BIG BREAKING | पुढच्या 24 तासात खातेवाटप, वरिष्ठ सूत्रांची ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी खातेवाटप होणार आहे. कारण वरिष्ठ सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांसाठी आता लवकरच खातेवाटप केलं जाणार आहे.

BIG BREAKING | पुढच्या 24 तासात खातेवाटप, वरिष्ठ सूत्रांची 'टीव्ही 9 मराठी'ला माहिती
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 5:43 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व 9 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा रविवारी 2 जुलैला पार पडला. त्यामुळे नव्या मंत्र्यांची शपथ घेऊन आता 12 दिवस उलटले आहेत. पण तरीही नव्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. त्यांच्या शपथविधीला 12 दिवस उलटल्यानंतरही त्यांना खाती मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे येत्या 17 जुलै पासून विधी मंडळाचं तीन आठवड्यांचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. पण सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा सूटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यासाठी वरिष्ठ स्तरावर गेल्या चार ते पाच दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सलग तीन दिवस रात्री उशिरा बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध होता. त्यामुळे हा तिढा निर्माण झालेला होता.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात तीन-तीन बैठका पार पडल्यानंतरही त्यावर तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर अजित पवार हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात एक तास बैठक पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा राज्यात खातेवाटप आणि मंत्रिमडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

हे सुद्धा वाचा

खातेवाटप कधी होणार?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी आजच पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. पण ऐन पावसाळी अधिवेशनात आमदारांची नाराजी ओढावू नये म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे. तसं असलं तरी पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी नव्या मंत्र्यांना खातेवाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 24 तासात खातेवाटप होणार आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार? याबाबतही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शिंदे गटाकडील कोणतंही खातं दिलं जाणार नसून फक्त भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी खाती दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘ही’ खाती राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता

  • अर्थ
  • सहकार
  • महसूल
  • ग्रामविकास
  • सार्वजनिक बांधकाम
  • अन्न व औषध प्रशासन
  • कामगार
  • सामाजिक न्याय
  • अल्पसंख्यांक
  • महिला व बालकल्याण
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.