Maharashtra Breaking News in Marathi : काँग्रेसची पहिली यादी संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार

| Updated on: Mar 09, 2024 | 7:07 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 8 मार्च 2024 देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : काँग्रेसची पहिली यादी संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार

मुंबई | 08 मार्च 2024 : आज देशासह राज्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. सर्वच शिव मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठीची जागावाटपाची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून येत्या एक-दोन दिवसात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. कुठला पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार या बद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर-सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Mar 2024 07:55 PM (IST)

    बाळासाहेबांच्या या तानाजीने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला- संजय राऊत

    एक तानाजी शिवाजी महाराजांचा तानाजी होता, पण बाळासाहेबांच्या या तानाजीने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असं  उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

  • 08 Mar 2024 07:45 PM (IST)

    फॉर्म भरणे माझा निर्णय नाही हा समाजाचा निर्णय- मनोज जरांगे पाटील

    फॉर्म भरणे माझा निर्णय नाही हा समाजाचा निर्णय आहे. माझे नियोजन आहे ओबीसी मधून आरक्षण, आता फोन आला आणि केला तर फक्त आरक्षणावरच बोला. सरकारने खोटे गुन्हे दाखल केले तर आता अंतरवाली सारखे चार ते पाच मराठे एकत्र आले पाहिजेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

  • 08 Mar 2024 07:30 PM (IST)

    साडेतीनशे वर्षानंतरही गद्दारीचा शिक्का अजून पुसलेला नाही- ओमराजे निंबाळकर

    कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी घरात बसून काम केले पण यांना बाहेर फिरून देखील ते जमत नाही. आजही सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, अनाजी पंत यांची नाव घेतले तर गद्दार या कॅटेगिरीत जातात. मात्र तानाजी मालुसरे आदीची नावे निष्ठावंत या गटात येतात. साडेतीनशे वर्षानंतरही गद्दारीचा शिक्का अजून पुसलेला नाही. त्यामुळे गद्दार होण्यापेक्षा खुद्दार झालेले बरे, असं उबाठा गटाचे खासदार  ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

  • 08 Mar 2024 07:05 PM (IST)

    रशिया युक्रेन युद्धक्षेत्रात पाठविणाऱ्या मल्टी-स्टेट नेटवर्कचा पर्दाफाश

    परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने भारतीय तरुणांना रशिया युक्रेन युद्धक्षेत्रात पाठविणाऱ्या मल्टी-स्टेट नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या नेटवर्कचे धागेदोर वसईत पोहचले असून याचा मुख्य सूत्रधार फैजल उर्फ बाबा हा वसईतील असून तो सध्या दुबईत राहत आहे.

  • 08 Mar 2024 06:39 PM (IST)

    भाजपनंतर आता काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार, राजकीय वर्तुळाचं लक्ष

    नवी दिल्ली | राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. भाजपनंतर आता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करणार आहे. काँग्रेस थोड्याच वेळात आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेतून उमेदवारी जाहीर करणार आहे. आता काँग्रेसच्या या पहिल्या यादीकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

  • 08 Mar 2024 06:12 PM (IST)

    रविवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक

    बुलडाणा | रविवारी 10 मार्च रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

  • 08 Mar 2024 05:52 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीवारी, जागावाटपावर चर्चा करणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहे. जागा वाटपासाठी ही चर्चा होणार आहे.

  • 08 Mar 2024 05:37 PM (IST)

    25 मार्चनंतर पंतप्रधान मोदी देशभरात 150 हून अधिक निवडणूक सभा घेणार

    लोकसभा निवडणुकीच्या पद्धती अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी सर्वच पक्षांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीची कमान पीएम मोदींच्या हाती असेल. 25 मार्चनंतर पंतप्रधान मोदी देशभरात जोरदार प्रचार करतील. पंतप्रधान मोदी देशभरात सुमारे 150 निवडणूक सभा आणि रोड शो करणार आहेत, तर दक्षिण भारतात पीएम मोदी 35 ते 40 निवडणूक सभा घेणार आहेत. पीएम मोदी यूपीमध्ये 15 हून अधिक रॅली आणि रोड शो करणार आहेत.

