Maharashtra budget session 2021 LIVE | औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

| Updated on: Mar 24, 2021 | 6:58 AM

शेतकरी, वाढीव वीज बिल, यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session Day 3)

Maharashtra budget session 2021 LIVE | औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई :  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session day 3 live updates) तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. मुनगंटीवारांचं भाषण पाहताना नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला. राज्यपालांनी मराठीमध्ये भाषण केलं हे मोठी गोष्ट  आहे.

तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना मदत आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याविषयी विधानसभा अध्यक्षांनी निर्देश घेण्याचे आवाहन केले. त्यावर अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सरकार काळजी घेईल, असं म्हटलं. त्यावर सरकार काळजीवाहूचं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2021 04:54 PM (IST)

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही: देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही,  असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केलाय. देशाच्या शूर सैनिकांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शाह यांच्या जे बोलले ते उसणं आवसान आणून, खोट बोल पण रेटून बोल, असं मुख्यमंत्र्यांच रुप पाहायला मिळालं.

    शरजील उस्मानीच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते भाजपला हिंदुत्व शिकवत आहेत. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे चौकातलं भाषण होतं. कोरोना संदर्भातील विरोधकांच्या मुद्याला ते उत्तर ते देऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं महाराष्ट्राची निराशा केली.

  • 03 Mar 2021 04:41 PM (IST)

    महाराष्ट्रानं ही लढाई समर्थपणानं लढली, त्याचा तरी अभिमान ठेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    राज्य सरकार जिथं कमी पडत असेल तिथं सूचना द्या. महाराष्ट्रानं ही लढाई समर्थपणानं लढली, त्याचा तरी अभिमान ठेवायला हवा होता.

    आरोप प्रत्यारोप बाजूला ठेऊन महाराष्ट्राला समृद्ध करु, संत तुकारामांच्या ओळींनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समारोप

  • 03 Mar 2021 04:28 PM (IST)

    शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार : उद्धव ठाकरे

    -कृषी वीज धोरण जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार आहोत.

    -शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना होती. उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टविषयी कॅगची आकडेवारी विधानसभेत जाहीर

    -कांजूरच्या जागेविषयी कुणीही प्रतिष्ठेचा विषय करु नका.  आरेची जागा अपुरी पडणार आहे. कांजूरमार्गमध्ये सर्व मेट्रो प्रकल्पाचं एकत्रित कारशेड करता येईल. पर्यायी जागा गोरेगावची पाहणी संयुक्तपणे करु. मेट्रोचा विषय दोन्ही सरकारकचा एकत्रित असेल तर सोबत येऊन कामं केलं पाहिजे.  या विषयात राजकारण करु नका.

  • 03 Mar 2021 04:24 PM (IST)

    बंद खोलीत ठरलेली गोष्ट बाहेर येऊन नाकारता, उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र

    बंद खोलीत ठरलेली गोष्ट बाहेर येऊन नाकारता. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. 2014 साली तुम्ही आम्हाला फसवलं होतं.

  • 03 Mar 2021 04:21 PM (IST)

    विदर्भाला महाराष्ट्रापासून तोडू नका, महाराष्ट्राचा एकत्रित विकास करणार

    विदर्भ हे माझं आजोळ आहे. त्याला माझ्यापासून तोडू नका. विदर्भाला महाराष्ट्रापासून तोडू नका. बाळासाहेबांना विसरला नसाल तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. बाळासाहेबांचं हिंदुत्व शेंडी जाणव्यांचं नव्हतं.राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी केली पण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला.  बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कृषी व्यवसाय योजना आणली आहे.

  • 03 Mar 2021 04:18 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल ही योजना

    शेतकरी गेल्या सहा वर्षांपासून उत्पन्न दुप्पट होण्याची वाट पाहतोय. शेतकऱ्यांसाठी आम्ही विकेल ती पिकेल योजना आणली.

  • 03 Mar 2021 04:17 PM (IST)

    राज्यात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न

    माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार योजनेची थट्टा केली जात आहे. कोविन अ‌ॅपमध्ये अडथळे निर्माण झाले, पण केंद्र सरकारवर टीका करणार नाही. राज्यात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न आहे.

    संत नामदेव यांचं स्मरण झालं पाहिजे. राज्याची अनमोल रत्न आहेत. महिला पुरुष असतील त्यांची एकत्र मिळून नावं काढू, त्यांच्याप्रती ऋण अर्पण करुयात. संत नामदेव महाराष्ट्राच्या मातीचा सुपुत्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी कामं केले. त्यांनी पंजाबला जाऊन काम केले.

    शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, सीमेवर बंदोबस्त केला असता तर चीन घुसला नसता. मात्र, शेतकरी देशाच्या राजधानीत येऊ नये म्हणून खिळे लावले जातात. हा देश शेतकऱ्यांचा आहे. भारतमाता की जय म्हणलं म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही.

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे.

  • 03 Mar 2021 04:10 PM (IST)

    व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार, उद्धव ठाकरे गरजले

    कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन प्रभावी हत्यार आहे. गोरगरिबांची चूल पेटली पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना पेट्रोलच्या सेंच्युरी आणि गॅसच्या हजारीवरुन टोला.

    राज्याचं अर्थचक्र चालवण्यासाठी शेठजींपासून कामगारांपर्यंत सर्वांची गरज आहे. परदेशात अजूनही लॉकडाऊन केले जातेय. अमरावती पेक्षा परदेशातील आरोग्य व्यवस्था खराब आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

    राजकारणापेक्षा राज्यातील जनतेचा जीव प्यारा आहे. कोरोनाच्या संकटाशी खेळ करु नका, दोन्ही बाजूकडील नेत्यांना विनंती

  • 03 Mar 2021 04:06 PM (IST)

    पीएम-केअर वरुन मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना कानपिचक्या

    मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये कोरोना काळात केंद्राकडे निधी दिली गेला. ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये मदत केली त्यांना धन्यवाद मानतो.

    महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ 5 लाख 59 हजार नागरिकांना झाला. कोरोनाच्या सुरुवातीच्या परिस्थिती 3 कोविड टेस्टिंग लॅब होत्या आता 500 पेक्षा जास्त लॅब आहेत. डायलिसीसच्या रुग्णांसाठी विशेष सोय करण्यात आली.

  • 03 Mar 2021 03:59 PM (IST)

    महाराष्ट्रानं कोरोनाची आकडेवारी लपवली नाही, सुरुवातीची परिस्थिती भयानक

    -अर्थशास्त्रातील डॉक्टर बरे की वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचा कंपाडऊंड बरा? मुख्यमंत्र्यांचा सवाल

    -बिहारमधील कोरोनाच्या कामाचा भांडाफोड एका वृत्तपत्रानं केला. एकसुद्धा रुग्ण महाराष्ट्रानं लपवलेला नाही. मार्च एप्रिल महिन्यात कोरोनाची सुरुवात झाली ती भयानक परिस्थिती होती.

    – महाराष्ट्रानं आरटीपीसीआर टेस्टला प्राधान्य दिलं, विधानभवनात येताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केले.

    -लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधानांना सात आठ दिवस फोन करत होतो. राज्यातून परत जाणाऱ्या मजुरांची सोय केली.

  • 03 Mar 2021 03:54 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, एकेरी उल्लेखावरुन देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी

    महाविकासआघाडी सरकारनं कोरोना काळात नागरिकांना 5 रुपयांना शिवभोजन थाळी दिली. राज्यपालांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. विरोधकांनी नुसत्याच थाळ्या वाजवल्या. नारायण भंडारींच्या किस्सा सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत.

    फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. फेसबूक लाईव्हमुळं राज्यातील जनतेनं परिवारातील सदस्य मानलं आहे. कोरोना व्हायरस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणाला.

    माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा कोरोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या मी जबाबदार योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठं जंम्बो कोविड हॉस्पिटल उभारलंे.

  • 03 Mar 2021 03:49 PM (IST)

    आदर्श निर्माण करु शकले नाहीत, सावरकरांना भारतरत्न कोण देत नाही?

    -औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा विधानसभेत पुनरुच्चार

    – स्वातंत्र्यवीर सावकरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव कोणी रखडवला?.

    – वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून मोदींचं नाव दिल्यावरुनही टीकास्त्र

  • 03 Mar 2021 03:46 PM (IST)

    छत्रपती नसते तर दिल्लीत बसलेत ते तरी दिसले असते का?

    मराठी भाषा गौरव दिन हा मुख्यमंत्री म्हणून दुसरं वर्ष  आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. केंद्र सरकारनं मराठी भाषेला तिष्ठत ठेवलंय. मराठी भिकारी आहे का?  छत्रपती नसेत तर दिल्लीत बसलेत ते तरी दिसले असते का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.

  • 03 Mar 2021 03:41 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत फटकेबाजी

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. मुनगंटीवारांचं भाषण पाहताना नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला. राज्यपालांनी मराठीमध्ये भाषण केलं हे मोठी गोष्ट  आहे.

  • 03 Mar 2021 12:21 PM (IST)

    सरकार काळजीवाहूचं आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

    विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना मदत आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याविषयी विधानसभा अध्यक्षांनी निर्देश घेण्याचे आवाहन केले. त्यावर अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सरकार काळजी घेईल, असं म्हटलं. त्यावर सरकार काळजीवाहूचं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

  • 03 Mar 2021 12:16 PM (IST)

    जळगाव वसतीगृह प्रकरणावरुन विधानसभेत घमासान, सुधीर मुनगंटीवारांची आक्रमक भूमिका

    जळगाव वसतीगृह प्रकरणावरुन विधानसभेत घमासान झालं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं.

  • 03 Mar 2021 11:57 AM (IST)

    समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवार आमने सामने

    समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवार आमने सामने आले आहेत. समता प्रतिष्ठानमध्ये गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आहेत.

  • 03 Mar 2021 11:42 AM (IST)

    50 कोटी वृक्षलागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : अजित पवार

    50 कोटी वृक्षलागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार, असं उत्तर अजित पवार यांनी विधानसभेत दिलं. 50 कोटी वृक्षलागवड योजनेच्या चौकशी समितीला 4 महिन्यांचा वेळ दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

  • 03 Mar 2021 11:32 AM (IST)

    50 कोटी वृक्षलागवड योजनेची चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

    वृक्ष लागवड योजना फडणवीस सरकारची ड्रीम योजना होती. 50 कोटी वृक्षलागवड योजनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. विधिमंडळाची समिती स्थापन करुन चौकशी केली जाईल, असं राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.

  • 03 Mar 2021 11:18 AM (IST)

    विधिमंडळात सौरऊर्जा प्रकल्पावर चर्चा सुरु

    विधिमंडळात सौरऊर्जा प्रकल्पावर चर्चा सुरु असून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत.

  • 03 Mar 2021 10:46 AM (IST)

    राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा अंतिम दिवस

    3 मार्च : दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. आज अभिभाषणावरील चर्चा संपेल.

  • 03 Mar 2021 10:44 AM (IST)

    अधिवेशनात आज काय घडणार?

    अधिवेशनात आज काय घडणार?

  • 03 Mar 2021 10:42 AM (IST)

    शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या मुद्यावरुन भाजप आक्रमक

    महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन  केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.

Published On - Mar 03,2021 4:56 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.