतलेले शहरातील काम अर्धवट अवस्थेत
शहरात 800 सीसीटीव्ही कॅमेरे, कमांड कंट्रोल रूम काम अर्धवट
काम अर्धवट असताना महा आयटी कडून आणखी पैशांची मागणी
महा आयटी कंपनीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता आरोप
-
सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा
फोनवरून दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा
राज्यातल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर आज दोन नेत्यांमध्ये चर्चा
काल मुख्यमंत्र्यांची काँग्रेस नेत्यांमध्ये झाली होती बैठक
मविआ मधील सध्यस्थिती बाबत चर्चा झाल्याची माहिती
-
किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल
किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल
19 बंगले हरवल्याची तक्रार किरीट सोमय्या देणार
किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देणार
-
किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार
किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार
19 बंगले हरवल्याची तक्रार किरीट सोमय्या देणार
ग्रामपंचायतीमध्ये काही वेळ थांबल्यानंतर निघाले
-
महाविकास आघाडीचं सरकार घालवण्यासाठी सोमय्यांचा प्रयत्न : प्रशांत मिसाळ
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत.
महाविकास आघाडीचं सरकार घालवण्यासाठी प्रयत्न
आम्ही किरीट सोमय्यांना आडकाठी केलेली नाही
पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते कोर्लई सरपंचांची भूमिका
आम्ही तीन वेळा सहकार्य केले होतं.
या तालुक्यात शिवसेनेची ताकद मात्र आम्ही वापरली नाही
माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तेव्हा त्यांना सहकार्य केलं
आम्ही कोणत्याही कार्यकर्त्यांना बोलावलं नव्हतं टीव्ही पाहून कार्यकर्ते आले
-
किरीट सोमय्या ग्रामंपचायत कार्यालयातून बाहेर पडले, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
किरीट सोमय्या ग्रामंपचायत कार्यालयातून बाहेर पडले,
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
किरीट सोमय्यांना पोलिसांचं संरक्षण, सीआयएसएफचंही संरक्षण
ग्रामपंचयात कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते जमले
किरीट सोमय्यांच्या ताफ्यामागे भाजप कार्यकर्ते निघाले
-
कोर्लईत किरीट सोमय्या पोहोचले, शिवसेना भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
कोर्लई ग्रामंपंचयातीबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याची मागणी
पोलिसांकडून लाठीमार
-
किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचयातीच्या कार्यालयाबाहेर पोहोचले
किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचयातीच्या कार्यालयाबाहेर पोहोचले
फक्त सोमय्यांच्या गाडीला परवानगी
भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या
माध्यमांच्या गाड्यांना परवानगी
-
किरीट सोमय्यांचा ताफा कोर्लई गावात दाखल
किरीट सोमय्यांचा ताफा कोर्लई गावात दाखल
किरीट सोमय्यांसोबत मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते
कोर्लईच्या सरपंचांची विरोध न करण्याची भूमिका
-
बोदवड नगरपंचायत सेनेच्या ताब्यात, नगराध्यक्षपदी आनंदा पाटील
बोदवड नगरपंचायत सेनेच्या ताब्यात
बोदवड नगरपंचायत ची निवड नगराध्यक्षपदी आनंदा पाटील यांची निवड
उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड
-
भाजपा खासदार गिरीश बापटांच्या घरासमोर काँग्रेस करणार आंदोलन
भाजपा खासदार गिरीश बापटांच्या घरासमोर काँग्रेस करणार आंदोलन
मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी करणार आंदोलन,
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात,
भाजपकडूनही काँग्रेसला विरोध होणार,
पोलिसांनी बापटांच्या घराकडे जाणारा रस्ता अडवला..।
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधीर जोशींच्या पार्थिवाचं दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधीर जोशींच्या पार्थिवाचं दर्शन
सुधीर जोशी यांची पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळख
राज ठाकरेंनी देखील सुधीर जोशी यांच्या पार्थिवाचं दर्शन
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी भावूक
रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित
-
अन्वय नाईक यांना किरीट सोमय्यांनी धमकी दिल्याची माझ्याकडे माहिती : संजय राऊत
मी काल सांगतिलं ते जेलमध्ये जातील, जेलमध्ये जाण्यासाठी ते मार्ग शोधत आहेत. लवकरच जनता त्यांच्या मागे लागेल. जनता मागे ते पुढं अशी स्थिती राहील.
मी बंगले दाखवा असं सांगितलं होतं. त्यांची बेनामी संपत्ती असेल ती त्यांना दिसत असेल.
यासंदर्भात वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे. संरपंच यांनी माहिती दिली आहे. हा भुताटकीचा प्रकार दिसतोय.
त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक होते. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर भाजपचे लोक बोलत नाहीत
अन्वय नाईकला ज्याच्यामुळं आत्महत्या लागली त्याच्या समर्थनार्थ हे भाजपचे लोक बोलत होते.
