Maharashtra Marathi News Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात

| Updated on: Nov 22, 2023 | 10:02 PM

Maharashtra Mumbai Marathi News Live : आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Marathi News Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याचा आज 8 वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्यात आहेत. मनोज जरांगे पाटील त्रिंबकेश्वराचे दर्शन घेत अभिषेक करणार आहेत. नाशिकमधील शेनीत फाटा येथे सभेच्या माध्यमातून साधणार संवाद. आदित्य ठाकरे यांच्या कोकणात खळा बैठका सुरु होणार आहेत. पदाधिकारी, ग्रामस्थांशी संवाद साधणार. शिवसेनेच्या उद्यापासून कोकणात खळा बैठका सुरू होत आहेत. कोकणातील घरासमोरील अंगणाला खळा असे म्हटले जाते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवारपासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून कोकणवासीयांशी ते खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Nov 2023 09:58 PM (IST)

    Jalgaon News | गिरीश महाजन यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट

    माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन पोहोचले सुरेश जैन यांच्या निवासस्थानी. मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट. सुरेश जैन यांच्या निवासस्थानावर गिरीश महाजनांची व सुरेश जैन यांची बंददाराआडा चर्चा. अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता.

  • 22 Nov 2023 07:20 PM (IST)

    पंढरपुरात फडणवीसांची मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुरु

    पंढरपूर : पंढरपुरातील मराठा समाजासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू झालीय. पंढरपुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी विश्रामगृहामध्ये दाखल झाले आहेत.  उपमुख्यमंत्र्याबरोबर मराठा समाजाच्या मागण्यांवरती चर्चा होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.  त्यानंतर मराठा समाजाने माघार घेत आपल्या मागण्या मांडल्या होत्या.  या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बैठक सुरू आहे.

    ‘या’ आहेत मागण्या :

    १) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या मनोज रंगे पाटील यांना दिलेल्या 24 डिसेंबर 2023 त्या मुदतीत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

    २) पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या दप्तरातील जन्म व जात नोंदणी सापडून येत नाहीत. सदर जुनी दप्तर उपलब्ध करून मोडी व उर्दू लिपीच्या माहितगारांची शासनाने नियुक्त करावी

    ३) पंढरपूर शहरामध्ये शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेत मराठा भवन इमारतीची उभारणी करावी.

    ४) पंढरपूर येथे मराठा मुले व मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे

    ५) सारथी संस्थेचे पंढरपूर येथे उपकेंद्र उभारण्यात यावे

  • 22 Nov 2023 06:29 PM (IST)

    कार्तिक यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपुरात महाआरोग्य शिबिर

    पंढरपूर : कार्तिक यात्रेत येणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबिर भरवले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाआरोग्य शिबिराला भेट देणार आहेत.

  • 22 Nov 2023 05:29 PM (IST)

    Devendra Fadnavis | कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री पंढरीत दाखल

    पंढरपूर | गुरुवारी 23 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिक एकादशीच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस सपत्निक शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेसाठी फडणवीस पंढरीत दाखल झाले आहेत. हेलीपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपा आमदार राम सातपुते , माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपुर मंगळवेढा विधानसभेचे भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित आहेत.

  • 22 Nov 2023 05:17 PM (IST)

    Maharashtra Kesari Sikandar Shaikh | महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ची आज कोल्हापुरात मिरवणूक

    कोल्हापूर | महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या सिकंदर शेख याची आज 22 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुरीला बिंदू चौकातून सुरुवात होणार आहे. तर गजराजाच्या साक्षीने सिकंदरची मिरवणूक होणार आहे. मिरवणुकीसाठी गंगावेस तालमी सह इतर तालमीचे मल्लही उपस्थित असणार आहेत.

  • 22 Nov 2023 05:08 PM (IST)

    Amravati | छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, गुरुवारी अमरावती शहर बंदचे आवाहन

    अमरावती | रिद्धपूर येथे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली. या निषेधार्थ उद्या गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे. तर सगळीकडे शांतता असताना कोणी अमरावती शहर बंद ठेवण्याचे आवाहन करत असेल तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय.

