Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार? ठाकरे सरकार कोणती विधेयके सादर करणार? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) 3 मार्चपासून सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे.

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार? ठाकरे सरकार कोणती विधेयके सादर करणार? वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:48 PM

मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) 3 मार्चपासून सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात छोट्या कालावधीची अधिवेशन पार पडली होती. यावेळी जवळपास महिनाभर अधिवेशन चालणार आहे. त्यामुळं या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्यावतीनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला जाईल. तर, विरोधी पक्ष भाजप (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. याशिवाय एसटी कर्मचारी संप, शेतकरऱ्यांचे प्रश्न, विद्यापीठ कायद्यातील सुधारणा यासह इतर मुद्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होतील. तर, राज्य सरकारच्या वतीनं या अधिवेशनात कोणती विधेयके कधी मांडली जाणार यांसदर्भातील माहिती. सन 2022 च्या राज्य विधिनमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित विधेयके व अध्यादेश यासह प्रलंबित विधेयके मांडली जातील. प्रलंबित विधेयक 1, प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 4 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता अपेक्षित) 3 ही विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजाचं थेट प्रक्षेपण टीव्ही 9 मराठीवर पाहायला मिळेल. विधिमंडळातील घडामोडी आमच्या वेबसाईटवर देखील वाचायला मिळतील.

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

  1. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 52 – महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विचारार्थ दि. 15.12.2020, 23.12.2021).

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश

  1. सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 1.- मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे ) झाडा सरक्षण व जतन (सुधारणा) अध्यादेश, 2022 (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 46.45 चौ.मीटर (500 चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत.)
  2. सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 2 .- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, 2022 (मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत)

प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त)

  1. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 1: उद्योग ऊर्जा व कामगार विभाग – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022. (महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये कलम ३६ नंतर कलम ३६ (अ) समाविष्ट करण्याचे व सदरहू सुधारणा १० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना लागू करण्यासाठी कलम-(१) मध्ये त्याबाबतची तरतूद करण्याचे तसेच सदर अधिनियमातील कलम 17 (छ) मधील आधार कार्ड क्रमांकाबाबतची तरतुद वगळण्याचे प्रस्तावित आहे).
  2. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 2: नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे ) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2022 (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 46.45 चौ.मीटर (500 चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत.) (सन 2022 चा महा. अध्या. क्र .1 चे रुपांतरीत विधेयक)
  3. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 3 – नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2022 (मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत) (सन 2022 चा महा. अध्या. क्र. 2 चे रुपांतरीत विधेयक)
  4. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 4 – उच्च व तंत्रशिक्षण विभाग – निकमार विद्यापीठ पुणे विधेयक 2022 प्रस्तावित विधेयके /अध्या
  5. देश (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित) सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. – महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था (कामकाजाची भाषा) विधेयक, 2022 (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची भाषा मराठी असण्याबाबत).
  6. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. – महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2022.
  7. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. – महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022.

इतर बातम्या:

‘पंतप्रधान मोदींना यूक्रेनमधील विद्यार्थ्याचं काही पडलेलं नाही’, शरद पवारांचं टीकास्त्र, महाराष्ट्र भाजपवरही घणाघात

Russia Ukraine War : रशियाविरोधात जग एकवटले, निंदा प्रस्तावावर 141 देशांच्या सह्या, तर पाठिंबा फक्त…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.