सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय.

सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, नव्या चेहऱ्यांना संधी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 6:43 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतात की काय? अशा चर्चांना उधाण आलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यात सत्तांतर होऊन जवळपास चार महिने होत आले तरी नव्या सरकारचं दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडूनही राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता राज्य सरकारनेच याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व 50 आमदार दोन दिवस गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते गुवाहाटीला जाऊन कामाख्यादेवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परतल्यावर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होणाऱ्या आमदारांना महामंडळ देण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह येत्या 26 नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुवाहाटीहून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार?

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत आतापर्यंत विरोधकांकडून दिले जात होते. पण आता सत्ताधारी पक्षातीलच ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विधान केल्याने संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. राज्यात कधी काय होईल काहीच भरोसा नाही. महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकार शंभर टक्के कोसळणार असल्याचं विधान केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ न मिळाल्याने आमदार नाराज आहेत. त्यामुळे ते बंडखोरी करतील, असं विधान केलंय.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.