राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय, ‘या’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 100 टक्के शुल्क माफ

राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय, 'या' अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 100 टक्के शुल्क माफ
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 3:30 PM

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी घेण्यात आला आहे.

व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी आता १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे EWS, SEBC आणि OBC विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मिळालेला मोठा दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा?

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. विधान परिषदेचं सभापती पद सध्या रिक्त आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे या सध्या कार्यवाहू सभापती आहे. आता सभापतीच्या निवडीबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे, अशी भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याची माहिती आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.