Maharashtra Marathi News Live : कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिशय संतापजनक, मानवतेला काळीमा फासणारा प्रकार

| Updated on: Sep 10, 2023 | 7:03 AM

Maharashtra Breaking news LIVE Updates | महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. दिल्लीत आजपासून जी -20 परिषद सुरू होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत वैश्विक मुद्द्यांवर चर्चा होणार असून या बैठकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Marathi News Live : कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिशय संतापजनक, मानवतेला काळीमा फासणारा प्रकार

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : जी-20 परिषदेला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत वैश्विक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जगभरातील नेते या बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळात बैठक झाली असून या बैठकीत ठोस तोडगा निघाला नसल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात आजही काही भागात पावसाची दमदार हजेरी. पावसाच्या कमबॅकमुळे बळीराजा सुखावला. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Sep 2023 09:29 PM (IST)

    कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिशय संतापजनक

    कल्याण | कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील स्काय वॉकवर गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. नागरिकांनी आणि पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. आमच्याकडे स्टाफ नाही, असे उत्तर देत महिलेकडे केले दुर्लक्ष केले. पोलिसांकडून विनंती करूनही दुर्लक्ष झाल्याने अखेर महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली.

  • 09 Sep 2023 09:05 PM (IST)

    नाशिकमध्ये शिंदे गटाकडून ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन

    नाशिक :  शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक शहरातील ठक्कर डोम या मैदानावर ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील विविध ढोल-ताशा पथकांनी यात सहभाग घेतलाय. शिवसेना चित्रपट सेनेचे नेते अभिनेता सुशांत शेलार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

  • 09 Sep 2023 08:54 PM (IST)

    PAK vs IND | पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन जाहीर, बाबर आझम कॅप्टन

    कोलंबो | टीम इंडिया विरुद्धच्या सुपर 4 सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची प्लेईंग ईलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. उभयसंघात 10 सप्टेंबरला हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. बाबर आझम टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे.

  • 09 Sep 2023 08:34 PM (IST)

    Shrikant Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा केवळ नाटक, श्रीकांत शिंदे यांची टीका

    मुंबई | खासदार श्रीकांत शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळ दौऱ्यावरुन निशाणा साधला आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर का गेले नाही, असा सवालही श्रीकांत शिंदे यांनी विचारला.

  • 09 Sep 2023 08:01 PM (IST)

    Beed News :151 किलोचा हार घालून पंकजा मुंडे यांचे स्वागत

    पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडच्या पाटोद्यात दाखल झाल्यानंतर 151 किलोचा हार घालून पंकजांचा स्वागत करण्यात आले. पाटोद्यात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी बघायला मिळाली. यावेळी खासदार प्रितम मुंडे देखील उपस्थित आहेत.

  • 09 Sep 2023 07:48 PM (IST)

    Satara News | छत्रपती दहिहंडी महोत्सवाला थोड्याच वेळात होणार सुरूवात

    उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती दहिहंडी महोत्सवाला थोड्याच वेळात होणार सुरुवात होणार आहे. साताऱ्याच्या तालिम संघ मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला अनेक जिल्ह्यातील गोविंदा पथकांची हजेरी बघायला मिळतंय. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार दहिहंडी स्पर्धा

  • 09 Sep 2023 07:42 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल संजय राऊत यांचे मोठे विधान

    जरांगे पाटील हा फाटका माणूस, फाटकी माणसे जेव्हा आंदोलनात उतरतात, तेव्हा त्यांच्या विचारापासून त्यांना दूर करणे कठीण असते. व्यक्तिशः त्यांना काही मिळवायचं नसते. ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा आहे. सरकारच्या वतीने त्यांचा आंदोलन फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळ्या समाजाची लोक त्यांच्या विरोधात उभे केली जात आहेत, पण हे आंदोलन संपणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 09 Sep 2023 07:33 PM (IST)

    उद्या जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार- संजय राऊत

    उद्या जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. जळगाव महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ठेवले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले होते ही वचनपूर्ती आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण ही ऐतिहासिक घटना असे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 09 Sep 2023 07:31 PM (IST)

    Beed News : तीस जेसीबीच्या सहाय्याने पंकजा मुंडे यांच्यावर फुलांची उधळण

    पाटोदा शहरात पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. तीस जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आली. संत भगवान बाबा जयंती महोत्सव कार्यक्रमाला पंकजा यांची उपस्थिती लावली आहे. कार्यक्रम स्थळी जाताना महिला आणि मुलींकडून फुलांचा वर्षाव करण्यात आलाय.