  • 22 Nov 2023 04:53 PM (IST)

    प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात अनिल देशमुख यांचे शक्ती प्रदर्शन

    शरद पवार गटाने प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यातील शक्ती प्रदर्शन केले. माजी मंत्री गृह मंत्री अनिल देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी शहरातून बाईक रॅली काढली. घोषणांनी शहर दणाणून सोडले. शरद पवार गटाची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

  • 22 Nov 2023 04:43 PM (IST)

    बीड जाळपोळप्रकरणात 245 जणांना अटक

    बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत 245 जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक गट स्पष्ट झाले आहेत. मुख्य आरोपी लवकरच अटक होतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या जाळपोळ प्रकरणात 20 मुळे अल्पवयीन आहेत. जाळपोळ करणारी मुळे ही विद्यार्थी आहेत. अनेक मुले पालकांपासून दुर्लक्षित आहेत. कुसंगतीमुळे ही मुले या जाळपोळ घटनेत ओढली गेल्याचे समोर आले आहे. सर्व आरोपी जिल्ह्यातील आहेत. जिल्हाबाहेरील आरोपींचा यात समावेश नाही. ज्या नेत्यांची घरे जाळली आहेत त्या आरोपींचा शोध लागला आहे. आरोपीत सर्वच पार्टीच्या लोकांचा समावेश आहे. आरोपी निष्पन्न करण्यासाठी 16 टीम काम करत आहेत.

  • 22 Nov 2023 04:32 PM (IST)

    सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची जय्यत तयारी

    पुणे शहरात १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत सवाई गंधर्व संगीत महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी १६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परवानगी दिली. दरम्यान पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १४ दिवस सवलत देण्यात आली आहे. शिल्लक राहिलेला १ दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून १६ डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • 22 Nov 2023 04:19 PM (IST)

    आमच्यात माणुसकी, एकच फोटो शेअर केला

    आमच्यात माणुसकी असल्याचे सांगत, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील एकच फोटो शेअर केल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. भाजप आणि त्यांच्या यंत्रणांकडून विरोधकांच्या मागे जो ससेमिरा लावल्या जात आहे. त्यांची नाहक बदनामी करण्यात येत आहे, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बागेश्वर बाबांवरही त्यांनी टीका केली. अद्वय हिरे यांच्या भेटीसाठी ते आले होते. हिरे हे कर्ज फेडण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. दादा भुसे यांचा दारुण पराभव होणार असल्याचे ते म्हणाले.

  • 22 Nov 2023 04:06 PM (IST)

    उद्या अमरावती बंदचे आवाहन

    अमरावतीच्या रिद्धपूर येथे सोशल मीडियावर महापुरषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने उद्या अमरावती शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापारी संघटनाना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, चांदूर बाजार,आणि मोर्शी शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 22 Nov 2023 04:01 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबाच्या दरबारात

    गेल्या तीन दिवसांपासून बागेश्वर बाबांचा पुण्यात कार्यक्रम सुरु आहे. ते देहूत सुद्धा गेले. संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात ते गेले. त्यांनी दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबाच्या दरबारात हजेरी लावली.

  • 22 Nov 2023 03:48 PM (IST)

    महाराष्ट्राचं व मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्ती करतेय – सुप्रिया सुळे

    महाराष्ट्रचं मराठी माणसाचं नुकसान कसं होईल ह्याचा प्रयत्न दिल्लीतील अदृश्य शक्ती करीत आहे, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांना देखील तसंच वागवतात.. या सर्वांमध्ये कॉमन फॅक्टर सर्व जण मराठी स्वाभिमानी आहेत.. त्यांचं खच्चीकरण करण्याचं कामं दिल्लीची अदृश्य शक्ती करत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

  • 22 Nov 2023 02:59 PM (IST)

    युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

    पुणे : युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हे कार्यकर्ते विरोध करणार होते. यावेळी देवेंद्र फडणवीस पुण्यात येण्याआधी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

  • 22 Nov 2023 02:58 PM (IST)

    आमदार बच्चू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत बैठक

    मुंबई : आज दुपारी 4.30 वाजता आमदार बच्चू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्रीवर बैठक होणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात तीन दिवसापूर्वी बच्चू कडू यांचा मनोज जरांगे यांच्याशी फोन वरून संवाद सुरु आहे. मराठा आरक्षणा संदर्भात आतापर्यंत काय प्रगती झाली त्याचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून बच्चू कडू आढावा घेणार आहेत.

  • 22 Nov 2023 02:55 PM (IST)

    पुढील महिन्यात ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन

    नाशिक : पुढील महिन्यात नाशिकच्या सातपूर परिसरातील हॉटेल डेमॉक्रसी येथे ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी या अधिवेशनाच्या जागेची पाहणी केली. या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांशी नियोजनाबाबत चर्चा करणार आहे.

