पुढील स्टेशन…, मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

राज्य मंत्रिमंडळांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आणि अहमदनगर शहराच्या नामांतरास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पुढील स्टेशन..., मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 4:34 PM

मुंबई | 13 मार्च 2024 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रालयात पार पडलेल्या आजच्या बैठकीत 25 पेक्षा जास्त अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये एक शहर, एक तालुका आणि मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अर्थात नामांतराचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरणासाठी प्रयत्नशील होते. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला. त्यामुळे वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करावं, अशी उपमुख्यमंत्र्यांची इच्छा होती. त्यांनी या मागणीसाठी पाठपुरावादेखील केला. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या मागणीवर शिक्कोर्तब झालं. वेल्हे तालुक्याचं नामांतर राजगड असं करण्यात आलंय. तसेच अहमदनगर शहराचं नांमातर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहेत. तसेच मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नामांतरण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली होती. राहुल शेवाळे यांनी या रेल्वे स्थानकांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली होती. राहुल शेवाळे यांनी पत्रात नामांतर करण्यामागची कारण सांगितलं होतं. या आठही रेल्वे स्थानकांना ब्रिटीश कालीन नावं आहेत. त्यातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे अपभ्रंश होऊन वेगळंच नाव स्थानिक आणि प्रवाशांकडून घेतलं जातं. तसेच रेल्वे स्थानक असलेल्या परिसराचा इतिहास पाहून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली होती. तसेच राहुल शेवाळे यांनी रेल्वे स्थानकांसाठी नावे देखील सूचवली होती. त्यांच्या या विनंतीस आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

‘या’ 8 रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मंजुरी

  • करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग असं केलं जाणार आहे.
  • सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी असं केलं जाणार आहे.
  • मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी असं केलं जाणार आहे.
  • चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगांव असं केलं जाणार आहे.
  • कॉटन ग्रिनचं काळाचौकी असं नामांतर केलं जाणार आहे.
  • डॉकयार्डचं माझगांव असं नामांतर केलं जाणार आहे.
  • किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं तिर्थकर पार्श्वनाथ असं नामांतर केलं जाणार आहे.
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाना जगन्नाथ शंकर शेट असं नामांतर केलं जाणार आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.