  • 09 Sep 2023 07:28 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची उद्या जळगावात सभा, संजय राऊत यांची माहिती

    मुंबई | संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    उद्या जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे

    जळगाव महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ठेवले आहे

    उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे ही त्यांची भूमिका आहे

    भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते

    पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ही वचनपूर्ती आहे

    छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण ही ऐतिहासिक घटना

    जे विरोध करतात हे उद्धव ठाकरेंना विरोध करत नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला त्यांच्या अस्तित्वाला विरोध करतातय

    हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

    राजकारण कुठे करायचे हे यांना समजलं पाहिजे

    तुम्ही या तुम्हाला कोणी अडवला आहे

    उद्या सभा होणारच

    या सभेसाठी कोणी का परवानगी ना कारावी

  • 09 Sep 2023 07:15 PM (IST)

    Satara News : सातारा शहरात दहीहंडीचा उत्साह

    संपूर्ण सातारा शहरात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतोय. दोन छत्रपतींच्या एकाच वेळी  शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलंय. दहीहंडीच्या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शन होणार आहे.

  • 09 Sep 2023 07:08 PM (IST)

    Solapur News | सोलापूरात रास्ता रोको आंदोलन

    शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी गावाजवळ हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारने सत्तेत येण्यापूर्वी मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप करण्यात आला.

  • 09 Sep 2023 06:56 PM (IST)

    Asia Cup 2023: बांगलादेशसमोर 258 धावांचे लक्ष्य

    आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने नऊ गडी गमावून 257 धावा केल्या. श्रीलंकेसाठी सदिरा समरविक्रमाने 72 चेंडूत 93 धावा केल्या. तर बांगलादेशकडून हसन महमूद आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

  • 09 Sep 2023 06:45 PM (IST)

    पिडीलाइटवर 2.64 लाख रुपयांचा दंड

    जीएसटी विभागाने पिडीलाइट इंडस्ट्रीजला 2.64 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अॅडसिव्ह, वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्स आणि बांधकाम रसायने तयार करणाऱ्या कंपनीने शनिवारी सांगितले की, अपील स्तरावर आपल्या बाजूने निर्णयाची अपेक्षा आहे.

  • 09 Sep 2023 06:41 PM (IST)

    पंकजा मुंडे यांची बीडच्या पटोदामध्ये स्वागत

    आमदार सुरेश धस यांनी केलं पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं . पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरु आहे. यावेळी त्यांना 151 किलोंचा हार घालण्यात आला. तसेच फुलांची उधळण करण्यात आली.  यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 09 Sep 2023 06:35 PM (IST)

    इंडिया मिडल ईस्ट युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर लवकरच सुरू होणार

    भारत मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर लवकरच सुरू होणार आहे. भारत, यूएई, सौदी अरेबिया, EU, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि यूएस यांचा समावेश असलेल्या कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरील सहकार्यासाठी हा एक उपक्रम असेल: सूत्र

  • 09 Sep 2023 06:20 PM (IST)

    चंद्रयान-2 च्या रडारने घेतले चंद्रयान-3 च्या लँडरचे छायाचित्र

    द्रयान-2 च्या रडारने चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरची छायाचित्रे क्लिक केली आहेत. इस्रोने 6 सप्टेंबरची छायाचित्रे शेअर केली आणि सांगितले की चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरमध्ये स्थापित ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडारने विक्रम लँडरची छायाचित्रे घेतली आहेत.

  • 09 Sep 2023 06:07 PM (IST)

    त्रिपुरामध्ये भूकंपाचे धक्के

    त्रिपुरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीचे म्हणण्यानुसार, धर्मनगरच्या उत्तर-पूर्वेला 72 किमी अंतरावर 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

  • 09 Sep 2023 04:58 PM (IST)

    OBC Agitation News : ओबीसीचं उद्यापासून आंदोलन

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध सुरु केला आहे. ओबीसीचं उद्यापासून राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये काल झालेल्या बैठकीत पण ओबीसी नेत्यांनी विरोधाचा सूर आळवला होता.

  • 09 Sep 2023 04:40 PM (IST)

    Maratha Reservation News : मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये – प्रकाश शेंडगे

    आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण त्यांना मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. संवैधानिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी असे ते म्हणाले.

  • 09 Sep 2023 04:13 PM (IST)

    NCP News : काही व्यक्ती वैयक्तिक कारणासाठी पक्षाबाहेर

    राष्ट्रवादी पक्षात कुठलीही फुट नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. याप्रकरणात निवडणूक आयोगाकडे त्यांनी म्हणणे मांडले आहे. काही व्यक्ती वैयक्तिक कारणासाठी पक्षाबाहेर गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

  • 09 Sep 2023 04:05 PM (IST)

    Maratha Reservation News : मनधरणी करण्यात तिसऱ्यांदा अपयश

    मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने जीआर काढला असला तरी त्यात दुरुस्ती करण्याची मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच ठेवण्यावर ते ठाम आहेत. उद्यापासून औषध आणि पाणी पिणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

  • 09 Sep 2023 02:27 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुच राहणार – मनोज जरांगे