  • 22 Nov 2023 02:45 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल

    पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळावर दाखल होत आहेत. ते पुण्यात बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्या नंतर ते पुढे पंढरपूरला रवाना होणार आहेत.

  • 22 Nov 2023 02:40 PM (IST)

    भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

    जळगाव : जळगावातील तापी पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांचे अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर झोपा काढो आंदोलन. तापी पाटबंधारे विभागाकडून भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकरी आक्रमक. तब्बल 16 वर्षापासून चोपडा तालुक्यातील 487 शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे मिळेना. पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही 23 कोटीचा भूसंपादनाचा मोबदला.

  • 22 Nov 2023 02:35 PM (IST)

    अमरावती : अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातील बोरगाव पेठ गावचे पुनर्वसन आणि विविध मागण्यांसाठी भाजपच्या माजी नगरसेविकेचे उपोषण. जिल्हा कार्यकारनी सदस्य अक्षरा लहाने यांचे उपोषण. कुठलाही तोडगा न निघाल्याने आज उपोषणकर्त्यांनी सुरू केले परतवाडा ते अमरावती मार्गावर चक्काजाम आंदोलन. विविध मागण्यांसाठी भाजपच्या माजी नगरसेविका अक्षरा लहाने आक्रमक.

  • 22 Nov 2023 02:25 PM (IST)

    जिल्हापरिषद अभ्यागत कक्षाला आग

    हिंगोली : जिल्हापरिषद अभ्यागत कक्षाला आग लागली आहे. फर्निचर, खुर्च्या सह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली असून आग आटोक्यात आली आहे.

  • 22 Nov 2023 02:20 PM (IST)

    पंकजा मुंडे यांचा रील चर्चेत

    बीड: आता मला जवळचं स्पष्ट दिसतंय असं म्हणत चष्मा लागल्यानंतर पंकजा मुंडेंनी बनविलेला रील चर्चेत आली आहे. पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय.

  • 22 Nov 2023 02:18 PM (IST)

    जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी

    मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पुढील आठवड्यात बैठक. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा मांडला जाणार आहे. मुख्य सचिव आणि अर्थमंत्री अजित पवारांकडे अहवाल सादर. पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत समन्वय समितीची बैठक होणार आहे.

  • 22 Nov 2023 02:07 PM (IST)

    दुकानांवरच्या पाट्या मराठीत करा अन्यथा परिणामांसाठी तयार रहा – मनसे

    पनवेल : २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकतर दुकानांवरच्या पाट्या मराठीत करा अन्यथा परिणामांसाठी तयार रहा असा इशारा मनसेने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे हा गुन्हा आहे. आमच्यावर गुन्हे नोंदवायचे असतील तर आधी ज्यांनी हा गुन्हा केलाय त्यांच्यावरही गुन्हे नोंदवायला सुरूवात करा.

  • 22 Nov 2023 02:05 PM (IST)

    शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्यामुळे मनसे आक्रमक

    यवतमाळ : शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्यामुळे मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. मारेगाव येथे पंतप्रधान पिक विमा कंपनीच्या कार्यालयात राडा घालून या कार्यालयाला कुलूप ठोकले. मतदारसंघातील ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळाली नाही त्यांनी मनसेच्या कार्यालयात येऊन अर्ज दाखल करावा असे आवाहन केले आहे.

  • 22 Nov 2023 02:03 PM (IST)

    मराठा आरक्षणसाठी नियुक्त शिंदे समिती दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर

    अमरावती : मराठा आरक्षणाची शिंदे समिती अमरावती आज दौऱ्यावर. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात दोन तास चालली बैठक. मराठा आरक्षणसाठी नियुक्त करण्यात आलेली शिंदे समिती आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज अमरावती विभागिय आयुक्त कार्यालयात समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे सह पथक आले होते. या ठिकाणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.

  • 22 Nov 2023 12:57 PM (IST)

    Maharashtra News : सुनील प्रभूंच्या व्हीपवर महेश जेठमलानींकडून सवाल उपस्थित

    सुनील प्रभूंच्या व्हीपवर महेश जेठमलानींकडून सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 21 जून 2022 ला स्वःताच्या अधिकारात व्हिप बजावला होता? का? असा सवाल जेठमलानी यांनी विचारला आहे. तर पक्ष प्रमुखांच्या आदेशानंतर बैठक बोलावली असं सुनील प्रभू म्हणाले. ठाकरेंनी व्हीपसाठी लिखीत की तोंडी सूचना केल्या होत्या असा प्रश्न जेठमलानी यांनी उपस्थित केला आहे.