  • 08 Mar 2024 05:25 PM (IST)

    पाकिस्तानकडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न, बीएसएफच्या गोळीबारात एक ठार

    राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत असताना एका घुसखोराला बीएसएफ जवानांनी ठार केले आहे. हे प्रकरण केसरीसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

  • 08 Mar 2024 05:10 PM (IST)

    शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई

    रोहित पवारांच्या बारामती अग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.  50 कोटींचा कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.

  • 08 Mar 2024 01:43 PM (IST)

     खोक्यावर लाथ मारून खुद्दारीचा निर्णय आम्ही घेतला – ओमराजे निंबाळकर

    खोक्यावर लाथ मारुन आम्ही खुद्दारीचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. भाई और बहनों असे म्हणत ओम राजे यांनी केली मोदींचा आवाजात सोयाबीनचा भाव कितना असाही केला सवाल केला.

  • 08 Mar 2024 01:16 PM (IST)

    धाराशीव : उद्धव ठाकरे माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या भेटीला

    उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. नरहिरे या दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिल्या आहेत.

  • 08 Mar 2024 12:57 PM (IST)

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल

    सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता?आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे.

  • 08 Mar 2024 12:29 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांना दाखवले काळे झेंडे

    मराठा आरक्षण आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांना दाखविले ढोकी येथे काळे झेंडे, ओबीसीमधुन आरक्षण देण्याची मागणी. सर्वपक्षीय नेत्यांनी गावात येऊ नये, जरांगे यांना पाठिंबा, ढोकी गावातून 10 उमेदवार लोकसभेला उभे राहणार

  • 08 Mar 2024 12:19 PM (IST)

    मलकापूर जवळ भीषण अपघात ..

    अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. ट्रक आणि आयशर गाडीचा झाला अपघात. मलकापूर जवळील तलासवाडा फाट्याजवळील घटना

  • 08 Mar 2024 12:01 PM (IST)

    शरद पवार यांच्याकडून राज्यातील उद्योजकांच आणि कामगारांच कौतुक

    आपल्या राज्यात देशभरातले उद्योजक उद्योग काढतात. कारण इथली औद्योगिक शांतता. देशातील कुठल्याही राज्यातील कामगारांपेक्षा आपल्या राज्यातील कामगारांची उत्पादक क्षमता जास्त आहे.

  • 08 Mar 2024 11:57 AM (IST)

    चंद्रपूर : चंद्रपूर गुन्हे शाखेने जप्त केली 24 लाखांची रोख रक्कम

    चंद्रपूर : चंद्रपूर गुन्हे शाखेने जप्त केली 24 लाख 75 हजारांची रोख रक्कम.  बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर एका व्यक्तीच्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली. रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. बल्लारपूर येथून नागपूरला ही रक्कम नेली जात होती. रात्री अंदाजे 10 च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

  • 08 Mar 2024 11:36 AM (IST)

    गोखले पुलाच्या पुनर्बांधणीची चौकशी करा, आदित्य ठाकरेंचं गोखले पुलासंदर्भात राज्यपालांना पत्र

    आदित्य ठाकरेंनी गोखले पुलासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहीलं आहे. गोखले पुलाची पुनर्बांधणी देशाला लाजवणारी गोष्ट आहे, असं या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे.

    तसेच पालिका आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करा. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.

  • 08 Mar 2024 11:19 AM (IST)

    धाराशिवमध्ये मराठा आंदोलक उद्धव ठाकरेंच्या भेटीला

    धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंकडे निवेदन दिले.

  • 08 Mar 2024 11:07 AM (IST)

    पुण्यातील जीएसटी कार्यालयातील महिला अधिकारी लाच घेताना ताब्यात

    पुण्यातील जीएसटी कार्यालयातील महिला अधिकारी लाच घेताना ताब्यात.  जीएसटी महिला अधिकाऱ्यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. मालती रमेश कठाळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

  • 08 Mar 2024 10:53 AM (IST)

    पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट

    पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर मदत करण्यासाठी एका तरुणीचा या रॅकेटमध्ये सहभाग होता. संदिप धुने याच्या प्रेयसीसह आणखी एक तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी होती. मास्टरमाईंड संदिप धुने याची प्रेयसी सोनम पंडित आणि एका मैत्रिणीच्या मदतीने आर्थिक व्यवहार केले जात होते. धुने याच्याकडे असलेले पैसे या दोघी हवालामार्फत पाठवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

    पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करत ३.५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १८०० किलो एमडी जप्त केले आहे. एमडी तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालामार्फत झाल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.