    र्जून खोतकर यांनी राज्य सरकारचा निरोप घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मात्र, या खोतकर यांनी सरकारकडून आणलेल्या जीआरमध्ये दाखले कधीपासून मिळणार याचा उल्लेख केला नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. जरांगे उपोषण मागे घेतात का याकडे लक्ष लागले होते. परंतू सरकारच्या जीआरने त्यांचे समाधान झाले नसल्याने आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 09 Sep 2023 01:01 PM (IST)

    G 20 Summit : जी 20 परिषदेसाठी दिल्लीला छावणाचे स्वरूप

    दिल्लीमध्ये जी 20 परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी मोठी सुरक्षायंत्रणा कामाला लागली आहे. तब्बल 50 हजार कमांडो सुरक्षेसाठी तैनात तरण्यात करण्यात आलेले आहेत. याशिवाय 40 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

  • 09 Sep 2023 12:50 PM (IST)

    Maratha Reservation : सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षण का टिकले नाही याचा अभ्यास सुरू- अजित पवार

    मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भुमिका मांडली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे अजित पवार म्हणाले. दोन वेगवेगळ्या सरकारने आरक्षण दिले मात्र एक हाय कोर्टात टिकू शकतृले नाही तर दुसरे सुप्रिम कोर्टात टिकू शकले नाही. हे आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही याचा अभ्यास केला जातोय असे अजित पवार म्हणाले.

  • 09 Sep 2023 12:37 PM (IST)

    Maratha Reservation : जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाबरोबर सकारात्मक चर्चा- मुख्यमंत्री शिंदे

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाने सरकारसोबत चर्चा केली. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेली चर्चा सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बैठकीतून तोडगा निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

  • 09 Sep 2023 12:29 PM (IST)

    Mumbai News : मुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव ओव्हरफ्लो

    मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. मोडक सागर, तानसा, विहार आणि तुलसी तलावात शंभर टक्के पाणीसाठा भरला आहे. अप्पर वैतरणा 87 टक्के. मध्य वैतरणा 97 टक्के भातसा तलाव 97 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

  • 09 Sep 2023 12:14 PM (IST)

    Jarange Patil : सरकारसोबतच्या बैठकीनंतर शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला

    मनोज जरांगे पाटील हे गेल्या बारा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ते शिष्टमंडळ पून्हा उपोषण स्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून सरकारसोबत झालेल्या बैठकीची माहिती जरांगे पाटील यांना देण्यात येत आहे.

  • 09 Sep 2023 11:44 AM (IST)

    LIVE UPDATE | जळगावातील हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले

    जळगावातील हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले आहेत. धरणातून ७५ हजार ८९२ क्सुसेक पाण्याचा विसर्ग… हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे.

  • 09 Sep 2023 11:31 AM (IST)

    LIVE UPDATE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. राजेंद्रसिंह गुढा शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजेंद्रसिंह गुढा काँग्रसमधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

  • 09 Sep 2023 11:17 AM (IST)

    LIVE UPDATE | बार्शीत पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत

    बार्शीत पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. जेसीबीच्या सहायाने पंकाजा मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली आहे. शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा आज सहावा दिवस आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत केलं.

  • 09 Sep 2023 11:03 AM (IST)

    Entertainment Update दुसऱ्या दिवशी ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक करण्यास ‘जवान’ फेल, कामावले इतके कोटी

    शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी देशात ७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर जगभरात सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. किंग खानच्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ दिसून येत आहे. वाचा सविस्तर

  • 09 Sep 2023 10:56 AM (IST)

    जगात अविश्वासाचं संकट सगळे मिळून दूर करू- नरेंद्र मोदी

    समिट हॉलमध्ये आज सकाळी 10 पासून दुपारी 1 पर्यंत पहिलं चर्चा सत्र चालणार आहे. नरेंद्र मोदी यांनी संबोधन करताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा नारा दिला आहे. जगात अविश्वासाचं संकट सगळे मिळून दूर करू, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 09 Sep 2023 10:45 AM (IST)

    G-20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जय्यत तयारी

    G-20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जय्यत तयारी केली गेली आहे. परिषदेमधून वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचरचा मंत्री दिला गेलाय.

  • 09 Sep 2023 10:25 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाकडून बंदची हाक

    मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकार जाती-पातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय.

  • 09 Sep 2023 10:17 AM (IST)

    जळगाव भुसावळमधील हतनुर धरणाचे उघडले

    जळगावमधील हतनुर धरणाचे 18 दरवाजे दीड मीटरने उघडले. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाचे18 दरवाजे हे दीड मीटरने उघडले असून 75 हजार 892 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे.