  • 22 Nov 2023 12:51 PM (IST)

    Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक

    जान्यातील आनंदगावमध्ये धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे. धनगर समाजातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. जालना जिल्हाधीकाऱ्यांच कार्यालय फोडल्यानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आहे होते.

  • 22 Nov 2023 12:44 PM (IST)

    Maratha Reservation : कुणबी नोंदीच्या अभ्यासासाठी शिंदे समिती नागपूरात

    कुणबी नोंदीच्या अभ्यासासाठी शिंदे समिती नागपूरात झाली आहे. तीन दिवस विदर्भातील कुणबी नोंदीचा आढावा घेणार आहे.

  • 22 Nov 2023 12:40 PM (IST)

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात बच्चु कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

    मराठा आरक्षणासंदर्भात बच्चु कडू मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

  • 22 Nov 2023 12:33 PM (IST)

    Kolhapur News : शिवरायांचा पुतळा हटवल्यानं कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये तणाव

    शिवरायांचा पुतळा हटवल्यानं कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. हडगले गावात विनापरवाणगी उभारलेला पुतळा प्रशानासे हटविला आहे. तणावानंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

  • 22 Nov 2023 12:26 PM (IST)

    Amravati News : अमरावतीत हिंदूत्ववादी संघटना आणि दुकानदारांमध्ये वाद

    शिवरायांबद्दल वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याबद्दल हिंदूत्ववादी संघटनांनी असमारती बंदची हाक दिली. काही दूकानदारांनी दूकानं उघडी ठेवल्याने कार्यकर्ते आणि दूकानदारांमध्ये वाद झाला.

  • 22 Nov 2023 11:58 AM (IST)

    शिंदे गटाकडून महेश जेठमलानी करणार युक्तीवाद

    शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील सुनावणीसाठी हजर झाले आहेत. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी युक्तीवाद करणार आहेत.

  • 22 Nov 2023 11:50 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर 12 ते 4 पर्यंत ट्राफिक ब्लॉक

    समृद्धी महामार्गावर 12 ते 4 पर्यंत ट्राफिक ब्लॉक जालना ते संभाजीनगरची वाहतूक बंद राहणार आहे. विद्युत वाहिनीच्या कामामुळे हा ब्लॉक असणार आहे.

  • 22 Nov 2023 11:45 AM (IST)

    शिवाजी पार्क परिसरात मुंबई पालिकेकडून रस्ते पाण्याने धुत

    शिवाजी पार्क परिसरात मुंबई पालिकेकडून रस्ते पाण्याने धुतले आहेत. प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत.

  • 22 Nov 2023 11:40 AM (IST)

    मी मोठ्या माणसांबद्दल बोलत नाही- मनोज जरागेंचा भुजबळांना टोला

    नाशिक जिल्हा कुणाचा नाही तो जनतेचा आहे. मोठ्या माणसांबद्दल बोलत नाही, मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांना टोला

  • 22 Nov 2023 11:30 AM (IST)

    उपमुख्यंत्री फडणवीस बागेश्वर बाबांची भेट घेणार

    बागेश्वर बाबा तुकारामांच्या दर्शनाला आल्यावर देहूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांची भेट घेणार असल्याची माहिती समजत आहे.

  • 22 Nov 2023 11:15 AM (IST)

    माझ्या वाचनात आल्यानं मी संत तुकाराम महाराजांबद्दल बोललो- बागेश्वर बाबा

    माझ्या वाचनात आल्यानं मी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोललो. वारकरी संप्रदयाची हात जोडून माफी मागितली आहे- बागेश्वर बाबा

  • 22 Nov 2023 11:00 AM (IST)

    Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलावली बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ येथे ११ वाजता बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा आणि पदवीधर निवडणुकांबाबत आढावा… या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 22 Nov 2023 10:48 AM (IST)

    Live Update : कोल्हापुरातील थेट पाईपलाईन योजनेचा ४ डिसेंबरला लोकार्पण सोहळा

    कोल्हापुरातील थेट पाईपलाईन योजनेचा ४ डिसेंबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

  • 22 Nov 2023 10:35 AM (IST)

    Live Update : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट; कडकडीत बंद

    अमरावतीच्या रिद्धपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शहरात बाजारपेठा कडकडीत बंद करण्यात आल्या आहेत. आज चांदूर बाजार, मोर्शी, दर्यापूर मध्ये 11 ते 3 या वेळेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

  • 22 Nov 2023 10:23 AM (IST)