  • 08 Mar 2024 10:31 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस

    लोकसभा निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यात शिवसेना-शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. जिल्हाप्रमुख विरुद्ध पदाधिकारी असे दोन गट निर्माण झाल्याने अंतर्गत वादामुळे शिवसेना शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केल्याची शिंदे गटाच्या सूत्रांची माहिती आहे. जिल्हाप्रमुख निलेश पाटील पक्षात अस्वस्थ असल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 08 Mar 2024 10:20 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचं घेतलं दर्शन

    सुनेत्रा पवार यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी सुनेत्रा पवारांनी भक्तिभावाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन अभिषेक केला. सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

  • 08 Mar 2024 10:20 AM (IST)

    बाबुलनाथ मंदिराबाहेर भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी

    मुंबई सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईच्या अतीप्राचीन अशा बाबुलनाथ मंदिराबाहेर भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली आहे. पोलिसांपुढे गर्दीला आवरण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. दर्शनाची रांग जवळपास दीड किलोमीटर लांब पोहोचली आहे. दर्शनासाठी तीन ते चार तास लागत आहेत. ट्रॅफिकची समस्या होऊ नये यासाठी ट्रॅफिक विभाग कार्यरत झाले तर कुठली अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस संपूर्ण रस्त्यावर तैनात आहेत.

  • 08 Mar 2024 10:10 AM (IST)

    मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम एप्रिलपासून

    मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून रुग्णालयातच सर्व औषधे मोफत देण्याची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • 08 Mar 2024 10:00 AM (IST)

    राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल झाले आहेत. काळाराम मंदिरात अमित ठाकरे यांच्या कडून सपत्नीक अभिषेक करण्यात आला.वंशपरंपरागत पुजारी परिवाराकडून ठाकरे कुटुंबियांनी महापूजा केली.

  • 08 Mar 2024 09:42 AM (IST)

    कोस्टल रोडचे उद्धघाटन

    बीएमसीच्या वतीने तयार होत असलेल्या कोस्टल रोडचं पुढच्या आठवड्यात ऊद्घाटन होणार असल्याची माहिती. सोमवारी ऊद्घाटन करण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबईला थेट दहीसर आणि भाईंदरशी जोडलं जाणार आहे. हा रस्ता सध्या टोलफ्री असेल. हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे.

  • 08 Mar 2024 09:25 AM (IST)

    चिपळूण शहरानजीक गावांना पाण्याची समस्या

    चिपळूण शहरानजीक गावांना गढूल पाण्याची समस्या भेडसावत आहे. गढूळ आणि समुद्राचे पाणी मिक्स झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

  • 08 Mar 2024 09:20 AM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून गिफ्ट; स्वस्त झाली गॅस सिलेंडरची किंमत

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी खेळली. गेल्या काही वर्षांपासून गॅसच्या किंमती दुप्पटीहून अधिक झाल्या. किचन बजेट वाढल्याने नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याची खेळी खेळण्यात आली आहे.

  • 08 Mar 2024 09:10 AM (IST)

    उदय सामंत यांची जहरी टीका

    उद्धव ठाकरे यांचे नाव न घेताल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीकास्त्र डागले.परवा जामनगरमध्ये एक लग्न होतं. काही लोकं जामनगरला दोन वाजता लॅण्ड झाली. ते विमान अदानीचे होते, अंबानीचे नव्हते.अदानीचे विमान फिरायला चालतं, अदानीचे विमान जामगरला जायला चालते. पण प्रकल्प अदानींनी करू नये अशा प्रकारची वाईट प्रवृत्ती राजकीय प्रवृत्ती वाढतेय.या प्रवृत्तीमुळे आपणा सर्वांचा तोटा होत असल्याचे ते म्हणाले.

  • 08 Mar 2024 09:02 AM (IST)

    सोने वधारले, चांदी पण महागली

    सोन्याने मार्च महिन्यातील सात दिवसांत 2,720 रुपयांची उडी घेतली. तर या तीन दिवसांत 1,470 रुपयांची चढाई केली. सोन्याची सातत्याने घौडदौड सुरु आहे. तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. चांदी पण महागली आहे. ऐन लग्नसराईत वाढलेल्या दराने वधू-वराकडील मंडळींच्या जीवाला घोर लावला आहे.