  • 09 Sep 2023 09:58 AM (IST)

    Rain : नाशिकच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

    नाशिकच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे गिरणा नदी पात्रात ५० हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसामुळे मालेगावसह जळगाव जिल्हयाचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

  • 09 Sep 2023 09:45 AM (IST)

    Rain : नाशिकमध्ये यंदा पहिल्यांदा गोदावरीला पूर

    नाशिकमधील गोदावरी नदीला प्रथमच पूर आला आहे. गोदावरी नदीला हंगामातील पहिला पूर आला आहे. जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून 9000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिकमध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज आहे.

  • 09 Sep 2023 09:32 AM (IST)

    Rain : नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्ग

    नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 24 हजार 579 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जात आहे. हे पाणी औरंगाबादमधील जायकवाडी प्रकल्पाच्या दिशेने जात आहे.

  • 09 Sep 2023 09:19 AM (IST)

    Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मंडपात दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० परिषदेच्या भारत मंडपात दाखल झाले आहे. आता ९.३० वाजता बैठक सुरु होणार आहे. परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सूनक आले आहे.

  • 09 Sep 2023 09:09 AM (IST)

    Pankaja Munde : पंकजा मुंडे आज धारशिवमध्ये

    पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा आज सहावा दिवस आहे. आज धाराशिव येथून यात्रा सुरू होणार आहे. परांडा येथे कमळादेवी मातेचे दर्शन पंकजा मुंडे घेणार आहेत. त्यानंतर करमाळा, जामखेड, खर्डा मार्गे पाटोद्याला जाणार आहे.

  • 09 Sep 2023 08:58 AM (IST)

    Accident new : नाशिक-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात

    नाशिक-मुंबई महामार्गावर लतिफवाडी जवळ विचित्र भीषण अपघात. पहाटेच्या वेळी अपघात झाला. उभ्या आयशरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडक देऊन ट्रक पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकला अज्ञात वाहनाची जोरदार धडक. धडक देऊन वाहनचालक फरार. या विचित्र अपघातात ट्रक ड्रायव्हर ठार.

  • 09 Sep 2023 08:42 AM (IST)

    Maratha Reservation : आज पिंपरी-चिंचवड बंद

    जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. त्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विविध मराठा संघटनांकडून पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात आलाय. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, या मागणीसाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदसाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 09 Sep 2023 08:19 AM (IST)

    G20 Summit : युक्रेनचा मुद्दा सोडून सर्व मुद्द्यांवर G 20 मधील राष्ट्रांचे एकमत

    आजपासून राजधानी दिल्लीमध्ये G20 परिषदेला सुरुवात होणार आहे. विविध देशांचे नेते या परिषदेसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. काही वेळातच G20 परिषदेला सुरुवात होणार आहे. युक्रेनचा मुद्दा सोडून सर्व मुद्द्यांवर जी 20 मधील राष्ट्रांचे एकमत झाल्याची माहिती. सर्व राष्ट्राध्यक्षांकडून G20 परिषदेबाबतचा फायनल रिपोर्ट सादर.

  • 09 Sep 2023 08:17 AM (IST)

    Maratha Reservation : मनोज जरांगे यांना शासन पाठवणार अहवाल

    मनोज जरांगे यांना राज्य शासनाकडून अहवाल पाठवला जाणार. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल याचा ड्राफ्ट पाठवला जाणार आहे. कालच्या सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीतचं ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांचं मत विचारात घेतलं जाणार. नियुक्त केलेल्या समितीला एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. अहवालात या गोष्टी मांडल्या जाणार.

  • 09 Sep 2023 08:02 AM (IST)

    ajit pawar : अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज जिल्हा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला अजितदादा हजेरी लावणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवार एकत्र व्यासपीठावर उपस्थित राहतील.

    अजित पवार आज पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. अजितदादा उद्या पुण्यातून कोल्हापूरच्या सभेला जाणार आहेत. उद्या पुण्यात अजित पवारांच मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे.

  • 09 Sep 2023 07:49 AM (IST)

    rain : राज्यात पावसाचं दमदार आगमन, दोन दिवस यलो अलर्ट

    पुढील दोन दिवस राज्यात पावसचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. 14 सप्टेंबरनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन दिवस चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. 17 सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

  • 09 Sep 2023 07:31 AM (IST)

    manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार?

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. आज जरांगे पाटील उपोषण सोडण्याची शक्यता आहे. माजी आमदार अर्जुन खोतकर आज सकाळी 11 वाजता जरांगे पाटील यांना भेटणार असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला लिफाफा देणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 09 Sep 2023 07:12 AM (IST)

    G20 Summit : जी-20 परिषदेला आजपासून सुरुवात; नवी दिल्लीत कुटनीतीचा महामेळा

    नवी दिल्लीत आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला देशभरातील नेते उपस्थित आहेत. या बैठकीत वैश्विक मुद्द्यांवर चर्चा होणार असू नत्याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Published On - Sep 09,2023 7:08 AM

Follow us
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.