    Live Update : ललित पाटिलला ससूनमधून पळून जाण्यासाठी पोलिसांकडून मदत

    ललित पाटिलला ससूनमधून पळून जाण्यासाठी पोलिसांकडून मदत केली जात असल्याची माहिती मिळत आहे. ललित पळून गेल्याची माहिती तीन तासांनी कंट्रोल रुमला प्राप्त झाली. पोलीस नाईक नाथा काळे, अमित जाधव यांच्याकडून ललित याला मदत असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Nov 2023 10:12 AM (IST)

    Live Update : वॉशिंग मशिनमध्ये आल्यावर संपत्ती मोकळी होईल – संजय राऊत

    वॉशिंग मशिनमध्ये आल्यावर संपत्ती मोकळी होईल.. जे भाजपसोबत जातात त्यांची मालमत्ता जप्त होत नाही. आम्हाला अटक केली तरी चालेल पण लढाई सुरुच राहणार… असं देखील संजय राऊत म्हणाले…

  • 22 Nov 2023 10:08 AM (IST)

    Live Update : 5 राज्यांमध्ये राहुल गांधी प्रियंका गंधी प्रचार करत आहेत – संजय राऊत

    5 राज्यांमध्ये राहुल गांधी प्रियंका गंधी प्रचार करत आहेत… असं वक्तव्य संजय राऊत करत आहेत. काँग्रेस विजयासाठी प्रचार करत आहेत. त्यांचा प्रचार जोरात सुरु असल्यामुळे नॅशनल हेराल्ड प्रकरण काढलं… असं देखील राऊत म्हणाले.

  • 22 Nov 2023 09:55 AM (IST)

    मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन, मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी

    मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन आला आहे. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. हा फोन कुणी केला, त्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

  • 22 Nov 2023 09:49 AM (IST)

    रस्त्यावर डंपरमधून डांबर टाकत असताना करताना विद्युत तारेला चिकटून अपघात, डंपरला आग लागून एक जखमी

    डंपर मधून रस्त्यावर डांबर टाकत असताना, वरून जाणाऱ्या विद्युत तारेला चिकटला. यामुळे डांबर वाहतूक करणाऱ्या डंपरला आग लागून एक जण गंभीर जखमी . पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे येथे रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना ही दुर्घटना घडली. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली, पण डंपर जळून खाक झाला.

  • 22 Nov 2023 09:42 AM (IST)

    दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक, अन्यथा खळ्ळखट्याकचा इशारा

    दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावा अन्यथा खळ्ळखट्याकचा इशारा मनसे नेत्यांतर्फे देण्यात आला आहे.

  • 22 Nov 2023 09:33 AM (IST)

    पाणीचोरीचा अजब प्रकार उघड, तलावात बोअर घेऊन विहिरीत पाणी उपसा

    धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असताना तलावातून पाणी चोरीचा अजब प्रकार उघड झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील कोरेवाडी तलावात आडवे बोअर घेऊन थेट विहिरीत पाणी उपसा केला जात आहे. पाणी चोरण्यासाठी शेतकऱ्याने नामी शक्कल लढविली आहे.

    तलावातील पाणी पिण्यासाठी संरक्षित असून तलावातून सिंचनासाठी पाणी उपसा करण्यावर जिल्हाधिकारी यांची बंदी आहे मात्र तरीही उपसा सुरूच आहे.

  • 22 Nov 2023 09:31 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील तब्बल 88 टक्के गावे दुष्काळाच्या सावटाखाली

    अमरावती जिल्ह्यातील तब्बल 88 टक्के गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत.90 पैकी 79 मंडळामध्ये जुन ते सप्टेंबर दरम्यान 75 मिमी पेक्षा कमी पाऊस झाला.

    सोयाबीनचे एकरी 5 क्विंटल उत्पादन तर कपाशी उत्पादनात 25 टक्के घट झाली आहे.  अमरावतीत 79 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शासनाच्या आठ सवलती लागू. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील पिकांना देखील फटका बसणार…

  • 22 Nov 2023 09:08 AM (IST)

    डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत महत्वाची बैठक

    डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती.

  • 22 Nov 2023 08:55 AM (IST)

    कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे अमरावती दौऱ्यावर

    अमरावती : कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे अमरावती दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणसाठी 13 यंत्रणांद्वारे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 24 लाख कागदपत्रांची तपासणी झाली आहे. अमरावतीत कुणबी-मराठा, मराठा कुणबी अशी नोंदच नाही. तर अमरावती जिल्ह्यात कुणबी क्षत्रिय मराठा आणि मराठा अशा स्वतंत्र नोंदी आहेत. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात याचा आढावा ते घेणार आहेत. मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी 24 नोव्हेंबरपर्यंत पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन आहे.