  • 08 Mar 2024 08:50 AM (IST)

    Live Update | अमरावतीत विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा दुसरा दिवस…

    अमरावतीत विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा दुसरा दिवस… 50 पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी बसले आमरण उपोषनाला… प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला; तसेच सरकरी नोकरी देण्याची मागणी…यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढला होता लॉंग मार्च… याच शेतकऱ्यांनी अडवला होता अजित पवार यांचा ताफा…

  • 08 Mar 2024 08:40 AM (IST)

    Live Update | महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी

    महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी… सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग… दर्शन रांगेची भाविकांना व्यवस्था करण्यात आली आहे… मोठी रांग भक्तांची दर्शनासाठी लागली आहे

  • 08 Mar 2024 08:30 AM (IST)

    Live Update | महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या सख्या भावांना अटक

    पिंपरी चिंचवड | महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोघा सख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत… अक्षय राजू शेरावत, अजय राजू शेरावत अशी चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत… सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपास करत ह्या दोघांना अटक करण्यात आलीय.

  • 08 Mar 2024 08:21 AM (IST)

    Live Update | गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्याकडे तगडे उमेदवार – विजय वडेट्टीवार

    गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्याकडे तगडे उमेदवार… गडकरी यांना प्रत्येकवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला… असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

  • 08 Mar 2024 08:05 AM (IST)

    Live Update | पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त

    पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त… १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार उद्घाटन… सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाणला होणार सुरुवात

  • 08 Mar 2024 07:52 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी

    महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी. सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग. दर्शन रांगेची भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मोठी रांग भक्तांची दर्शनासाठी लागली आहे.

  • 08 Mar 2024 07:51 AM (IST)

    Maharashtra News : इगतपुरी येथील एकमेव स्फटिक शिवलिंग असलेल्या मंदिरात गर्दी

    महाराष्ट्रातील एकमेव स्फटिक असलेल्या शिवमंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी. संपूर्ण भारतात काही मोजकेच स्फटिक शिवलिंग आहेत त्यातील हे एक. राज राजेश्वरी धाम असे इगतपुरी येथील बोरटेंभे येथे असलेल्या मंदिराचे नाव. पहाटे शिवपिंडीला सजवून करण्यात आली आरती. सजावटी नंतर विलोभनीय वाटतेय स्फटिक शिवलिंग. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात शिवभक्त.

  • 08 Mar 2024 07:48 AM (IST)

    Maharashtra News : कल्याण मधील टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना

    कल्याण मधील टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना. पत्नी वेळ देण्याचा तगादा लावत असल्याचा राग आल्याने संतप्त पतीने पत्नीची केली हत्या करत केला आत्महत्येचा बनाव. कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी तपास केला. अवघ्या 2 तासात हत्या करणाऱ्या पतीचा पर्दाफाश करत ठोकल्या बेड्या.

  • 08 Mar 2024 07:47 AM (IST)

    Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर-सांगली जिल्हा दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर-सांगली जिल्हा दौऱ्यावर. पहाटे विविध कामाचे लोकार्पण व भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करणार तर दुपारी १२.०० वाजत कोल्हापूर माणगांववात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त स्मारकाचे करणार लोकार्पण. सायंकाळी सांगलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात राहणार उपस्थित.

  • 08 Mar 2024 07:46 AM (IST)

    Maharashtra News : पुण्याच्या ग्रामीण भागात परमिट रम, बियर बार किती वाजेपर्यंत सुरु राहणार?

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परमिट रम, बियर बार रात्री साडेबारा पर्यंतच सुरु राहणार. जिल्हा प्रशासनाने काढले आदेश. पुणे शहरात मात्र दीड वाजेपर्यंत परवानगी. नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश अथवा कठोर कारवाई होणार. रात्रीच्या वेळी कलम 144 लागू केलं आहे. जमाव करता येणार नाही. बारमध्ये सीसीटीव्ही बसवावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने दिल्या सक्त सूचना.

Published On - Mar 08,2024 7:44 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.