अन्वय नाईक यांना किरीट सोमय्यांनी धमकी दिल्याची माझ्याकडे माहिती आहे. अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, अशी धमकी किरीट सोमय्यांनी दिली. धमकीनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली.
महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी उद्योजकांना संपवायचं आहे. अन्वय नाईक यांचे हे सर्व गुन्हेगार आहेत. आता एक गुन्हेगार तिथे जात आहे, अस संजय राऊत म्हणाले
सोमय्या नेल्सन मंडेला आहे का?
-
नागपूरमध्ये स्टार बस ठप्प, वाहक चालकांचा संप
नागपूरमध्ये स्टार बस ठप्प, वाहक चालकांचा संप
पगार नसल्यानं वाहक आणि चालकांनी संप केला आहे
नागपूरमध्ये विद्यार्थी आणि प्रवाशांचं हाल होतय
-
सोलापुरातील व्हिआयपी रोडवरील मलबार हिल ज्वेलर्सच्या सुरक्षा भिंतीत घुसला डंपर
– सोलापुरातील व्हिआयपी रोडवरील मलबार हिल ज्वेलर्सच्या सुरक्षा भिंतीत घुसला डंपर
– ज्वेलरी दुकानाजवळ घडलेल्या अपघाताने मोठी खळबळ
– ज्वेलरी दुकानाचे सुरक्षा रक्षक बालंबाल बचावले
– अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करतायत
– रात्री साडे दहाच्या सुमारास घडला अपघात
-
आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे : किरीट सोमय्या
आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे : किरीट सोमय्या
कोल्हापूर, अमरावती आणि पुण्यात दगड मारण्यात आला
पुण्यात तिथं हजारो नागरिकांनी सत्कार केला होता
आम्हाला अडवलं तरी कुणीही दंगल करणार नाही
प्रशासनानं अडवलं तरी पुन्हा त्यावेळी जाईन
मुख्यमंत्री परिवाराकडून चूक झाली असेल तर जनतेला सांगा चूक झाली
-
महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे : किरीट सोमय्या
महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे
ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतो, ज्या सरपंचानं मे 2019 महिन्याच्या सभेत, रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 ला अर्ज केला.
जमीन माझ्या नावावर झाली, घरं माझ्या नावावर करा असं पत्र लिहिलं
मे 2019 मध्ये याच सरपंचानी तो प्रस्ताव मंजूर केला. ती घरे जून महिन्यात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ती जमीन करण्यात आली.
मी अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध समोर आणले त्यानंतर दुसऱ्या दिवशी कर भरला
अन्वय नाईक यांच्या नावानं कर भरला
पाच कोटी रुपये एप्रिल 2020 मध्ये भरलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवलं नाही
महाराष्ट्राच्या जनतेला घरं आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे
महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला किरीट सोमय्याकडून अपेक्षा आहेत
आमचे कार्यकर्ते देखील तिथं येणार आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करणार नाही, कार्यकर्त्यांना समजून घ्यायचं आहे.
-
अब्दुल सत्तार यांना आणखी एक मोठा झटका
अब्दुल सत्तार यांना आणखी एक मोठा झटका
अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश
निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी चौकशीचे आदेश
अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
निवडणूक शपथपत्रात मालमत्ता आणि शिक्षणाबद्दल दिली होती खोटी माहिती
सिल्लोड न्यायालयात सत्तारांविरोधात केला होता दावा दाखल
अभिषेक हरीदास आणि महेश शंकरपल्ली यांनी केला होता दावा दाखल
-
पुणे जिल्हा परिषदेची मुदत 20 मार्चला संपणार
पुणे जिल्हा परिषदेची मुदत 20 मार्चला संपणार
जिल्हा परिषदेवरतीही प्रशासक येण्याची शक्यता,
आज जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प होणार सादर
आचारसंहिता लागण्याच्या आधी अर्थसंकल्प सादर करण्याची धडपड सुरू आहे
आज सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे..
23 गावांचा समावेश महापालिकेत झाल्यानं अर्थसंकल्पात घट होण्याची शक्यता आहे
मात्र नवीन योजना जिल्हा परिषद जाहीर करते का ? हे पाहणं महत्त्वाचं आहे…
-
किरीट सोमय्या आज कोर्लाईच्या दौऱ्यावर
भाजप नेते किरीट सोमय्या आज रायगड जिल्ह्यातील कोर्लाई या गावात जाणार आहेत. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी करणार आहेत. कोर्लाईच्या सरपंचांनी किरीट सोमय्यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यामुळं आज राज्याचं लक्ष सोमय्यांच्य दौऱ्यात काय घडतंय तिकडे असेल.
Published On - Feb 18,2022 6:10 AM