  • 22 Nov 2023 08:50 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांची आज इगतपुरी तालुक्यात जाहीर सभा

    मनोज जरांगे पाटील यांची आज इगतपुरी तालुक्यात जाहीर सभा घेणार आहेत. इगतपुरीतील शेणीत या ठिकाणी १०१ एकर जागेवर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला लाखो नागरिक येण्याची शक्यता पाहता पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. सिन्नर, इगतपुरी आणि नाशिकहून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तीन वाहनतळ उभे करण्यात आले आहेत.

  • 22 Nov 2023 08:40 AM (IST)

    नागपुरात मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात येणार

    नागपुरात मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वात मोठा जॉब मेळा आयोजित करण्यासाठी राज्याने 5 कोटी रुपयांच्या खर्चास यापूर्वीच मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने 9 ते 10 डिसेंबर दरम्यान नागपुरात राज्य पातळीवरील सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले आहे. 300 हून अधिक कंपन्या, उद्योग आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या सहभागासह किमान 21,000 तरुणांना नोकरीच्या ऑफर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

  • 22 Nov 2023 08:30 AM (IST)

    पुणे: खेड तालुक्यातील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकांच्या आजपासून

    पुणे : खेड तालुक्यातील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकांच्या आजपासून सुरू होणार आहेत. खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे उपकारभारी आजपासून ठरणार आहेत. तीन दिवस विविध ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार आहेत. निवडून किंवा बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच होणार असल्याने पदाची किंमत वाढली आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याची माहिती तहसिलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.

  • 22 Nov 2023 08:15 AM (IST)

    राज्यात आजपासून ढगाळ वातावरण

    राज्यात आजपासून ढगाळ वातावरण असणार आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मिथिली नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं. त्याचाच परिणाम केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर झालं आहे. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

  • 22 Nov 2023 08:02 AM (IST)

    मराठा कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

    मराठा कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख कागदपत्रे तपासली गेली आहेत. आतापर्यंत १ लाख ३१ हजार जणांच्या कुणबी नोंदी तपासल्या गेल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र संकेत स्थळावर अपलोड करायला सुरुवात झाली आहे.

  • 22 Nov 2023 07:57 AM (IST)

    Pune news | संजीव ठाकूर यांच्या पदमुक्तीची ऑर्डर रखडलायची चर्चा

    ससून रुग्णालयाचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्या पदमुक्तीची ऑर्डर रखडलायची चर्चा. वैद्यकीय शिक्षण विभागाने केलं पदमुक्त. मात्र अजून ही ऑर्डर मिळाली नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संजीव ठाकूर यांच्यावर प्रेम असल्याची चर्चा पुण्यात होत आहे. मॅटने संजीव ठाकूरांना दणका दिल्याने राज्य सरकारची कारवाई निष्फळ ठरली. मात्र आता पदमुक्त होवूनही ऑर्डर अजून मिळाली नसल्याची चर्चा आहे

  • 22 Nov 2023 07:43 AM (IST)

    Kartik Ekadashi | लाखो भाविक पंढरीत दाखल

    उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल. प्रदक्षिणामार्ग ,मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट भाविकांनी गेला फुलून. भाविकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज. पाच ते सहा लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज. उजनीतून सोडलेले पाणी अद्याप पंढरपुरात पोहोचले नाही भाविकांना साठलेल्या पाण्यातच कराव लागतय स्नान.. उद्या होणारी कार्तिकी यात्रेची विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार.

  • 22 Nov 2023 07:33 AM (IST)

    Cricket News | नागपूरला होणारा T20 सामन्या ‘या’ ठिकाणी हलवला

    नागपुरात 1 डिसेंबरला होणारा भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 सामना रायपूरला हलविण्यात आल्याने क्रिकेट चाहते निराश. नागपूरला विश्वचषकाचा एकही सामना न मिळाल्याने चाहते आधीच निराश होते. मात्र आता टी 20 सामना सुद्धा नागपुरातील जामठा स्टेडियमवर होणार नसल्याने पुन्हा एकदा नागपूरच्या क्रिकेट प्रेमीच्या हाती निराशा आली आहे.

  • 22 Nov 2023 07:31 AM (IST)

    Eknath Shinde | राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 23 नोव्हेंबरला सकाळी राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहेत. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत.

Published On - Nov 22,2023 7:29 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.